अभिनेता सोनु सूद हा बॉलीवूडचा एक असा सेलिब्रेटी आहे जो सतत लोकांच्या मदतीसाठी पुढे येतो. लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेकांना भरभरून मदत केली. काही दिवसांपूर्वी त्यांना शांताबाई पवार या पंच्याऐंशी वर्षांच्या आजीचे स्वप्न पूर्ण केले होते.आता सोनु पुन्हा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढे सरसावला आहे. सोनुने हरियाणामधील एका खेडे गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत भरघोस मदत आहे. त्याने या गावातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी ही मोलाची मदत या मुलांना केली आहे.
ऑनलाईन शिक्षणासाठी वाटले स्मार्टफोन
हरियाणामधील कोटी हे एक खेडेगाव आहे. सध्या लॉकडाऊन संपला असला तरी शाळा सुरू झालेल्या नाहीत. अनेक शहरांमध्ये ऑनलाईन शाळेतून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र ज्यांच्याकडे स्मार्ट फोन अथवा इंटरनेट नाही अशा विद्यार्थ्यांना आजच्या आधुनिक युगातही शिक्षणापासून वंचित राहवं लागत आहे. सध्या शिक्षणक्षेत्रात ऑनलाईन क्लासशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नाही. हरियाणामध्येही अशी अनेक खेडेगाव आहेत. जिथे अजून स्मार्टफोन अथवा अत्याधुनिक सुविधा मुलांना मिळू शकत नाहीत. अशा खेडेगावातील मुलांनाही या काळात शिक्षण मिळावं यासाठी सोनुने कोटी गावातील मुलांना स्मार्टफोन उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामुळे या मुलांची शिक्षणाची समस्या सध्या तरी नक्कीच सुटली आहे. आता ही मुलं या स्मार्टफोनवर आपापल्या घरी आरामात अभ्यास करत आहे. सोनुने या गावातील माध्यमिक विद्यार्थ्यांना त्याचा मित्र करण गिल्होत्रा यांच्या हस्ते हे स्मार्टफोन पाठवले आहेत. हे सर्व फोन या गावातील शाळेच्या मुख्याधापकांकडे सूपूर्द करण्यात आले. मुलांना त्यांच्याकडूनच ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. सोनुने फोन पाठवल्यावर व्हिडिओ कॉलच्या माध्यमामतून या सर्व विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. याबाबत सोनुने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत माहिती दिली आहे. त्याने शेअर केलं आहे की, “सर्व विद्यार्थ्यांना असा ऑनलाईन अभ्यास करताना बघून मला खूप आनंद झाला आहे “त्याच्या या उपक्रमाचे समाजातील अनेकांकडून कौतूक होत आहे. एका महिलेने या ट्वीटवर “पढेगा इंडिया तभी बढेगा इंडिया” अशी कंमेट केली आहे.
सोनु सूदची समाजसेवा सुरूच
सोनू गेल्या काही दिवसांपासून समाजसेवेत रमला आहे. अनेकांच्या मदतीसाठी तो धावून आल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपू्र्वी जेईईच्या परिक्षेला स्थगित करण्यासाठी त्याने मागणी केली होती. एवढंच नाही तर काही दिवसांपासून सोशल मीडियावर शांताबाई पवार हे नाव झळकत आहे. या आजी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी काठी वेगाने फिरवून त्यांच्यामधील कलेचं प्रदर्शन करत आहेत. कोरोनाच्या काळात कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांना या वयात रस्त्यावर उतरत त्यांचा कला सादर करावी लागत होती. मात्र सोनुने या आजींना मदत करत त्यांचे स्वप्न असलेले मार्शल आर्ट सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. गणेश चर्तुर्थीच्या शुभमुहूर्तावर त्याने या आजींचे स्वप्न पूर्ण केले आहे. कोरोनाच्या काळात अनेकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करून त्याने त्याच्यामधील माणूसकी दाखवून दिली आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
एस. एस. राजमौलीच्या ‘RRR’ मध्ये आता आलियाऐवजी प्रियांकांची वर्णी
यशराज फिल्म्सचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, नवीन लोगो होणार प्रदर्शित
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje