अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगामी चित्रपट ‘रश्मि रॉकेट’साठी चांगलीच मेहनत घेत असल्याचं दिसत आहे. तिने यासाठी डायटिंग तर केलंच आहे शिवाय मैदानावर वर्कआऊट करत ती तिचा फिटनेस मेंटेन करत आहे. कारण या चित्रपटात ती एका एथलिटची भूमिका साकारणार आहे. ज्यामुळे या भूमिकेसाठी ती सध्या जीवापाड मेहनत घेताना दिसतेय. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोमधून ती घेत यासाठी मैदानावर घाम गाळत घेत असलेली मेहनत स्पष्ट दिसून येत आहे. तापसीचे हे फिटनेस फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
तापसीने सुरू केलं रश्मि रॉकेटचं शूटिंग
तापसीने तिच्या इन्स्टावर शेअर केल्याप्रमाणे ती सध्या रश्मि रॉकेटच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टवर फोटोसोबत कॅप्शन दिली आहे की, “गेट सेट….” ज्यात ती रनिंग पोझिशनमध्ये असलेली दिसत आहे. या पोझिशनमध्ये तापसी अतिशय फिट आणि फोकस दिसत आहे. ती काही दिवसांपासून करत असलेल्या डाएटिंग आणि वर्कआऊटचा परिणाम आता तिच्या शरीरावर चांगलाच दिसायला लागला आहे. तापसी स्वतःच तिच्या या मेहनतीबाबत खुश दिसत आहे. तिने यासोबत असंही शेअर केलं आहे की, “हा तर फक्त एक फोटो आहे, अजून बरेच येणं बाकी आहे” याचाच अर्थ ती पूर्ण तयारीनिशी या चित्रपटाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात तापसी एक एथलीटच्या भूमिकेत असल्यामुळे तिला शूटिंगदरम्यान सतत आणि वेगाने पळावं लागणार आहे. एखाद्या एथलीटप्रमाणे वेगात पळण्यासाठी तिला असा फिटनेस आणि डाएट मेंटेन करणं खूपच गरजेचं आहे.
तापसी कधीपासून या भूमिकेसाठी घेत आहे मेहनत –
रश्मि रॉकेट एक स्पोर्ट्स ड्रामा असणार आहे. हा चित्रपट आकर्ष खुराना दिग्दर्शित करत आहे. शिवाय रोनी स्कूवाला, नेहा आनंद आणि प्रांजल फिल्मस या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. रश्मि रॉकेटसाठी तापसीने कमावलेला फिटनेस हा काही एका दिवसाच्या मेहनतीचा परिणाम नक्कीच नाही. यासाठी ती खूप आधीपासून तयारी करत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तापसी यासाठी गेल्या वर्षभर यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. जर मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन झाला नसता तर कदाचित या चित्रपटाचं चित्रिकरण एव्हाना पूर्ण झालं असतं आणि चित्रपच प्रदर्शितदेखील झाला असता. कारण या चित्रपटाच्या शूटिंगला मार्चमध्येच सुरूवात होणार होती. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकल्यात आलं. तापसीच्या मते ती मार्चमध्ये या चित्रपटाच्या भूमिकेला साजेशी फिट नक्कीच नव्हती. त्यामुळे लॉकडाऊन आणि त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेलं शूटिंग तापसीच्या चांगलंच पथ्यावर पडलं. कारण त्यामुळे ती तिच्या फिटनेसवर आता पूर्ण फोकस करू शकली. गेल्या दोन महिन्यापासून तर तिने वर्कआऊट आणि डाएटिंगची पाराकाष्ठाच केली आहे. तापसीला खरंतर फार डाएट करण्याची सवय नाही. मात्र ती या भूमिकेसाठी ठराविक डाएट काही दिवसांपासून करत आहे. तिला गोड खूपच आवडतं. शिवाय तळलेले पदार्थ आणि तिखट जेवण हा तिचा विक पॉईंट आहे. पण तिने खूप दिवसांपासून असे पदार्थ मुळीच खाल्लेले नाहीत. ज्याचा परिणाम आता अशा स्वरूपात तिच्या फिटनेसवर दिसू लागला आहे. तापसीने रश्मि रॉकेटच्या शूटिंगला सुरूवात केली असून लवकरात लवकर तिला हे शूटिंग आता पूर्ण करायचं आहे. कारण शूटिंग संपल्याबरोबर ती छोटे-भटूरे खायला जायचं आहे. त्याचप्रमाणे याचं दुसरं कारण असं की तापसीच्या हातात पुढे अनेक आगामी चित्रपट आहेत. ती यानंतर हंसीना दिलरूबा, शाबास मिठ्ठू, लूप लपेटा या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे पुढचं वर्षभरतरी तापसी चांगलीच चर्चेत असणार आहे आणि या चर्चेची जोरदार सुरूवात आता रश्मि रॉकेटमुळे झालेली आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
Laxmii:अक्षय आणि शरदच्या अभिनयाचा उत्तम मेळ, तरीही साऊथला दिली नाही टक्कर
#Metoo नंतर आता तनुश्री दत्ताचे पुनरागमन, 15 किलो वजन केले कमी
Bigg Boss 14: कविता कौशिकची पुन्हा एकदा एंट्री, राहुलला मिळाला प्रेक्षकांचा पाठिंबा
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje