या वर्षाच्या सुरूवातीपासून सुश्मिता सेन (Sushmita Sen) आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl) वेगळे झाले अशी चर्चा होती. मात्र या मुद्द्यावर दोघांनीही काहीच बोलणं पसंत केलं नव्हतं. मात्र सोशल मीडियावर अखेर सर्व अफवांना पूर्णविराम देत सुश्मिता सेनने कायम मित्र राहू अशा स्वरूपाची पोस्ट करत ब्रेकअप (Sushmita Sen-Rohman Shawl Breakup) झाल्याचे स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपासून रोहमन आणि सुश्मिता एकत्र राहात नसून रोहमन आपल्या मित्रांसह एकत्र राहात असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र यावर दोघांनाही काहीही न बोलणे पसंत केले होते. पण आता सुश्मिताने याबाबत स्पष्टता देत कायम मित्र राहू अशा स्वरूपाची पोस्ट केली आहे आणि तीच पोस्ट रोहमनने रिपोस्ट करत सुश्मिता आपलं कुटुंब असून कायम तिच्यासोबत आपण असू अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.
अधिक वाचा – देवमाणूस’ मालिकेची दणक्यात सुरुवात
लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी होती चर्चा
इतर अनेक अभिनेत्रींप्रमाणेच सुश्मिता आणि रोहमनदेखील लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा होती. तर रोहमनही सुश्मिताची खूपच काळजी घेताना दिसून यायचा. इतकंच नाही सुश्मिताच्या दोन्ही मुलींना वडिलांप्रमाणे रोहमन प्रेम देत होता असेही अनेकदा सोशल मीडियावर सुश्मिताने पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून दिसून येत होते. या दोघांची जोडी अतिशय सुंदर आणि अप्रतिम असून दोघांनी लग्न करावे अशी अनेकांची इच्छा होती. मात्र आता अचानक या दोघांचे ब्रेकअप (Breakup) झाल्यामुळे या दोघांच्याही चाहत्यांचे मन नक्कीच तुटले आहे. सुश्मिता सेनने दोघांचा फोटो पोस्ट करत अखेर या गोष्टीवर मोहोर लगावली आहे. ‘मैत्रीनेच आपली सुरूवात झाली होती, आपण नेहमीच मित्र राहू. नातं आधीच संपलं होतं पण प्रेम कायम आहे’ अशा स्वरूपाचे कॅप्शन देत सुश्मिताने आता आपण एकत्र नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर रोहमननेदेखील ही रिपोस्ट करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. #nomorespeculations #liveandletlive #cherishedmemories #gratitude #love #friendship असे हॅशटॅग वापरत सुश्मिताने आपण आता या नात्यात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा – National Farmers Day: प्रिटी झिंटाची शेती…घरच्या अंगणात फुलवली बाग
सुश्मिता आणि रोहमन भेटले होते सोशल मीडियावर
सुश्मिता सेन आणि रोहमन या दोघांची भेट सोशल मीडियावरच झाली होती. रोहमनने सुश्मिता सेनला इन्स्टाग्रामवर सर्वात आधी मेसेज केला होता. त्यानंतर दोघांची भेट एका फॅशन शो दरम्यान झाली. पहिल्याच भेटीत सुश्मिताला रोहमन आवडला आणि त्यांच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. दरम्यान साधारण दोन वर्ष हे दोघे एकत्र राहात होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी दोघेही एकत्र हजेरी लावत होते. नुकतेच दोघांनीही दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एकमेकांना शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र या वर्षाच्या सुरूवातीपासूनच या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असून रोहमनने सुश्मिताचे घर सोडल्याच्या चर्चा होत्या. अखेर यावर आज सुश्मिताने शिक्कामोर्तब केले. रोहमनच्या आधी विक्रम भट्ट, रणदीप हुडा, रितीक भसीन, मुदस्सर अजीज अशा अनेकांना सुश्मिताने डेट केले आहे. तर सुश्मिताचे नाव अनेक व्यक्तींबरोबरही जोडण्यात आले होते. मात्र रोहमनसह सुश्मिता लग्न करेल असे अनेकांना वाटत होते. या ब्रेकअपमुळे नक्कीच चाहत्यांची निराशा झाली आहे. दरम्यान सध्या सुश्मिता सेन तिच्या ‘आर्या’ या वेबसिरीच्या दुसऱ्या भागासाठीही चर्चेत आहे.
अधिक वाचा – रणवीर-शाहिदनंतर आता कार्तिक झाला क्रिकेटर
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade