बॉलीवूड

सोशल मीडियावर रंगलीय सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची चर्चा

Trupti Paradkar  |  Jan 24, 2022
सोशल मीडियावर रंगलीय सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची चर्चा

सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा खूप अॅक्टिव्ह असल्यामुळे तिचा या माध्यमावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. सध्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावरून सेलिब्रेटी चाहत्यांसोबत थेट चर्चा करतात. अशा सेशनला आस्क मी एनिथिंग असं नाव असतं. नुकतंच अभिनेत्री सोनाक्षीनेही असं सेशन आयोजित केलं होतं. सोनाक्षी ट्वीटरवर नेहमीच बेधडक प्रतिक्रिया देत असते. इन्स्टाग्रामवर घेतलेल्या या सेशनमध्येही चाहत्यांनी एक खाजगी प्रश्न विचारताच सोनाक्षीने तिच्या खास अंदाजमध्ये त्याला उत्तर दिलं.

‘गहराईयाँ’ ट्रेलरमधील दीपिकाचा बोल्ड सीन पाहून रणवीर सिंहने शेअर केली पोस्ट

काय दिलं सोनाक्षीने उत्तर

सोनाक्षीला या सेशनमध्ये चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. जसं की त्या वेळी नेमकं काय करत आहे असा एक प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावेळी तिने मी सोफ्यावर बसून सध्या मस्त मार्वल मूव्ही पाहत आहे असं सांगितलं.  एकीने तिला तिची आवडती नोज पिन कोणती  हे विचारलं तेव्हा तिने तिचा नोज पिनसह असलेला फोटो शेअर केला. मात्र जेव्हा तिला विचारण्यात आलं की मॅडम सगळे लग्न करत आहेत तुम्ही लग्न कधी करणार ?  तेव्हा मात्र सोनाक्षीने तिच्या बेधडक शैलीत एक मजेशीर उत्तर त्या चाहत्याला दिलं. या प्रश्नाचं उत्तर देताना सोनाक्षी म्हणाली की, सध्या प्रत्येकाला कोविड 19 होत आहे तर मला पण तो व्हायलाच हवा का? असा प्रतिप्रश्न ऐकताच त्या चाहत्याची बोलती बंद झाली.

ब्रेकअपवर व्यक्त झाली अभिनेत्री रुपाली भोसले, म्हणाली…

कोण आहे सोनाक्षीचा राजकुमार

सोनाक्षी सिन्हा दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. बारा वर्षांपूर्वी तिने दबंग चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दबंगच्या सीक्वलमध्ये तर ती झळकलीच पण याशिवाय अनेक चित्रपटामधून तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेच शिवाय हजरजबाबीपण आहे. त्यामुळे ती कोणत्याच प्रकारच्या ट्रोलिंगला घाबरत नाही आणि बिनधास्त स्टाईलमध्ये वावरताना दिसते. सध्या तिचे नाव नोटबूक फेम अभिनेता जहिर इकबाल याच्यासह जोडलं जात आहे. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे लवकरच जहिर शत्रुघ्न सिन्हाचा जावई होणार अशी चर्चा आहे. लवकरच सोनाक्षी आणि जहिर डबल एक्स या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ज्याचं दिग्दर्शन सतराम रामाणी करत आहे. त्यामुळे या दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री किती जुळते हे लवकरच चाहत्यांच्या समोर येईल. या चित्रपटात हुमा कुरेशीदेखील मुख्य भूमिकेत असेल आणि  या चित्रपटाचा विषय बॉडी शेमिंग आहे. 

संजय दत्त आणि रवीना टंडन या कॉमेडी चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

Read More From बॉलीवूड