‘बिग बॉस’च्या तेराव्या सीझनने (Bigg Boss 13) जगभरातील चाहत्यांना #sidnaaz ही सुंदर जोडी मिळवून दिली होती. कोणाचीही नजर लागावी अशी जोडी. मात्र सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) च्या निधनानंतर आता सर्वच स्तरावर हळहळ व्यक्त होत आहे. विशेषतः चाहत्यांना आणि सिद्धार्थच्या मित्रमैत्रिणींनाही काळजी लागून राहिली आहे ती म्हणजे शेहनाझ गिलची (Shenaaz Gill). शेहनाझासाठी सिद्धार्थ नक्की काय होता हे शब्दातही व्यक्त करणे शक्य नाही. तिच्या प्रत्येक बोलण्यातून, वागण्यातून सिद्धार्थ आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे जाणवत राहायचं. काही दिवसांपूर्वी लागोपाठ दोघेही दोन वेगवेगळ्या रियालिटी शो मधून पुन्हा समोर आले होते. या दोघांना एकत्र पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. सिद्धार्थच्या अशा अचानक जाण्यामुळे आता सगळ्यांनाच शेहनाझची काळजी लागून राहिली आहे. कधीही न भेटलेल्या व्यक्तींविषयी वाटणारा जिव्हाळा हा त्यांच्या कामाचीच पावती असते आणि #Sidnaaz च्या बाबतीत नेमकं हेच घडलं आहे.
अधिक वाचा – Bigg Boss 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराने निधन
प्रेमकहाणी राहिली अपूर्ण
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही सिद्धार्थ आणि शेहनाझची मैत्री तशीच कायम होती. दोघं लवकरच लग्न करणार अशा चर्चाही अनेक वेळा रंगल्या आहेत. सिद्धार्थने कधीही आपले प्रेम व्यक्त केले नसले तरीही शहनाझ आपल्यासाठी अत्यंत जवळची असून तिला कधीही अगदी रात्री 3 वाजता जरी आपली गरज असली तरीही आपण तिच्या मदतीसाठी धाऊन जाऊ अशे सिद्धार्थने अनेक मुलाखतींमध्येही सांगितले होते. तसंच शहनाझबरोबर असताना तिची काळजी घेणे, तिच्या आवडत्या गोष्टी करणे हे नेहमीच सिद्धार्थ करत आला होता. गेल्या दोन वर्षात या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहण्यात आलं होतं. इतकंच नाही तर सिद्धार्थची सर्वात जवळची व्यक्ती त्याची आई होती. सिद्धार्थने आपल्या आई आणि कुटुंबासह शहनाझचा वाढदिवसदेखील साजरा केला होता. अशी मैत्री सगळ्यांचीच असावी असं नेहमीच सर्वांना वाटत आलं होतं. मात्र आता सिद्धार्थच्या अचानक एक्झिटमुळे (Siddharth Shukla died on 2nd September cause of heart attack) ही प्रेमकहाणी अपूर्णच राहिली आहे आणि सर्वच चाहत्यांना दुःख अनावर झाले आहे. 40 वर्षीय सिद्धार्थच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन जगताला धक्का बसला आहे.
अधिक वाचा – एकता कपूरची मराठमोळी ‘कुसुम’ शिवानी बावकर
शहनाझला दुःख पचवणे आहे कठीण
शहनाझसाठी सिद्धार्थ हेच जग होता. तिचे नाव कमावण्याचे स्वप्न असले तरीही तिच्यासाठी सिद्धार्थ म्हणेल ती पूर्व दिशा होती. कोणत्याही बाबतीत काहीही अडलं तरीही ती सर्वात पहिले सिद्धार्थकडे जात होती आणि त्याचा सल्ला घेत होती. तर तिला सिद्धार्थबरोबर लग्नही करायचं होतं. हे कधीच लपून राहिलं नव्हतं. दुसऱ्या रियालिटी शो मध्ये सिद्धार्थवर प्रेम असल्यामुळेच आपण लग्न करू शकत नाही अशी प्रेमाची कबुली सना अर्थात शहनाझने दिली होती. बिग बॉसमधील या दोघांची मैत्री कायम व्हिडिओ स्वरूपात सोशल मीडियावर दिसून येत असते. तर घराबाहेर आल्यानंतर या जोडीने काही व्हिडिओ अल्बममध्येही एकत्र काम केले आहे. मात्र सिद्धार्थ या जगात नाही हे दुःख पचवणे तिला नक्कीच कठीण जात आहे असं आता समोर आलं आहे. सिद्धार्थ गेल्यानंतर अजूनही शहनाझ सावरलेली नाही. तिचा भाऊ तिला सावरण्यासाठी आला असून तिच्या वडिलांनी ती अजिबातच ठीक नसल्याचेही सांगितले आहे. शुक्रवारी (3 September, 2021) रोजी सिद्धार्थवर अंतिम संस्कार होणार आहेत. गुरूवारी इंडस्ट्रीतील अनेक जणांनी सिद्धार्थच्या घरी जाऊन त्याच्या आई आणि बहिणीची भेट घेतली आहे. मात्र एक सर्वांचा आवडता तारा निखळला असून कायमचे सर्वांच्या मनात घर करून गेला असला तरीही त्याची ही एक्झिट मनाला चटका लावणारी नक्कीच आहे!
अधिक वाचा – ‘जलेबी बेबी’ लुकमुळे मल्लिका शेरावत झाली ट्रोल
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade