बॉलीवूड

गायिका कनिका कपूरचा कोरोनाचा चौथा रिपोर्टही आला पॉझिटिव्ह

Dipali Naphade  |  Mar 29, 2020
गायिका कनिका कपूरचा कोरोनाचा चौथा रिपोर्टही आला पॉझिटिव्ह

गायिका कनिका कपूरच्या शरीरात कोरोना व्हायरसचा संचार अजूनही तसाच आहे. दहाव्या दिवशीही तिला यातून सुटका मिळालेली नाही. तिच्या शरीरातील व्हायरसचे लोड अजूनही तसेच आहे. कनिकाला दहा दिवसांपूर्वी कोरोना असल्याचे कळले. लंडनवरून 9 मार्चला भारतात आलेल्या कनिकाने होम क्वारंटाईन न राहता अनेक ठिकाणी जाऊन प्रोफाईल पार्टीज केल्या. त्यामुळे अनेकांना तिच्यामुळे बाधा झाली असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. मात्र तिच्या सान्निध्यात आलेल्या 262 व्यक्तींपैकी 60 व्यक्तींचे रिपोर्ट नेगेटिव्ह आहेत ही एक दिलासादायक बाब आहे.  अजूनही इतर व्यक्तींची तपासणी चालू आहे. 

चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह

कनिका 9 मार्चला लंडनवरून भारतात आली. मात्र साधारण 19 मार्चला तिची तब्बेत खराब झाल्याने तिचे सँपल कलेक्शन घेण्यात आले. तिला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात कनिकाच्या वागण्यामुळे संतापाची एक लाट उसळली होती. तिच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्ती, मंत्री, संसदेतील बरेच लोक सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. यानंतर संंजय गांधी पीजीआय लखनौमध्ये तिच्या दोन अजून टेस्ट करण्यात आल्या . या दोन्ही पॉझिटिव्ह आल्या.  आता रविवारी पुन्हा तिची चौथी टेस्ट करण्यात आल्यानंतरही त्यातही कनिकाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तिची तब्बेत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र नाव न सांगण्याच्या अटीवर कनिकाचं शरीर ट्रीटमेंटला नीट प्रतिसाद देत नसल्याचेही सांगण्यात आले आहे. तिच्या बरं होण्यासाठी केवळ आपण प्रार्थना करू शकतो असंही सांगण्यात आलं आहे. कनिकाच्या बेजाजबदारपणामुळे अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सर्व व्यक्तींना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

Lockdown च्या काळातील अनोखी लॉकआऊट कोरोना स्पर्धा

रूग्णालयानेही केल्या तक्रारी

इतकं सर्व असूनही रूग्णालयातूनही कनिकाच्या तक्रारी समोर येत आहेत. कनिका नीट वागत नसून ती रूग्णालयातही तिचे स्टारी टॅन्ट्रम्स दाखवत असल्याची सध्या कुजबूज आहे. काही तांत्रिकी बिघाडामुळे तिच्या तिसऱ्या रिपोर्टचा निकाल न मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे. तिचा रिपोर्ट जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत तिला तिथेच राहावं लागणार असून डॉक्टर तिच्यावर उपचार योग्य तऱ्हेने करण्याचं  काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र दहा दिवस होऊन गेल्यानंतरही तिच्या तब्बेतीत तितकीशी सुधारणा नसल्याचेही सांगण्यात आले आहे. तब्बेत स्थिर असूनही कोरोना व्हायरस अजूनही तिच्या शरीरात संक्रमित असल्याचे सांगण्यात आले आहे. 

कोरोना व्हायरसची झळ बॉलीवूडलाही

कनिकावर करण्यात आल्या आहे केस

कनिका कपूरच्या बेजाबदार वागण्यामुळे तिच्यावर लखनौमध्ये एफआयर करण्यात आली आहे. दुर्लक्ष करून तिने विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 279, 270 अन्वये तिच्यावर शहरातील सरोजिनी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनौच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी तिच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. आता कोरोनामधून जरी कनिका बरी होऊन आली तरी तिला या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. या तिच्या कृत्यानंतर तिला काही सेलिब्रिटींनी पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या सेलिब्रिटींनाही यामुळे लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आता इतके दिवस होऊनही कनिकाचा हा आजार अजूनही बरा होत नाहीये. त्यामुळे तिच्या घरच्यांसह तिचे चाहतेही तिच्या रिकव्हरीसाठी नक्कीच प्रार्थना करत आहेत.

#CoronaVIrus: कनिका कपूरचा शहाणपणा सगळ्या देशवासियांसाठी ठरला तापदायक

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From बॉलीवूड