भारतात लग्नसोहळ्यादरम्यान अनेक विधी केले जातात. त्यातील महत्त्वाचा विधी म्हणजे नववधूला मेंदी काढणे. काही ठिकाणी नवरदेवालाही थोडी मेंदी काढली जाते. अनेक समाजामध्ये मेंदीचा विधी मोठ्या प्रमाणावर केला जातो. यासाठी खास मेंदी काढणाऱ्या कुशल व्यक्तीला बोलावले जाते. हातापायाच्या अगदी कोपरापासून मेंदी काढली जाते. मेंदीचा रंग जितका रंगतो तितकंच त्यांच्या जोडीदाराचं त्यांच्यावरील प्रेम असतं असं मानलं जातं. यासाठीच मेंदीचा रंग येण्यासाठी फार मेहनत घेतली जाते. मेंदी काढण्यामागे केवळ हौस हे एकमेव कारण नसून अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहे. लग्नसोहळ्यात मेंदी काढणे शुभ मानले जाते. यासाठी लग्नात नववधू आण नवरदेवाच्या हाता-पायावर मेंदी का काढली जाते हे अवश्य वाचा.
लग्नात नववधूच्या हातावर मेंदी काढण्यामागचं महत्त्व
- लग्नात नवरीचं रूप आणि सौंदर्य अधिक खुलून दिसावं हा यामागील प्रमूख हेतू असतो. कारण मेंदीमुळे नववधूचे हात आणि पाय अधिक सुंदर आणि नाजूक दिसतात. हातापायावरील नाजूक मेंदीच्या डिझाईनमुळे तिचे हाता-पाय इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसतात.
- मेंदीचा रंग जितका रंगत जातो तितकं तिच्या जोडीदाराचं तिच्यावरील प्रेम दृढ होत जातं असं मानलं जातं. यासाठीच प्रत्येक नववधूला तिच्या हातावरील मेंदीचा रंग सर्वात गडद असावा असं वाटत असतं. हा एकमेकांवरील प्रेम करण्याचा एक सुंदर प्रकार असावा.
- मेंदी ही एक थंड पदार्थ आहे. ज्यामुळे लग्नकार्यातील दगदग आणि धावपळीतून आलेला थकवा दूर होण्यास मदत होते. नवरी मुलगी तिच्या लग्नानंतर तिच्या सासरी जात असते. अशावेळी सहाजिकच तिच्या मनावर एकप्रकारचा ताण आलेला असतो. मात्र मेंदीच्या थंडाव्यामुळे तिचा ताण कमी होण्यास मदत होते.
- नवरीच्या अथवा नवऱ्याच्या हातावर लग्नात इतरांपेक्षा वेगळ्या डिझाईन्स काढल्या जातात. ज्या काढण्यासाठटी खास ब्रायडल मेंदी डिझानरला बोलावलं जातं. याचं कारण या ब्रायडल डिझाईन्समध्ये अनेक पवित्र गोष्टी दडलेल्या असतात. जसं की शहनाई, मोर, फुलं, वधूवरांची चित्रं यांचा या डिझाईनमध्ये आवर्जून समावेश केला जातो. ज्यामुळे भावी पतीपत्नीच्या आयुष्यात भरभराट आणि सुख येतं असं मानलं जातं.
- मेंदीला एक विशिष्ठ प्रकारचा सुंगध असतो. ज्यामुळे लग्नानंतर तिच्या सहजीवनातही तसाच सुंगध निर्माण होतो. यासाठीच तिच्या हातावर सुंगधित मेंदी काढली जाते. मेंदीच्या सुवासाने तिचं वैवाहिक जीवन फुलतं आणि सुवासिक होतं असं म्हटलं जातं.
- मेंदी हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं यासाठी नवरीच्या हातावर मेंदी काढली जाते. कुंकू, चुडा, सिंदूर याचप्रमाणे मेंदी लावल्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडते. म्हणूनच लग्नाप्रमाणेच वटपौर्णिमा अथवा इतर सुवासिनी पुजनाच्या कार्यक्रमात मेंदी अवश्य लावली जाते.
- मेंदीच्या औषधी गुणधर्मांमुळे लग्नकार्यात नववधू आणि वराला मेंदी लावली जाते. या गुणधर्मांमुळे त्यांचे भावी आयुष्य निरामय आणि निरोगी राहते.
फोटोसौजन्य – इन्साग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या क्लिक करा.
अधिक वाचा –
हातावरील मेंदीला आणायचा असेल गडद रंग, तर करा ‘हे’ सोपे उपाय
लग्न समारंभात या कारणांसाठी लावतात वर आणि वधूला ‘हळद’
घरात लग्नकार्य आहे? मग पूर्वतयारीसाठी तुम्ही हे वाचायलाच हवे
फुलांच्या वरमालांचे सुंदर डिझाईन्स (Varmala Designs In Marathi)