Care

#HairCare : पावसाळ्यात केसांमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी वाचा टिप्स

Aaditi Datar  |  Aug 2, 2019
#HairCare : पावसाळ्यात केसांमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी वाचा टिप्स

पावसात एन्जॉय करायला कोणाला आवडत नाही. पावसाचे वेध लागताच सगळ्यांचे प्लॅन्स सुरू होतात. पहिल्या पावसात तर सगळेच आवर्जून भिजायला जातात. मग जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण पावसात भिजतो. पण त्यामुळेच केसांच्या अनेक समस्यांना आपण आमंत्रण देत असतो. यापैकी प्रमुख समस्या म्हणजे केस ओले राहिल्यामुळे त्यांना वास येणं. यामागे स्मेली हेअर सिंड्रोमही असू शकतो. खासकरून पावसाळ्याच्या दिवसात केस जास्त चिकट आणि डॅमेज होतात. तसंच या दिवसांमध्ये केसांतील डँड्रफही वाढतो. अशावेळी केसांची खास निगा राखावी लागते. चला पाहूया केसांची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स – 

केस ठेवा कोरडे

हवेतील दमटपणामुळे केस चिकट होतात आणि त्यातून वास येऊ लागतो. त्यामुळे या दिवसांमध्ये केस लगेच सुकवावेत. कारण ते ओले राहिल्यास दुर्गंधी येते. हे टाळण्यासाठी पावसात भिजल्यावर किंवा शँपू केल्यावर केस सुकल्याशिवाय ते बांधू नका. तसंच ओले केस तसेच ठेवून झोपूही नका. कारण त्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. लक्षात ठेवा केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायर नाहीतर टॉवेलने केस सुकवा. 

Shutterstock

स्टाईलिंग प्रॉडक्ट्स नो नो

मान्सूनमध्ये केस चिकट झाले किंवा त्यांना वास येऊ लागला म्हणून त्यांच्यावर चुकूनही स्टाईलिंग प्रोडक्ट्सचा वापर करू नका. कारण त्यामुळे केस जास्त खराब होतील. तसंच या प्रोडक्ट्समुळे केसांमध्ये अजून घाण आणि बॅक्टेरिया वाढतील. कारण स्टाईलिंग जेलमुळेही केस चिकट आणि डँड्रफयुक्त होतात. त्यामुळे या दिवसांमध्ये स्टाईलिंग प्रोड्क्टसचा वापर नक्कीच टाळा.

शँपू बदला

तुमचा नेहमीचा शँपू चांगला असला तरी या वातावरणासाठी तुमच्या केसांना डीप क्लीझींग करणाऱ्या शँपूची गरज असते. त्यामुळे असा शँपू वापरा जो माईल्ड असेल आणि हर्बल असेल. ज्यामुळे केसांतून दुर्गंधी येणार नाही आणि बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शनपासूनही बचाव होईल.

Shutterstock

कंडीशनर आवश्यक

पावसाळ्याच्या दिवसात केस धुतल्यावर कंडीशनर आवर्जून लावा. ज्यामुळे केस जास्त न गुंतता सहज विंचरता येतील. कारण पावसात केस ओले राहिल्यास जास्त गळतात. तसंच ते कोरडेही होतात. त्यामुळे कंडीशनरचा वापर करणं आवश्यक आहे. कंडीशनरप्रमाणेच केसांचं नैसर्गिकरित्या पोषण होणं गरजेचं आहे. यासाठी किमान आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लावून मसाज करा. तेलामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केसांची चमक कायम राहते.  

मस्ट अक्सेसरीज

Canva

जसं इतर वेळी पार्टीला जाताना किंवा बाहेर पडताना आपण अक्सेसरीजना प्राधान्य देतो. तसंच पावसाळ्यात केसांसाठी आवश्यक अक्सेसरीजमध्ये समावेश होतो छत्री, रेनकोट किंवा विंडशीटरचा. कारण केस भिजून जास्त वेळ ओले राहिल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच अपायकारक ठरेल. त्यामुळे पावसाळ्यात छत्री, रेनकोट किंवा विंडशीटर नक्की कॅरी करा.

आहारसुद्धा महत्त्वाचा

पावसाळ्यात मिळणारी फळं आणि भाज्या नक्की खा. ज्यातून केसांना आवश्यक पोषण तत्त्वं मिळतील. तसंच गरमागरम चहा-कॉफी पावसाळ्यात कितीही हवीहवीशी वाटली तरी अतिरेक करू नका. कारण कॅफेनयुक्त पेयं प्यायल्याने तुमच्या शरीराचं तापमान वाढतं आणि त्यामुळेही स्कॅल्प तेलकट आणि चिकट होतं.

Shutterstock

तणाव टाळा आणि आनंदी राहा

तणावसुद्धा टाळणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे जास्त घाम येते आणि स्कॅल्प ओलं होतं. मग ओल्या स्कॅल्पमुळेही केसांतून दुर्गंधी येऊ लागते. 

मग पावसाळा एन्जॉय करा पण वरील सांगितलेल्या टिप्सही नक्की फॉलो करा. 

हेही वाचा –  

केस धुताना करू नका या ‘7’ चुका

‘या’ ट्रीक्सने दिसतील तुमचे केस लांबसडक

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

Read More From Care