मनोरंजन

छत्रपती महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान गायले गायक दिव्य कुमारने

Dipali Naphade  |  Feb 20, 2022
ser shivraj hai

रामायण, महाभारतात आजवर अनेक राजांनी आपली भूमिका चोख निभावली. हे राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. अशा महान, पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा असे म्हटले की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय (Chatrapati Shivaji Maharaj) दुसरे कुठले नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती असते. यानिमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे गुणगान प्रसिद्ध पार्श्वगायक दिव्य कुमार (Divya Kumar) ‘सेर सिवराज है’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आला आहे.

अधिक वाचा – अखेर ही मराठी मालिका होणार बंद, कलाकार भावूक

दिव्य कुमारने जिंकले प्रेक्षकांचे मन 

दिव्य कुमारने हिंदी मराठी विश्वात गायलेल्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. नावाजलेल्या हिंदी चित्रपटातील गाणी गात त्याने मराठीतील ‘फत्तेशिकस्त’, ‘कट्यार काळजात घुसली’ या सारख्या अनेक ऐतिहासिक चित्रपटांना बुलंद आवाज दिला. आता महाराजांचे गुणगान गाणारे आणि महाराजांच्या साम्राज्यातले महा कविभूषण यांच्या काव्यावर आधारित रचलेले हे गीत दिव्य कुमारने गायले असून ‘मानस मराठी’ प्रस्तुत असून संजय पटेल निर्मित आहे.  

“सेर सिवराज है” हे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत नवे कोरे गीत एका नव्या स्वरूपात  प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दिग्दर्शक म्हणून ज्ञानेश्वर राजकुले यांनी बाजू गाण्याची उत्तम बाजू सांभाळली. शिवजयंती म्हणजे महाराजांच्या भक्तांसाठी एक सणाचा दिवस. महाराजांसाठी काहीतरी खास करायचं असा हा दिवस. याच दिवसाचे औचित्या साधून हे गाणे प्रसारित करण्यात आले आहे. तसंच या गाण्याला शिवभक्तांनी उदंड प्रतिसादही दिला आहे. दिव्य कुमारने आपल्या आवाजाने प्रेक्षकांचे मन जिंकले असून शिवशाहीराप्रमाणे त्याने हे गाणे गायले आहे असेही आता म्हटले जात आहे. मराठी नसूनही अतिशय उत्तम असा स्वरसाज या गाण्याला दिव्य कुमारने चढवला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

अधिक वाचा – ज्युरासिक वर्ल्ड : डॉमिनियन 10 जून 2022 रोजी थिएटरमध्ये झळकणार

दिव्य कुमारने केले गाणे स्वरबद्ध

divya kumar – ser shiraj hai

‘सेर सिवराज है’ हे गाणे सुप्रसिद्ध गायक दिव्य कुमार यांनी स्वरबद्ध  केले आहे. माझा मल्हार, हे गजानन या गाण्यांचे दिग्दर्शन संगीत दिग्दर्शक प्रसाद शिरसाठ यांनी केले असून देव महादेव, तू जोगवा वाढ ही गाणी अद्याप प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. या गाण्याचे संगीत संयोजनही प्रसाद शिरसाठ यांनी केले असून गाण्याचे बोल आणि दिग्दर्शनातही त्यांचा खारीचा वाटा आहे. शिवाय कविभूषण, योगेश खरात, स्मिता कुलकर्णी, प्रसाद शिरसाठ यांचा देखील गाण्याचे बोल लिहिण्यात वाटा आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग ‘अपोस्ट्रॉफी स्टुडिओ’ नाशिक, ‘डॉन स्टुडिओ’ पुणे आणि ‘साउंड आयडियाज स्टुडिओ’ मुंबई येथे पार पडले. या गाण्यात पुण्याचा लाडका रिल्स स्टार ऋषिकेश कणेकर, चैताली जाधव, अखिल सुगंध, हर्षवर्धन निकम यांनी भूमिका साकारल्या आहेत. 

महाराजांच्या जयंतीनिमित्त हे नवे गाणे ‘मानस मराठी’ युट्यूब चॅनेल वर प्रसारित झाले असून शिवभक्तांना पर्वणीच ठरली आहे. 

अधिक वाचा – माधुरी दीक्षितच्या ‘या’ साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क, काय आहे खासियत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन