Weight Loss

मसाजनेही कमी होईल वजन, जाणून घ्या सोपी पद्धत

Trupti Paradkar  |  Mar 2, 2021
मसाजनेही कमी होईल वजन, जाणून घ्या सोपी पद्धत

वाढतं वजन ही आजकाल लोकांची एक गंभीर समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. डाएट अथवा हेव्ही वर्क आऊट करूनही तुमचं वजन जर कमी होत नसेल तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. एवढे प्रयत्न करूनही वजन कमी झालं नाही की मग निराश होऊन ते सर्व प्रयत्न बंद करतात. पण असं मुळीच निराश होऊ नका. कारण वजन कमी करण्यासाठी आणखी अनेक उपाय आहेत. योग्य पद्धतीने मसाज अथवा मालिश करूनही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. काही संशोधनानुसार डाएट, व्यायाम आणि मसाज या तिन्ही गोष्टी एकत्र केल्याने तुमचं वजन नक्कीच कमी होऊ शकतं. 

वजन कमी करण्यासाठी कसा परिणामकारक आहे मसाज

अॅरोमा थेरपी मसाजचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. आरोग्यासोबतच यामुळे तुमच्या शरीराला सुडौल आकारही मिळू शकतो. या मसाजमुळे तुमचा मूड चांगला होतो, तुमच्या शरीरातील वेदना कमी होतात,मानसिक स्वास्थ मिळते.  अॅरोमाथेरपी मसाजसाठी तुम्हाला काही विशिष्ठ इसेंशिअल ऑईल्सचा वापर करावा लागतो. यासाठी मसाजमधील कौशल्य पारंगत करण्याची गरज नाही. हलक्या  हाताने तेलाने शरीरावर मालिश करूनही तुम्हाला हवा तसा परिणाम मिळू शकतो. मात्र लक्षात ठेवा चुकीच्या पद्धतीने मसाज मुळीच करू नका. कारण रगडून अथवा चुकीच्या पद्धतीने केलेल्या मसाजमुळे तुमच्या आरोग्य समस्या अधिक वाढू शकतात. यासाठी मसाज करण्यास सुरूवात करण्यापूर्वी तज्ञ्जांचा  सल्ला अवश्य घ्या. नियमित मजास केल्यामुळे तुमच्या पोट, हाताचे दंड, पोटऱ्या आणि कंबरेजवळी चरबी कमी होऊ शकते. शिवाय तुमची बॉडी टोन्डदेखील होते. त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. 

shutterstock

मसाज करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल

मसाज अथवा मालिश करण्यापूर्वी या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या.

तज्ञ्जांच्या मदतीने तुम्ही परिणामकारक इतर मसाज ट्रिटंमेट घेऊ शकता. जसं की वॅक्युम मसाज, हा मसाज खास वजन कमी करण्यासाठीच डिझाईन केलेला आहे. मात्र अशा काही स्पेशल मसाजसाठी तुम्हाला तज्ञ्ज व्यक्तीचीच मदत घ्यावी लागू शकते. 

shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

वजन कमी करायचं आहे मग नियमित खा ‘भाकरी’

लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी

वजन कमी करण्यासाठी आहारात करा अळीवचा समावेश

 

Read More From Weight Loss