मनोरंजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त कलाकारांची मानवंदना

Trupti Paradkar  |  Apr 13, 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त कलाकारांची मानवंदना

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३० वी जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र इतर सण आणि उत्सवाप्रमाणे या कार्यक्रमावरही कोरोनाचे सावट आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित ‘एक महानायक डॉ. बी आर आंबेडकर’ ही हिंदी मालिका टेलिव्हिजनवर प्रसारित केली जाते. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र कोरोनामुळे हा दिवस अगदी साधेपणाने आणि घरीच बसून साजरा करावा लागणार आहे. असं असलं तरी बाबासाहेबांच्या विचारसरणीला फॉलो करणाऱ्या अनेक कलाकारांनी मानवंदना देत या सर्वांना बाबासाहेब जयंतीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी एण्‍ड टीव्‍ही कलाकारांनी बाबासाहेबांना विशेष मानवंदना देत संघटित भारताप्रती त्‍यांच्‍या दृष्टिकोनाला प्रशंसित केले आहे. हे कलाकार आहेत जगन्‍नाथ निवंगुणे (मालिका ‘एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर’मधील रामजी सकपाळ), अंबरिश बॉबी (मालिका ‘और भई क्‍या चल रहा है?’मधील रमेश प्रसाद मिश्रा), पवन सिंग (मालिका ‘और भई क्‍या चल रहा है’मधील जफर अली मिर्झा), आकांशा शर्मा (मालिका ‘और भई क्‍या चल रहा है’मधील सकिना), फरहाना फतेमा (मालिका ‘और भई क्‍या चल रहा है’मधील शांती), आसिफ शेख (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विभुती नारायण मिश्रा), रोहिताश्‍व गौड (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील मनमोहन तिवारी), कामना पाठक (मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील राजेश), ग्रेसी सिंग (मालिका ‘संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं’मधील संतोषी माँ). यासोबतच वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार (Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi)

या निमित्ताने जगन्‍नाथ निवंगुणे ऊर्फ रामजी सकपाळ म्‍हणाले, ”डॉ. आंबेडकर हे सर्वोत्तम नेता होते. त्‍यांनी केलेल्‍या कार्याचा सर्व भारतीयांच्‍या जीवनावर आमूलाग्र परिणाम झाला आहे. आपण बाबासाहेब यांची १३०वी जयंती साजरी करत असताना आमचा या महान नेत्‍याला आणि समाजाप्रती त्‍यांच्‍या प्रचंड योगदानाला आमचा सलाम!”

अंबरिश बॉबी ऊर्फ रमेश प्रसाद मिश्रा म्‍हणाले, ”डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी लाखो भारतीयांना एक देश व एक संविधान अंतर्गत एकत्र आणत संघटित भारताचा पाया रचला. त्‍यांची शिकवण व तत्त्‍व आंजही देशभरातील भारतीयांशी संलग्‍न आहेत.”

पवन सिंग ऊर्फ जफर अली मिर्झा म्‍हणाले, ”डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी अधिक उदारमतवादी भविष्‍यासह समाजाला मार्ग दाखवला, जेथे समानता हा प्रत्‍येक नागरिकाचा अधिकार आहे. त्‍यांचा उत्तम दृष्टिकोन व विश्‍वास होता, ज्‍यामुळे सामाजिक व आर्थिक बदल घडून आले, ज्‍याचा अनेक जीवनांवर आमूलाग्र परिणाम झाला. बाबासाहेबांनी केलेल्‍या कामगिरीनुसार फक्‍त काहीच नेते देशाला संघटित करू शकले.”

फरहाना फतेमा ऊर्फ शांती मिश्रा म्‍हणाल्‍या, ”यंदाची आंबेडकर जयंती ही या महान नेत्‍याची १३०वी जयंती आहे. बाबासाहेबांनी महिला व समाजासाठी प्रचंड कार्य केले आहे. ते अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. त्‍यांनी त्‍यांच्‍या शिक्षणाचा वापर करून आमूलाग्र बदल घडवून आणला. त्‍यांची कामगिरी व योगदान आपल्‍यासाठी, तसेच येणा-या भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”

आकांशा शर्मा ऊर्फ सकिना मिर्झा म्‍हणाल्‍या, ”बाबासाहेब हे दूरदर्शी नेते होते. आज आपल्‍या देशाने केलेल्‍या प्रगतीचे मोठे श्रेय त्‍यांना जाते. त्‍यांनी लोकांना संघटित करण्‍यासोबत त्‍यांना सर्व प्रकारच्‍या दडपशाहीविरोधात एकजुटीने आवाज उठवण्‍यास प्रेरित केले.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याची ओळख करून घेण्यासाठी वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माहिती (Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi)

आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्‍हणाले, ”मी डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्‍या जीवनकथा ऐकत मोठा झालो आहे आणि समानतेसाठी त्‍यांच्‍या संघर्षाचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे. डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारतातील समानतेचे सर्वात प्रबळ समर्थक राहिले आहेत. त्‍यांच्‍या जयंतीनिमित्त त्‍यांना स्‍मरण करूया आणि त्‍यांचे कार्य व दृष्टिकोनाला प्रशंसित करूया.”

ग्रेसी सिंग ऊर्फ संतोषी माँ म्‍हणाल्‍या, ”बाबासाहेब हे भारतीय इतिहासामधील सर्वात महान नेत्‍यांपैकी एक आहेत. समानता, महिला सक्षमीकरणासाठी त्‍यांचा संघर्ष असो किंवा शिक्षणामधील त्‍यांचा सहभाग असो, त्‍यांचा प्रत्‍येक भारतीयाच्‍या जीवनावर प्रभाव पडलेला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त आपला देश व आपल्‍या समाजाप्रती त्‍यांच्‍या प्रचंड योगदानाचे स्‍मरण व सन्‍मानित करूया.”

कामना पाठक ऊर्फ राजेश म्‍हणाल्‍या, ”डॉ. आंबेडकर यांनी आपल्‍या समाजाकडे उदारमतवादीपणे व समानतेने पाहिले. अनेकांच्‍या जीवनावर प्रभाव पाडलेले सामाजिक व आर्थिक बदल घडवून आणण्‍यासाठी मोठ्या विचारसरणीची गरज लागते. बाबासाहेबांनी केलेल्‍या कामगिरीनुसार इतर काहीच नेते देशाला संघटित करू शकले. चला आपण एकत्र मिळून या महान नेत्‍याला मानवंदना देऊया. भीमासारखे बनण्‍यासाठी हिंमत पाहिजे आणि देशाप्रती देशभक्‍ती व अमाप प्रेम पाहिजे.”

रोहिताश्‍व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्‍हणाले, ”डॉ. बी. आर. आंबेडकर हे दूरदर्शी नेते होते. त्‍यांचे विविध सामाजिक व आर्थिक सुधारणांच्‍या माध्‍यमातून आपल्‍या देशाला संघटित करण्‍याचे स्‍वप्‍न होते आणि हेच स्‍वप्‍न त्‍यांनी भारतीय संविधान रचत साकारले. आंबेडकर जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना एकत्र येऊन महान नेते व सामाजिक सुधारक – डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे स्‍मरण करत त्‍यांना मानवंदना देण्‍याचे आवाहन करतो.”

 

महात्मा जोतीराव फुलेंचा ‘सत्यशोधक’ रुपेरी पडद्यावर

Read More From मनोरंजन