स्वराज्याचं स्वप्नं उरी बाळगणाऱ्या जिजाच्या बालपणापासून सुरू झालेली ‘स्वराज्य जननी जिजामाता’ ही मालिका! या मालिकेने जिजाबाईंच्या आयुष्यातले कित्येक महत्त्वपूर्ण टप्पे प्रेक्षकांसमोर मांडले. जिजाबाई लखुजी जाधव ते जिजाबाई शहाजी भोसले हा प्रवास आपण पाहिला. राजमाता जिजाऊंची माहिती आपल्याला जाणून घ्यायला नक्की आवडेल. त्यांचं स्वराज्याचं स्वप्न, अन्यायाविरोधातील चीड या सगळ्या गोष्टी मालिकेत मांडल्या गेल्या आहेत. या माऊलीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण लवकरच मालिकेत दाखवला जाणार आहे. हा क्षण आहे शिवरायांच्या जन्माचा. शिवनेरी गडावर या मुलखावेगळ्या आईच्या पोटी शिवबा जन्मला. इतिहासातला हा सुवर्णक्षण !
शिवजन्माचा सुवर्णक्षण
या सोन्यासारख्या क्षणाचा सोहळा सोनी मराठी पु. ना. गाडगीळ यांच्या साथीने साजरा करत आहे. ज्यांनी स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेसाठी खास दागिने तयार केले आहेत. तसंच लहानग्या शिवबासाठीदेखील पु. ना. गाडगीळ यांनी खास दागिने तयार केले आहेत.
तुम्हालाही संधी शाही नथ जिंकण्याची
तुम्हीही या मालिकेच्या निमित्ताने ‘शाही नथीचा नजराणा’ प्रश्नमंजुषेत सहभागी होऊन जिंकू शकता पु. ना. गाडगीळ यांनी खास तयार केलेली सोन्याची नथ आणि ठुशी.
असा घेऊ शकता सहभाग
शिवजन्मानिमित्त आयोजित ‘शाही नथीचा नजराणा’ या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी sonymarathi.com वर लॉग इन करून रात्री ८.३० वाजता, स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत. या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या स्पर्धकांपैकी एका भाग्यवान विजेत्याचं नाव दुसऱ्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या भागातून जाहीर केलं जाणार आहे.
8 ते 19 फेब्रुवारीदरम्यान दररोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या प्रेक्षकांमधून एक विजेता ठरणार असून त्याला भेट दिली जाणार आहे पु. ना. गाडगीळ यांनी खास तयार केलेली शाही नथ तर एका महाविजेत्याला मिळणार आहे पु. ना. गाडगीळ यांच्या ठुशीचा मान!
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade