बॉलीवूड

श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ‘मॉम’ चीनमध्ये रिलीज होणार

Aaditi Datar  |  Feb 27, 2019
श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ‘मॉम’ चीनमध्ये रिलीज होणार

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या अभिनयाने सजलेला ‘मॉम’ हा चित्रपट 22 मार्चला रिलीज करण्यात येणार आहे.

रिपोर्टसनुसार पॉलंड, रशिया, युएई, अमेरिका आणि सिंगापूरसकट 40 देशांमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. त्यानंतर आता हा चित्रपट चीनमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.  


हा चित्रपट रिलीज करण्यामागील कारणही तसंच खास आहे. प्रत्येक कलाकार त्याच्या अभिनयाच्या रुपात एक वारसा आपल्यासाठी ठेऊन जातो. श्रीदेवीचा मॉम हा सिनेमा यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हा चित्रपट जिथे जिथे रिलीज झाला, त्या त्या ठिकाणी या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा मार्मिक चित्रपट मोठ्या आणि व्यापक प्रमाणावर रिलीज करणं ही गर्वाची गोष्ट आहे.   

रवि उद्यावार यांनी दिग्दर्शित केलेला या सिनेमात श्रीदेवीने एका अशा आईची भूमिका केली होती, जी आपल्या सावत्र मुलीचा बदला घेण्यासाठी बाहेर पडते. या भूमिकेसाठी श्रीदेवीला मरणोत्तर सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.   

चीनमध्ये श्रीदेवीचा शेवटचा सिनेमा रिलीज करण्यात येण्याबद्दल बोनी कपूर यांनी सांगितलं की, ‘मॉम हा असा सिनेमा जो हरप्रकारे प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. हा श्रीदेवीचा शेवटचा सिनेमा होता आणि आमचं हेच लक्ष्य आहे की, हा सुंदर सिनेमा आणि श्रीदेवीचा हा अविस्मरणीय शेवटचा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाहता यावा.’

‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटानंतर श्रीदेवीने 2017 मध्ये रवि उद्यावार यांच्या मॉम मध्ये अभिनय केला होता.

तसंच मागच्या वर्षी रिलीज झालेल्या शाहरूख खानच्या ‘जीरो’ या चित्रपटातही श्रीदेवी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती.

फोटो सौजन्य – Instagram

हेही वाचा – 

अभिनेत्री श्रीदेवीचे टॉप 10 चित्रपट, ज्यामुळे ती झाली सुपरस्टार

चांदनीच्या साडीचा लिलाव सुरु, किंमत ऐकाल तर थक्क व्हाल

जेव्हा माधुरीने सांगितल्या श्रीदेवीसोबतच्या आठवणी

Read More From बॉलीवूड