Recipes

फक्त नूडल्स नाही मॅगीपासून बनवा वेगवेगळ्या डिशेस

Aaditi Datar  |  May 3, 2020
फक्त नूडल्स नाही मॅगीपासून बनवा वेगवेगळ्या डिशेस

आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनाच मॅगी नूडल्स हा झटपट होणारा प्रकार आवडतो. कधीही कंटाळा आला की, मॅगी नूडल्सचा पर्याय असतोच. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत मॅगी नूडल्स हे खाल्ले जातात. पण कधीतरी मॅगी नूडल्स खायचा कंटाळा येतो. मग अशावेळी काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही खालील मॅगी नूडल्सपासून बनवता येणाऱ्या विविध डिशेस नक्की करून पाहा. वेळही वाचेल आणि व्हरायटीही मिळेल.

#Maggie नक्की किती वेळ शिजवावं…जाणून घ्या

Canva

मॅगी सँडविच 

मॅगी सँडविच बनवणं अगदी सोपं आहे. जे तुम्ही सकाळी नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा संध्याकाळी लागणाऱ्या छोट्या भूकेच्या वेळीही खाऊ शकता. 

मॅगी कटलेट 

मॅगी कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी नेहमीप्रमाणे मॅगी बनवून घ्या. मग एका बाऊलमध्ये उकडलेला बटाटा कुस्करून त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार मॅगी घालून मिक्स करा. यात थोडं बेसन घाला आणि सर्व मिश्रणाच्या छोट्या छोट्या टिक्की किंवा कटलेट्सचा आकार द्या. या टिक्की तळून गरमागरम सर्व्ह करा. सोबत चटणी, मेयोनीज किंवा सॉस द्या. 

मॅगी पिज्जा

मॅगीपासून पिज्जा आश्चर्य वाटलं ना. सर्वात आधी एका पॅनमध्ये मॅगी बनवून घ्या. मग त्यात थोडा कॉर्न स्टार्च घाला. आता तयार मॅगीला पिज्जासारख्या आकार देण्याचा प्रयत्न करा. आता ही मॅगी एका बाजूने मध्यम आचेवर तीन मिनिटं तव्यावर भाजून घ्या. यानंतर त्यावर पिज्जा सॉस, आवडत्या भाज्या आणि मॉजरेला चीजचं टॉपिंग घाला. नंतर पाच ते सहा मिनिटं पुन्हा मॅगी पिज्जा तव्यावर ठेवून झाकण लावून भाजून घ्या. नंतर ऑरेगानोने गार्निश करून सर्व्ह करा. 

मॅगी स्प्रिंग रोल

मॅगी स्रिंग रोल बनवण्यासाठी एका मध्यम आकाराच्या बाऊलमध्ये मैदा, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं आणि दोन चमचे व्हेजिटेबल तेल घालून कणकेसारखं मळून घ्या. ही कणीक थोडावेळ झाकून ठेवा. तेवढ्या वेळात आवडत्या भाज्या घालून मॅगी बनवून घ्या. नंतर मळलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून लाटून त्यात मॅगीचं फिलींग भरून रोल बनवा आणि तळून घ्या. मग गरमागरम मॅगी स्प्रिंग रोल साल्सासोबत सर्व्ह करा. 

टीप : जर तुम्हाला मॅगी नूडल्स आवडत नसतील तर तुम्ही त्याऐवजी बाजारात मिळणारे इतर नूडल्सही वापरू शकता किंवा गव्हाच्या नूडल्सचाही वापर करू शकता. 

झटपट आणि पौष्टिक सँडविच रेसिपीज

Giphy

तुम्हाला या रेसिपीज आवडल्या का आम्हाला नक्की कळवा. तसंच तुम्हाला #POPxoMarathi वर अजून कोणत्या रेसिपीज वाचायला आवडतील तेही आम्हाला सांगा. आम्ही त्यावर नक्कीच लेख लिहू.

मायक्रोवेव्हमध्ये होणाऱ्या 5 चविष्ट भारतीय रेसिपीज

Read More From Recipes