आपलं जग

कायम आनंदी राहण्यासाठी स्वतःला लावा या सवयी

Trupti Paradkar  |  Jul 12, 2022
Simple Habits for a Happier Life in marathi

आनंदी जीवन प्रत्येकाला हवं असतं. मात्र आयुष्यात येणारे चढउतार, स्पर्धा, कामाचा ताण, नातेसंबधांमधील तणाव अशा अनेक गोष्टी जीवनातील आनंद दूर सारतात. सतत चिंता काळजी करत बसल्यामुळे आनंदी जगणं माणूस विसरून जातो. मग सुरू होतो प्रयत्न आनंदी राहण्याचा… वास्तविक आनंदी राहण्यासाठी फार काही तरी मोठं करण्याची गरज नाही. ताणतणाव नियंत्रित करण्याचं तंत्र माणसाला समजलं की तो आपोआप आनंदी होतो. कारण आयुष्य म्हटलं की चिंता काळजी सतावणाच पण, त्या चिंता काळजीला नियंत्रित करायची युक्ती समजली की जीवन सुखाचं आणि समाधानाचं होतं. स्वतःला अगदी काही साध्या आणि सोप्या सवयी लावूनही कायम आनंदी राहता येतं. यासाठी या सवयी स्वतःला जरूर लावा आणि जगा आनंदी जीवन… तसंच वाचा सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स (Tips For Happy Married Life), जीवन जगताना मानसिक समाधान देतील हे आध्यात्मिक सुविचार (Spiritual Quotes In Marathi), वाईट मूड चांगला करण्यासाठी आनंद सुविचार मराठीत (Happiness Quotes In Marathi)आणि महिलांनी आनंदी जीवन जगण्यासाठी या ’10’ गोष्टी अवश्य कराव्या

नेहमी कार्यरत राहा 

स्वतःला कार्यरत ठेवल्यामुळे तुमचे लक्ष जीवनातील काळजी, चिंतेपासून काही काळ दूर जातं. बऱ्याचदा अॅक्टिव्ह न राहिल्यामुळे बरेच लोक नैराश्याच्या अधीन जातात. कारण ते रिकाम्या वेळेत चिंता काळजी करत बसतात. रिकामा वेळीही काहितरी करत राहिलं तर चिंता काळजी नक्कीच सतावणार नाही. यासाठीच स्वतःला अॅक्टिव्ह ठेवायचं असेल तर नियमित वॉकला जाणं, जीमला जाणं, योगासने करणं, व्यायाम करणं, नृत्यकला शिकणं अशा गोष्टी रिकाम्या वेळेत करायला हव्या. सुरुवातीला या सर्व गोष्टींची सवय लावणं थोडं कठीण जाईल. पण एकदा तुम्हाला या गोष्टींची सवय लागली की तुमचा वेळ कसा जाईल हे कळणार देखील नाही. यासाठी स्वतःला अॅक्टिव्ह ठेवणाऱ्या गोष्टींची सवय लावा. 

सकाळच्या सवयी

तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यावर तुमचा दिवस कसा असणार हे ठरत असतं. यासाठीच सकाळी उठल्यावर स्वतःला या काही चांगल्या सवयी लावून घ्या. मेडिटेशनर करणं मॉर्निंग वॉक करणं यासाठी महत्त्वाचं ठरेल. सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करणे, सर्वांची कृतज्ञता व्यक्त करणे, कामाची लिस्ट बनवणे, डायरीत सकारात्मक गोष्टी लिहीणे, सकारात्मक विचार ऐकणे या सवयी खूपच फायद्याच्या आहेत.

सोशल मीडियाचा वापर

आजकाल जास्तीत जास्त लोक आपला वेळ सोशल मीडियावर घालवतात. सोशल मीडिया अथवा फोन अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र सकाळी उठल्यावर, नाश्ता-जेवण करताना, टॉयलेटमध्ये असताना आणि झोपण्यापूर्वी अर्धा तास फोन दूर असेल तरच फायदेशीर ठरेल. ज्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी योग्य वेळ देता येईल. 

अन्न हे पूर्णब्रम्ह

आजकाल लोक जेवताना काम अथवा इतर गोष्टींचा विचार करत असतात. त्यामुळे त्यांचे जेवणाकडे मुळीच लक्ष नसते. तुम्ही खाताना जे पदार्थ खाता त्यांचे रंग, वास, चव तुमच्या मनाला प्रसन्न करत असते. मात्र याचा अनुभव घेण्यासाठी काही काळ जेवणाच्या क्रियेकडे पूर्ण लक्ष द्यायला हवं. यासाठीच नाश्ता करताना अथवा जेवताना न्यूजपेपर, टीव्ही, मोबाईल दूर ठेवावा.

कृतज्ञतेची व्यक्त करा 

कृतज्ञता व्यक्त करणं आनंदी राहण्याचे प्रभावशाली माध्यम आहे. यासाठी एकाद्याने आपल्यासाठी अगदी छोटीशी गोष्ट जरी केली तरी त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. यातून त्या व्यक्तीला आनंद मिळेलच पण तुम्हाला सर्वात जास्त आनंद मिळेल. कारण आनंद हा देण्यातच आहे. तेव्हा दररोज सर्वांबद्दल मनापासून कृतज्ञ राहा आणि वेळोवेळी ती व्यक्त करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आपलं जग