Bridal Mehendi

नवरीची मेहंदी ही तिच्या नवऱ्याचं तिच्यावरील प्रेम दाखवते (Navrichi Mehndi Design)

Dipali Naphade  |  Nov 22, 2018
Marathi Mehndi Design

सजले रे क्षण माझे मेंदीने …आपल्या घरातील लग्नांमध्ये अशी गाणी नसतील तर लग्नमंडप अगदी सुनासुना वाटतो. लग्नविधीच्या वेळी नवरीच्या हातावर मेंदी काढणं हे आता विधी राहिलेले नाहीत तर दोन मनांचं मिलन बनवणारी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम झाला आहे. मेंदीच्या सुवासाप्रमाणेच सर्व आयुष्य अशाच सुंगधाने दरवळून जावं हा खरातर उद्देश. त्यामुळे नवरीच्या हातावरील मेंदी सर्वात सुंदर दिसणं गरजेचं आहे. तसं तर मेंदी लावणाऱ्यांकडे ब्रायडल मेंदीची खूप डिझाईन्स असतात, मात्र ते डिझाईन्स इतके जुने आणि सामान्य असतात की, त्यामध्ये मजा येत नाही आणि आपल्याला अजून गोंधळून जायला होतं. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी ब्रायडल मेंदीचे असे २५ डिझाईन्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमच्या हातांची शोभा वाढेल.

25 नवीनतम आणि सोपे नवरीची मेहंदी डिझाईन्स (Latest Marathi Mehndi Design For Bridal)

मेंदी काढणं ही एक कला आहे. त्याच्या अनेक डिझाईन्स असतात. काही कठीण असतात तर काही सोप्या. आपण इथे अशाच काही सोप्या मेंदी डिझाईन्स पाहणार आहोत – 

1. रजवाड़ी मेंदी 

पूर्वीच्या काळात जेव्हा राजा आपल्या राणीच्या राज्यात हत्तीवर स्वार होऊन वरात घेऊन यायचा. त्याचप्रमाणे नवरीदेखील डोलीमध्ये बसून आपल्या वडिलांच्या घरून नवऱ्याच्या घरी जात होती. यामध्ये नवरीच्या मेंदीचे डिझाईन्स अशाच प्रकारचे संदेश देण्याचा प्रयत्न करतात. या मेंदीमध्ये राजा आणि राजी एकांतात वेळ घालवतानादेखील दाखवण्यात येतात.

दक्षिण पारंपारिक केशरचनांबद्दल देखील वाचा

2. प्रेमाने भरलेली मेंदी डिझाइन 

जेव्हा नवरा प्रेमात येतो तेव्हा नवरीने नखरे करणं आणि थोडंस नवऱ्याला तरवसणं तर नक्कीच गरजेचं आहे. या मेंदीमधील डिझाईन्सदेखील नवरा आणि नवरीमधील प्रेमातील नोक-झोक दाखवण्याचा प्रयत्न करते.

3. लग्नाच्या विधीचे डिझाईन

खरंतर लग्न हे सर्वतः पूजा आणि अन्य विधीमध्ये होत असतं. पण अशी वेळदेखील येते जेव्हा या सर्व विधींपासून दूर जाऊन नवरीचं लक्ष कधीतरी नवऱ्याकडे जातंच. तो क्षण आहे केसांमध्ये कुंकू भरण्याचा. नवरा जेव्हा आपल्या पत्नीच्या केसांमध्ये कुंकू भरतो तेव्हा ती वेळ अशी असते जेव्हा नवरी आपले डोळे बंद करून हा क्षण जन्मभरासाठी जगत असते. मेंदीच्या या डिझाईनमध्ये हा विधी अतिशय कल्पकरितीने हातावर काढण्यात येतो. नवरीची मेहंदी रंगून जाणं जास्त महत्त्वाचं.

4. स्वप्नांची मेंदी डिझाइन

नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने रॅपर ‘स्लोचिता’ अर्थात चैतन्य शर्माबरोबर लग्न केलं. लग्नासाठी श्वेताच्या हातावर काढण्यात आलेली मेंदी खूपच खास होती. या मेंदीमध्ये तिची काही स्वप्नं, तिच्या अपेक्षा होत्या. त्याशिवाय नवरा आणि नवरीची एकमेकांना साथ आणि लग्नानंतर आयुष्यात होणारी रोलर कोस्टर राईडदेखील या मेंदीमध्ये काढण्यात आली होती. खऱ्या अर्थाने मेंदी नवरीच्या मनातील गोष्टी सांगते.

नववधूकरिता 10 लहान उखाणे

5. फेअरीटेल डिझाईन

प्रत्येक मुलीला वाटतं की, आपलं लव्ह लाईफ हे अगदी फेअरटेलप्रमाणेच असावं. ज्यामध्ये तिच्या स्वप्नातील राजकुमार येईल आणि तिच्यावर राजकुमारीप्रमाणे प्रेम करेल. अशीच काहीशी कहाणी अलाद्दुन आणि जॅस्मिनची आहे. यांच्या प्रेमाची कहाणी फेअरीटेल मेंदीमधून दिसते.

6. वरमाळा मेंदी डिझाईन 

लग्नामध्ये वरमाळा हा असा विधी असतो ज्यामध्ये नवरा – नवरी पहिल्यांदा एकमेकांसमोर येतात. या क्षणी सर्वांचे डोळे फक्त नवरा आणि नवरीवर असतात. या प्रसन्न क्षणाला मेंदीच्या डिझाईन्समध्ये उतरवल्यास, याची सुंदरता अजूनच वाढते. नवरीची मेहंदीचे वैशिष्ट्य हेच आहे. 

7. प्रपोजल डिझाईन

आपल्या गुढघ्यावर टेकून बसून हातात अंगठी घेऊन प्रपोज करण्याचा क्षण हा प्रत्येक मुलीसाठी खास असतो. या मेंदी डिझाईन्समध्ये या क्षणातील सुंदरता हातावर रेखाटण्यात येते. मेहंदीची डिझाईन बघण्यासाठी अनेकदा आपण आतुर असतो. त्यासाठी हे खास डिझाईन.

हातावरील मेंदीला आणायचा असेल गडद रंग, तर करा ‘हे’ सोपे उपाय

8. पिकॉक डिझाईन

पूर्वीच्या काळी हातामध्ये मोराची आकृती अर्थात पिकॉक डिझाईन खूप जास्त प्रचलित होतं. मात्र आताही याची क्रेझ कमी झालेली नाही. पिकॉक डिझाईन नवरीच्या हातावर अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतं.

9. फ्लोरल डिझाईन

फुलांसारखे कोमल आणि नाजूक हात कोणाला आवडत नाहीत? त्याच हातावर कोमल आणि सुबक मेंदी काढली तर अजूनच मजा. गुलाबाच्या फुलांचे हे डिझाईन ब्रायडल मेंदीसाठी उत्कृष्ट आहे.

10. हातावर भरलेली मेंदी डिझाइन

नवरीच्या संपूर्ण हातावर मेंदी असेल तर खूपच सुंदर दिसतात. अगदी बोटाच्या टोकापासून ते हाताच्या कोपरापर्यंत मेंदीची गोष्टच काही वेगळी असते. संपूर्ण हातावर डिझाईन्स असतील तर त्यापेक्षा उत्कृष्ट काहीच नाही.

11. चेक्स डिझाईन   

चेक्सचं पॅटर्न मेंहंदी डिझाईन मध्ये खूपच सुंदर मानलं जातं आणि काढण्यासही सोपं असतं. हे डिझाईन आधुनिक काळातील मुलींच्या आवडतं आहे. हे काढणं जितकं सोपं आहे तितकंच ते रंगल्यानंतरही छान दिसतं हे याचं खास वैशिष्ट्य आहे. 

12. बेल पॅटर्न

तुम्हाला जर संपूर्ण हातभर मेंदी आवडत नसेल आणि अगदी साधेपणाने तुम्हाला हातावर मेंदी हवी असेल तर लीफ पॅटर्न अर्थात बेल डिझाईन तुमच्यासाठी चांगलं आहे. हे जितकं साधं असतं तितकंच स्टायलिशदेखील दिसतं.

13. अरेबिक डिझाईन

वेस्टर्न शैली आणि सध्या आधुनिक गोष्टींची सांगड घालत, भारतीय मेंदीची तुलाना अरबी अर्थात अरेबिक डिझाईन्ससह करण्यात येते. मात्र ही मेंदी अतिशय सोपी आणि सुंदर दिसते.

14. बॉर्डर डिझाईन

बॉर्डर मेहंदीची डिझाईन सर्वांचं लक्ष वेधून घेतं आणि आकर्षित करते. या डिझाईन्समध्ये सर्व बॉर्डर्स हायलाईट करण्यात येतात आणि त्यामध्ये अतिशय बारीक आणि आकर्षक मेंदीचं डिझाईन काढण्यात येतं.

15. गोल टिका डिझाईन

पूर्वीच्या काळी लोक हातावर अल्ता वापरून गोल टिका बनवत होते. मेंदीच्या आधाराने आता हा गोल टिका थोडा आधुनिक तऱ्हेने बनवण्यात येतो. आता गोल टिका डिझाईन मधोमध काढून त्याच्या बाजूला आकर्षक मेंदीचं डिझाईन काढता येतं.

16. रॉयल डिझाईन

रॉयल मेहंदीची डिझाईन दिसायला खूपच शानदार असतं पण अतिशय कठीण असतं. या डिझाईनमध्ये राजाचा राजवाडा, राजा, राणी आणि त्याची शाही वरात, हत्तीची आकृती हे सर्व काढण्यात येतं. रंगल्यानंतर रॉयल मेंदी अतिशय सुंदर दिसते.

17. बांगडी मेंदी डिझाईन

हे डिझाईन हातावर बांगड्यांच्या आकाराप्रमाणे काढण्यात येतं. यामुळे हात भरलेला आणि सुंदर दिसतो.

18. मिरर इमेज मेंदी

दिसायला जोडीवाली मेंदी खूपच सुंदर दिसते अर्थात दोन्ही हातावर एकसारखीच मात्र एकमेकाविरुद्ध अर्थात मिरर इमेज असं मेंदीचं डिझाईन असतं. तशीच ही खूप सोपी मेहंदी आहे.

19. दोन्ही हातावर वेगळं डिझाईन

या मेंदीमध्ये दोन्ही हातावर वेगवेगळं डिझाईन काढण्यात येतं. या मेंदीमधून तुम्ही तुमच्या भविष्यात असणारी स्वप्नंही रेखाटू शकता. तसंच तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याचंही डिझाईन दुसऱ्या हातावर काढू शकता.

20. कैरी डिझाईन

कैरी डिझाईन पूर्वीच्या काळातील आवडती स्टाईल आहे. तसंच हे डिझाईन दिसायला अतिशय आकर्षक आणि सुबक दिसतं. हे डिझाईन काढायलादेखील खूप सोपी मेहंदी डिझाईन आहे.

21. 3 डी स्टाईल

ही आधुनिक काळातील मेंदी डिझाईन आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तरूण मुलींना हे डिझाईन खूप आवडतं. यामध्ये प्रत्येक ब्लॉक आणि पॅटर्न अगदी उठून दिसतं आणि ३ डी चा भास होतो.

22. नवरा – नवरी डिझाईन

ब्रायडल मेंदीमध्ये सर्वात जास्त या डिझाईनला पसंती दर्शवण्यात येते. यामध्ये एका हातावर नवऱ्याची आकृती तर दुसऱ्या हातावर नवरीची आकृती रेखाटण्यात येते. नवरीची मेहंदी असते खास. 

23. पारंपरिक डिझाईन

पारंपरिक डिझाईनमध्ये लग्नाच्या वेळी तयार करण्यात येणारे कलश आणि ढोल ताशे यांची आकृती काढण्यात येते. यामध्ये लग्नातील विधींना प्राधान्य असून वरमाळा, नवरीची डोली याप्रकारचे डिझाईन्स काढण्यात येतात.

24. बर्ड डिझाईन 

पूर्वीच्या काळी जेव्हा मुलीचं लग्न व्हायचं तेव्हा घरातील थोरमोठे म्हणायचे…आमच्या अंगणातील चिमडी उडाली. या मेंदीचं डिझाईन यावरूनच तयार करण्यात आलं आहे. यामध्ये एका बाजूला पिंजऱ्यात कैद असणारी चिमणी दाखवण्यात येते तर दुसऱ्या बाजूला तिच्या आजूबाजूला मुक्त झालेल्या चिमण्या काढण्यात येतात. खूप सोपी मेहंदी डिझाईन आहे.

25. हथफूल डिझाईन

लग्नाच्यावेळी नवरीच्या हातामध्ये हथफूल नावाचा दागिना असतो. त्याच दागिन्यापासून हे मेंदीचं डिझाईन बनवण्यात आलं आहे. हे डिझाईन हाताच्या मागच्या बाजूला काढण्यात येतं. हे दिसायलाही खूपच सुंदर असतं.

 

इमेज सोर्स: Instagram- Heena by Divya, Bridal mehendi Queen, Sehar Saloon, theweddingbrigade, indian__wedding, henna mehnaz Mehendi

Read More From Bridal Mehendi