xSEO

जाणून घ्या गरोदरपणात बाळाची वाढ | Stages Of Pregnancy In Marathi

Trupti Paradkar  |  Apr 20, 2020
Stages Of Preganancy In Marathi

गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. मासिक पाळी चुकल्यानंतर पुढील दोन आठवड्यामध्ये कोणत्याही क्षणी गर्भधारणा राहण्याची शक्यता असते. सेक्सनंतर शूक्राणू स्त्रीच्या गर्भाशयातून स्त्रीबीजापर्यंत पोहचतात आणि त्यांच्या मिलनातून ‘गर्भधारणा’ होते. जाणून घ्या Pregnancy Symptoms In Marathi | गर्भधारणा झाली कसे ओळखावे. गर्भधारणा झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात गर्भाची वाढ कशी होते (Balachi Vadh Kashi Hote) हे प्रत्येक स्त्रीला जाणून घ्यायचं असतं. गर्भाची वाढ (Garbhachi Vadh) आणि विकास टप्प्या टप्प्याने होत असतो. यासाठीच प्रत्येक महिन्यात गर्भात होणारे बदल निरनिराळे असतात. गरोदरपणात बाळाची वाढ काही महिने झपाट्याने होत असते. यासाठीच या काळात गरोदर स्त्रीची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र या नऊ महिन्यामधील कोणत्या महिन्यात किती काळजी घ्यावी हे प्रत्येक स्त्रीच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असतं. यासाठीच जाणून घ्या गरोदरपणात गर्भाची वाढ कशी होते.

garbhachi vadh

गरोदरपणाचा पहिला महिना – First Month Of Pregnancy

पाळी चुकल्यानंतर एक आठवड्याच्या आत तुम्हाला तुम्ही गरोदर आहे हे समजते. याचा अर्थ पहिल्या महिन्यात गर्भ दोन आठवड्यांचा झालेला असतो. जरी घरगुती प्रेगन्सी टेस्ट करून तुम्ही गरोदर आहात हे तपासता येत असले तरी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्वरीत डॉक्टरांकडून टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. कारण गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात महिलांनी काही बाबतीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. या काळापासूनच तुम्ही बाळाशी संवाद साधू शकता. गुणी बाळ निपजण्यासाठी पहिल्या महिन्यापासूनच बाळावर गर्भसंस्कार केले जातात. गरोदर पहिला महिना लक्षणे आणि घ्यायची काळजी जाणून घ्या (Pregnancy First Month Care Tips)

गर्भाची वाढ कशी होते (Balachi Vadh Kashi Hote)

गरोदरपणाचा दुसरा महिना – Second Month Of Pregnancy

दुसऱ्या महिन्यापर्यंत बाळाची वाढ जवळजवळ एक इंच इतकी झालेली असते. दुसऱ्या महिन्यानंतर ही वाढ आणखी झपाट्याने होऊ लागते. दुसऱ्या महिना देखील बाळाच्या वाढ आणि विकासासाठी तितकाच महत्त्वाचा असतो

गर्भाची वाढ कशी होते (Balachi Vadh Kashi Hote)

Stages Of Pregnancy In Marathi

गरोदरपणाचा तिसरा महिना – Third Month Of Pregnancy

तिसऱ्या महिन्यात बाळाच्या अवयवांची वाढ मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक जोमाने होऊ लागते. यासाठीच तीन महिन्यांपर्यंत महिलांना खूप काळजी घ्यावी असं सांगितलं जातं. तिसरा महिना झाल्यावर गर्भ गर्भाशयात योग्य पद्धतीने तग धरतो. यासाठीच भारतीय संस्कृतीत या महिन्यात गरोदर महिलेची चोरओटी भरायची पद्धत आहे. त्याआधी बाहेरील लोकांना गरोदर असल्याचं सांगितलं जात नाही. यासाठीच जाणून घ्या गरोदपणाच्या तिसऱ्या महिन्यात काय घ्यावी काळजी (3rd Month Pregnancy In Marathi)

गर्भाची वाढ कशी होते (Balachi Vadh Kashi Hote)

नॅचरल स्ट्रेच ऑईल – 

तिसऱ्या महिन्यानंतर जस जशी बाळाची वाढ होत जाते, तस तसा तुमच्या पोटाचा आकार वाढू लागतो. यासाठीच या काळात जर तुम्ही चांगल्या तेलाने पोटाला हलका मसाज केला, तर बाळंतपणानंतर पोटावर दिसणारे स्ट्रेच मार्क्स कमी येतात. यासाठीच तुम्ही दी मॉम कं.चे नॅचरल स्ट्रेच ऑईल वापरू शकता. यात रोझशिप ऑईल, सी बकर्थान ऑईल, नारळाचे तेल आणि व्हिटॅमिन ई सारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होत नाहीत अथवा गर्भाला त्रास होत नाही.

गरोदरपणातील चौथा महिना – Fourth Month Of Pregnancy

गरोदरपणातील चौथा महिना (Pregnancy 4th Month in Marathi)  अतिशय सावधगिरीने राहण्याचा आहे. पहिल्या एक ते तीन महिन्यांच्या कालावधीला पहिली तिमाही असं म्हणतात. चौथ्या महिन्यात तुम्ही पहिल्या तिमाहीमधून दुसऱ्या तिमाहीत प्रवेश करता. दुसरी तिमाही चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या महिन्यापर्यंत असते. चौथ्या महिन्यात तुमच्या बाळाचा आकार वाढू लागतो. चौथ्या महिन्याच्या सोनोग्राफीत तुम्हाला बाळाच्या ठोक्यांचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येऊ लागतो. तुम्ही या काळात तुमच्या बाळाशी मनातून संवाददेखील साधू शकता.

गर्भाची वाढ कशी होते (Balachi Vadh Kashi Hote)

गर्भाची वाढ कशी होते

गरोदरपणातील पाचवा महिना – Fifth Month Of Pregnancy

पाचवा महिना सुरू आहे म्हणजे तुम्ही आता दुसऱ्या तिमाहीत स्थिरावत आहात. पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीपेक्षा हा काळ सुखावह असतो. कारण या महिन्यात बाळाची वाढ हळूवारपण योग्य पद्धतीने होत असते. आईचं शरीर आणि गर्भाची वाढ यामध्ये सुसंगत निर्माण झाल्यामुळे या काळात गरोदर महिलांना जास्त त्रास होत नाही.

गर्भाची वाढ कशी होते (Balachi Vadh Kashi Hote)

नॅचरल बॉडी बटर

बाळाची वाढ होत असताना तुमच्या पोटाचा आकार वाढू लागतो. ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते आणि ताणली जाते. बऱ्याच जणींना गरोदरपणात पोटाला यामुळे खाज येण्याचा त्रास जाणवतो. असं असेल तर तुम्ही दी मॉम कं. चे बॉडी बटर तुमच्या पोटावर लावू शकता. यात असलेलं कोका बटर, शीया बटर, रोझशिप ऑईल आणि सी बकर्थान ऑईल तुमच्या त्वचेला थंडावा देतं आणि मऊ ठेवतं. 

गरोदरपणातील सहावा महिना – Sixth Month Of Pregnancy

गर्भारपणातील सहाव्या महिन्यामध्ये (6 Month Pregnancy in Marathi) बाळाचे वाढलेले अनेक अवयव विकसित होतात. ज्यामुळे बाळ तुमच्याशी संवाद साधू लागते. बाळाला तुमचे विचार, बाहेरून येणारे ध्वनि समजू लागतात. गर्भसंस्कारासाठी हा अतिशय योग्य काळ असतो.

गर्भाची वाढ कशी होते (Balachi Vadh Kashi Hote)

balachi vadh kashi hote

गरोदरपणाचा सातवा महिना – Seventh Month Of Pregnancy

सातव्या महिन्यापासून तुम्ही दुसऱ्या तिमाहीतून तिसऱ्या तिमाहीत प्रवेश करता. ज्यामध्ये सातव्या, आठव्या आणि नवव्या महिन्यांचा समावेश असू शकतो. सातव्या महिन्यात बाळाची वाढ आणि विकास वेगाने होत असतो. सातव्या महिन्यात बाळाच्या अवयवांची पूर्ण वाढ झालेली असते. मात्र असं अजूनही आणखी काही आठवडे त्याच्या शरीराच्या पूर्ण विकासासाठी गरजेचे असतात. 

गर्भाची वाढ कशी होते (Balachi Vadh Kashi Hote)

गरोदरपणात आठवा महिना – Eighth Month Of Pregnancy

गरोदरपणात आठवा महिना म्हणजे स्वतःच्या आणि बाळाच्या जपणूकीसाठी अतिशय महत्त्वाचा महिना आहे. कारण सातवा महिना पूर्ण झाल्यावर बाळाचा जन्म होण्याची शक्यता अधिक वाढते. ज्याला आपण मुदतपूर्व प्रसूती अथवा प्रिमॅच्युअर बेबी असं म्हणतो. मात्र अशा वेळेआधीच जन्मलेल्या बाळाची विशेष दक्षता घ्यावी लागते. म्हणूनच बाळाच्या पूर्ण विकास आणि वाढीनंतरच त्याचा जन्म होणं गरजेचं आहे.

गर्भाची वाढ कशी होते (Balachi Vadh Kashi Hote)

गरोदरपणातील नववा महिना – Ninth Month Of Pregnancy

गरोदरपणातील नववा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण बाळाच्या फुफ्फुसांची वाढ आता योग्य पद्धतीने पूर्ण झालेली असते ज्यामुळे बाळ आता कधीही जन्माला येऊ शकते.  यासाठी गरोदरपणाच्या 9 व्या महिन्यात काळजी घेण्यासाठी टिप्स

कसा असतो प्रसूतीपूर्व काळ (Balachi Vadh Kashi Hote)

Stages Of Pregnancy In Marathi

गरोदरपणात बाळाची होणारी वाढ याबाबत मनात असलेले प्रश्न – FAQ’s

प्रश्न –  माझ्या बाळाची वाढ योग्य पद्धतीने होत आहे हे मला कसे समजेल ?

उत्तर – आजकाल डॉक्टरांच्या मदतीने सोनोग्राफीच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या बाळाची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होत आहे का हे सहज समजू  शकते. त्यामुळे यासाठी योग्य तज्ञ्जांचा सल्ला घ्या.

प्रश्न –  कोणत्या महिन्यात बाळाचा विकास वेगाने होतो ?

उत्तर – गर्भधारणेपासून नवव्या महिन्यापर्यंत बाळाचा विकास टप्प्या टप्प्याने होत असतो. मात्र तिसरी तिमाही सुरू झाल्यावर म्हणजेच सातव्या आणि आठव्या महिन्यात बाळाचा विकास झपाट्याने होत असतो. म्हणूनच पहिल्या तिमाहीत आणि शेवटच्या तिमाहीत गरोदर स्त्रीने योग्य काळजी घ्यावी. 

प्रश्न – बाळाची वाढ खुंटण्यामागे काय कारणे असू शकतात ?

उत्तर – बाळाची वाढ कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की मातेचे अपूरे पोषण, गर्भाला पुरेसा ऑक्सिनज न मिळणे इ. मात्र याचा परिणाम गर्भावर विपरित होऊ शकतो. यासाठी अशा अवस्थेत त्वरीत तज्ञ्जांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

प्रश्न – गरोदरपणातील कोणते महिने जास्त कष्टप्रद आणि धोक्याचे असतात ?

उत्तर – गरोदरपणातील पहिले तीन महिने हे नेहमीच कष्टाचे आणि धोक्याचे असतात. कारण या काळात गर्भ रुजत असतो. या काळात काळजी न घेतल्यास गर्भपाताची शक्यता अधिक असते.

प्रश्न – गर्भधारणा झाल्यावर व्यायाम करावा का ?

उत्तर – गर्भधारणेनंतरही तुम्ही फिट राहण्यासाठी आणि सुलभ प्रसूतीसाठी व्यायाम करू शकता. मात्र यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण तुमच्या आरोग्य स्थितीवरून ते याबाबत योग्य सल्ला तुम्हाला देऊ शकतात. 

Conclusion – गरोदरपणाचा काळ कितीही सुखाचा आणि आनंदाचा असला तरी या काळात स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिरृक आरोग्यात अनेक बदल होत असतात. यासाठीच गरोदरपणात स्वतःची आणि बाळाची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. 

Read More From xSEO