कोरोना व्हायरसमुळे आज बॉलीवूडप्रमाणेच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही अनेक बदल झाले आहेत. लॉकडाऊनमुळे जवळजवळ चार ते पाच महिने या मालिकांचे शूटिंग बंद होते. लॉकडाऊनंतर मालिकांचे शूटिंग सुरू झाल्यावरही अनेक कठोर नियम सेटवर पाळावे लागत आहेत. एवढंच नाही तर या कोरोना व्हायरसचा फटका काही कलाकारांच्या करिअरवरही झाला. कारण कोरोनाच्या भितीमुळे अनेक कलाकारांनी त्यांची लोकप्रिय मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. जाणून घेऊ या या काळात असे कोणकोणते कलाकार आहेत ज्यांनी मालिकांनाच रामराम ठोकला.
करणसिंह ग्रोव्हर –
करणसिंह ग्रोव्हर हा ‘कसौटी जिंदगी की’ या शोमध्ये मिस्टर बजाजची भूमिका साकारत होता. मात्र करणने लॉकडाऊननंतर या मालिकेत काम करण्यास नकार दिला. ज्यामुळे करण सिंह ग्रोव्हरच्या जागी आता करण पटेल या मालिकेचा मिस्टर बजाज असणार आहे.
अवनीत कौर –
अवनीत कौर ‘अल्लाद्दीन नाम तो सुना होगा’ या मालिकेत जास्मिनची भूमिका साकारत होती. मात्र तिनेही लॉकडाऊननंतर या मालिकेत काम करण्यास असंमती दर्शवली ज्यामुळे आता आशी सिंग या मालिकेतील जास्मिन साकारत आहे.
प्रियंका पुरोहित –
टेलिव्हिजन मालिका ‘तेरा क्या होगा आलिया’मधील मुख्य अभिनेत्री प्रियंका पुरोहितनेही तिची मालिका सोडली आहे. तिने काही वैयक्तिक कारणांसाठी हा शो सोडला असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र यामागचं खरं कारण कोरोनाची वाटत असलेली भिती हेच आहे.
कुणाल ठाकूर –
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील कुणाल ठाकूरनेही मालिकेतील काम सोडले आहे. कारण अनलॉक झाल्यावर तो शूटिंगसाठी येण्यास तयार नाही. कुणालने त्याच्या दातांच्या सर्जरीचे कारण पुढे केले आहे. या सर्जरीमुळे त्याची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे त्यामुळे तो अशा परिस्थितीत घराबाहेर पडण्यास तयार नाही.
शिखा सिंह –
‘कुमकुम भाग्य’ मालिकेची आलिया लॉकडाऊननंतर बदलली. कारण शिखा नुकतीच आई झाली आहे. अशा परिस्थितीत तिला तिच्या बाळासाठी कोणताही धोका पत्करायचा नाही. म्हणूनच लॉकडाऊनंतर तिने तिची लोकप्रिय मालिका सोडून दिली. शिखानंतर आता रेहाना पंडित आलिया साकारणार आहे.
गौरी टोंक –
‘शक्ती’ या मालिकेतील गौरी टोंक सध्या मालिकेच्या शूटिंगसाठी जाण्यास तयार नाही. तिच्या मते ती स्वतःसाठी तिच्या कुटुंबाला धोक्यात टाकू शकत नाही. यासाठी तिने चक्क मालिकेलाच रामराम ठोकला.
तुनिशा शर्मा –
‘इश्क सुभान अल्ला’ या मालिकेची अभिनेत्री तुनिशा शर्मानेही मालिका सोडली आहे. तुनिशानेही मालिका सोडण्यामागचं कारण वैयक्तिक आहे असं सांगितलं आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा शूटिंगसाठी घराबाहेर पडायचं की नाही याबाबत ती अजूनही संभ्रमात आहे. ती सध्या तिच्या घरी चंदीगढला आहे. त्यामुळे तिथून ती पुन्हा मुंबईत शूटिंगसाठी येणं सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे तिने मालिका सोडून देण्याचा निर्णय घेतला.
पूजा बॅनर्जी –
पूजा बॅनर्जीने ‘मॉं वैष्णो देवी’ ही मालिका सोडली आहे. आता या मालिकेमध्ये वैष्णवदेवीचे काम परिनिधी शर्मा करत आहे. पूजा बॅनर्जीला लॉकडाऊननंतर काम करण्याची भिती वाटत असल्यामुळे तिने शूटिंगसाठी येण्यास नकार दिला. तिला मालिकेत काम करायचं होतं पण अशा परिस्थितीत घरीच राहणं तिला योग्य वाटत आहे.
या कलाकारांच्या मनातील कोरोनाची भिती कमी झाल्याशिवाय ते मालिकांमध्ये येण्यास तयार होणार नाहीत असंच यावरून वाटत आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
या अभिनेत्री आहेत एकता कपूरच्या सुपरहिट मालिकेतील ‘इच्छाधारी नागिण’
अभिनयासाठी ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी सोडली हातातली नोकरी
नच बलिए 10 ची परिक्षक असणार बिपाशा बासू, या दोन सेलिब्रेटीजच्या नावाचीही चर्चा
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade