बॉलीवूड

‘स्वदेश’ मधील शाहरूखची आई कावेरी अम्माचे निधन

Dipali Naphade  |  Feb 18, 2020
‘स्वदेश’ मधील शाहरूखची आई कावेरी अम्माचे निधन

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवलेल्या अभिनेत्री आणि स्वदेश मध्ये शाहरूखची आईची भूमिका साकारून सर्वांच्या मनात आपल्या अभिनयाने घर कलेल्या किशोरी बलाल यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून किशोरी आजारी होत्या. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करून ही दुःखद बातमी दिली. किशोरी बलाल यांनी 1960 पासून आपल्या चित्रपटसृष्टीतील करिअरला त्यांनी सुरुवात केली. दाक्षिणात्य चित्रपटांसह त्यांनी बॉलीवूडमध्येही काम केलं. बेंगलुरूच्या एका रुग्णालयात त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला आहे. 

मिस वर्ल्ड अदिती आर्याला मिळाली सुवर्णसंधी

आशुतोष गोवारीकरने केले ट्विट

आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेश’ या चित्रपटाची महत्त्वाची भूमिका किशोरी बलाल यांनी साकारली होती. त्याशिवाय त्यांनी विविध भाषांच्या चित्रपटातही काम केले होते. मात्र दाक्षिणात्य चित्रपटात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. किशोरी बलाल यांच्या शांत  अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्वदेशमधून किशोर बलाल यांना जास्त ओळख मिळाली. यामध्ये शाहरूख खानच्या कावेरी अम्माची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या मनाला खूपच भावली होती. किशोरी बलाल यांच्या निधनाची बातमी आशुतोष गोवारीकरने ट्विट केली.  ‘हृदयद्रावक! किशोरी बलाल यांच्या निधनाने मला प्रचंड दुःख होत आहे. तुमच्या स्वभावातील दयाळूपणा, प्रेमळपणा आणि प्रेम यामुळे तुम्ही माझ्या कायम लक्षात राहाल. तसंच स्वदेशमधील तुम्ही साकारलेली कावेरी अम्मा कायम आठवणीत राहण्यासारखी आहे. खरंच तुमची सतत आठवण येत राहील.’ अशी भावनिक पोस्ट आशुतोष गोवारीकरने केली आहे. या पोस्टसह त्याने किशोर बलाल यांचा फोटोही शेअर केला आहे. आशुतोषच्या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली असल्याने आशुतोष त्यांच्या जास्त जवळचा होता. त्यांचे बाँडिंग अतिशय चांगले होते. त्यामुळेच त्यांची पोकळी कधीही भरून निघणार नाही. वयस्करपणामुळे अनेक दिवस किशोर बलाल आजारी होत्या. शेवटच्या क्षणी बंगलुरूमधील एका रूग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे सांगण्यात आले आहे. 

रणबीरसोबतच्या लग्नाच्या गॉसिप म्हणजे केवळ बातम्या- आलिया

किशोरी बलाल यांनी केल्या विविध भूमिका

किशोरी बलाल यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये अनेक विविध भूमिका साकारल्या. आपल्या करिअरमध्ये त्यांनी 72 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या करिअरला सुरूवात जरी 1960 मध्ये झाली असली तरी त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती स्वदेश चित्रपटाने. कर्नाटकमध्ये जन्म झालेल्या या अभिनेत्रीने सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं. अतिशय प्रेमळ आणि लाघवी अशी त्यांची ओळख होती. तसेच त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सर्वांना आपल्याशा वाटणाऱ्या अशाच या अभिनेत्री होत्या.  कोणत्याही प्रकारच्या कॉन्ट्रॉवर्सीमध्ये न अडकता आपल्या कामाशी काम ठेवणाऱ्या अशा या अभिनेत्री विरळाच होत्या. त्यांच्या निधनामुळे एक पोकळी तयार झाल्याचंही सध्या म्हटलं जात आहे. ‘काही’, ‘आसरा’, ‘नानी’, ‘क्विक गन मुरूगन’ असे काही त्यांंचे गाजलेले चित्रपट आहेत. ‘अमृथावर्षिनी’ ही त्यांची टीव्हीवरील गाजलेली मालिका होती. कन्नडा चित्रपटांमध्ये त्यांनी जास्त भूमिका केल्या होत्या. कन्नडा फिल्म इंडस्ट्री त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करत आहे. 

मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार ‘बोनस’

सोशल मीडियावर चाहत्यांनी केली हळहळ व्यक्त

सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी किशोरी बलाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले की, किशोरी बलालसारख्या दिग्गज अभिनेत्रीच्या निधनाची बातमी ऐकून खूपच दुःख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रमैत्रिणींना या दुःखातून सावरण्यासाठी साहस मिळो. तर दुसऱ्या युजरने लिहिले, किशोरी बलाल या जगातून निघून गेल्या. स्वदेशमधील त्यांची भूमिका नेहमी लक्षात राहील. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From बॉलीवूड