तुम्हाला माहिती असेलच की, नाश्ता म्हणजेच ब्रेकफास्ट (Breakfast) करणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यातही जर तो नाश्ता पौष्टीक (Healthy) असेल तर सोने पे सुहागा…तुमच्यासाठी खास बंगळूरूच्या ग्रॅंड मर्क्युर हॉटेलचे एक्झीक्यूटिव्ह शेफ गोपाल झा यांनी दिलेल्या हेल्दी रेसिपीज घेऊन आलो आहेत. ज्या हेल्दी तर आहेतच..त्यासोबतच टेस्टीही आहेत.
कॅलीफोर्नियन ब्रेकफास्ट बेनिडिक्ट (Californian Breakfast Benedict)
साहित्य : ब्रोश लोफ (Brioche loaf) च्या 2 मोठ्या स्लाइस, अवकॅडो पेस्ट 1 मोठा चमचा, 2 अंडी, सिमला मिर्च 50 ग्रॅम, नटमेग पावडर एक चिमूट, फायलो पेस्ट्री शीट 1, कोणतेही मोसमी फळ 100 ग्रॅम, हॉलेन्डाइज़ सॉस
कृती : सर्वात आधी ब्रेडच्या स्लाइस टोस्ट करा आणि त्या गरम राहून द्या एका छोट्या भांड्यात पाणी उकळून घ्या आणि अंडी तोडून ती पोच करून घ्या. ब्रोश ब्रेडवर ग्रिल केलेल्या टॉमेटोच्या स्लाइस ठेवा आणि त्यावर नटमेगसोबत सिमला मिर्चीचे तुकडे टाका. सर्वात वरती अवकॅडो पेस्ट आणि पोच केलेली अंडी घाला, त्यावर गरजेप्रमाणे हॉलेन्डाइज़ सॉस टाका आणि फ्रूट्स फाइलो बास्केट कपसोबत हे सर्व्ह करा.
स्पॅनिश ऑमलेट विद नाचोज़ (Spinach Omlette With Nachos)
साहित्य : कांदा 1 चमचा, हिरवी मिरची 1 चमचा, लसूण 3 कळ्या, हिरवा कांदा 1 मोठा चमचा, पिवळी आणि लाल सिमला मिर्च 1 मोठा चमचा, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे 1 मोठा चमचा, अंडी 3, मीठ आणि काळी मिरी स्वादानुसार, पीसा डि गॅलो 2 चमचे, ग्वुकामोल 1 मोठा चमचा, सार क्रीम 1 मोठा चमचा, नाचोज़ 10
कृती : एक फ्राय पॅनमध्ये मध्यम आचेवर कांदा, हिरवी मिरची आणि लसूण फ्राय करून घ्या. ह्यामध्ये थोडी काळी मिरी आणि मीठ घाला. आता हे मिश्रण बाजूला ठेवून द्या. बटाट्याचा बेस बनवून त्यावर कापलेल्या बटाट्याचे काप ठेवा आणि ते पॅनमध्ये ठेवा. त्यावर अंड घाला. आता ह्याच्या टॉपवर पिझ्झाच्या टॉपिंग्ज्सप्रमाणे भाज्या आणि थोडी काळी मिरी घाला. ह्यामध्ये आता टोमॅटो सॉस आणि टबॅस्को सॉस घाला. हवं असल्यास पारमेजन चीज ही घालू शकता. आता वरून झाकण ठेवा आणि मंद आचेवर शिजू द्या, म्हणजे चीज चांगल्यारीतीने मेल्ट होईल. सर्वात शेवटी नाचोज वरून घाला आणि पीसा डी गॅलो व ग्वुकामोलने सजवा, सार क्रीम घालून सर्व्ह करा.
हेही वाचा –
1. खास आपके लिए कच्ची कैरी की स्वादिष्ट और लाजवाब रेसिपीज़
2. मैंगो ड्रिंक्स की ये आसान रेसिपीज़ बनाएं और दोस्तों की तारीफ पाएं
3. स्वतंत्रता दिवस के मौके पर बनाएं ये 5 स्वादिष्ट तिरंगी रेसिपीज़…
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade