Fitness

मॉर्निंग वॉक करताना याकारणासाठी दूर ठेवा मोबाईल

Trupti Paradkar  |  Aug 9, 2021
Side Effects Of Using Mobile During Morning Walk

आजकाल निरोगी राहण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि शांत मनस्थितीची गरज आहे. नियमित व्यायाम करणं शक्य नसेल तरी नियमित तीस मिनीटे चालण्याचा सराव तरी प्रत्येकाने केला पाहिजे. कोरोनाच्या काळात आरोग्याचे महत्त्व पटल्यामुळे अनेकांनी मॉर्निंग वॉकची सवय स्वतःला लावून घेतली आहे. मॉर्निंक वॉक केल्यामुळे दिवस फ्रेश आणि उत्साही होतो. मात्र वॉक करताना मोबाईल मात्र मुळीच जवळ बाळगू नये. यामुळे तुमचे वॉकमधील लक्ष तर जातेच शिवाय तुमच्या शरीरावरही दुष्परिणाम होतात.

जाणून घ्या वॉक करताना का बाळगू नये मोबाईल

मोबाईल ही सध्या माणसाची प्राथमिक गरज झाली आहे. त्यामुळे झोपताना, उठल्यावर, काम करताना, जेवताना सतत मोबाईल जवळ बाळगण्याची सवय प्रत्येकाला जडली आहे. मोबाईलच्या एका क्लिकवरून तुम्ही जगातील सगळी खबर ठेवत असला तरी काही काळ मोबाईल पासून दूर राहणं शरीर आणि  मन दोघांसाठी खूप गरजेचं आहे. कारण मोबाईल ही फक्त गरजेची गोष्ट नसून तुमचं व्यसन झाली आहे. त्यामुळे गरज नसतानाही मोबाईल पाहण्याचे वेड सर्वांना लागलेले आहे.  यासाठीच जाणून घ्या मॉर्निंग वॉक करताना मोबाईल जवळ बाळगल्यामुळे तुमच्या मन आणि शरीरावर काय दुष्परिणाम होतात. 

Side Effects Of Using Mobile During Morning Walk

काय होतात दुष्परिणाम

चालताना जर तुम्ही हातात मोबाईल ठेवणार असाल तर तुम्हाला कालांतराने या शारीरिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

वजन कमी करण्यासाठी नेमकं किती पावले चालणं आहे गरजेचं

जाणून घ्या हाडांवर कसा होतो गॅझेट्सचा दुष्परिणाम, तज्ज्ञांचे मत

सकाळी चालण्याचे अप्रतिम फायदे (Morning Walk Benefits In Marathi)

Read More From Fitness