सूर्यफुलाच्या फुलांपासून जे तेल काढतात त्याला सूर्यफुलाचे तेल असं म्हणतात. सूर्यफूल हे बारमाही फुलणारं फुलझाड असून त्याचं फुल गडद पिवळ्या-केशरी रंगाचं असतं. या फुलाचं वैशिष्ट्यं हे की ते सूर्य ज्या दिशेला वळेल त्यादिशेने वळतं. म्हणून या फुलाला सूर्यफूल असं म्हणतात. सूर्यफुलाच्या तेलात अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. ज्यामुळे ते आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. एवढंच नाही तर हे केसांसाठी सूर्यफुलाचे तेल वरदान ठरू शकते. कारण या तेलात भरपूर प्रमााणात अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि व्हायरल आणि अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ज्याचा परिणाम तुमच्या केसांच्या वाढीवर होतो केस लांब,सुंदर आणि घनदाट होतात. केसांच्या अनेक समस्या या तेलामुळे सहज दूर होतात. यासाठीच जाणून घ्या या तेलाचे केसांवर होणारे फायदे आणि कसा करावा वापर…
धुळ आणि प्रदूषणापासून केसांचे रक्षण
सूर्यफुलाच्या तेलात अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म असल्याममुळे ते केसांसाठी आरोग्यदायी असते. यातील व्हिटॅमिन ईमुळे केसांवर संरक्षक कवच निर्माण होते आणि केसांचे बाहेरील धुळ आणि प्रदूषणापासून होणारे नुकसान टाळले जाते. मात्र यासाठी केसांना नियमित सूर्यफुलाचे तेल लावणं गरजेचं आहे. शॅम्पू करण्यापूर्वी आठवड्यातून दोनदा केसांना सूर्यफुलाच्या तेलाने मालिश करा आणि मगच केस धुवा. ज्यामुळे काही दिवसामध्येच तुम्हाला केसांमध्ये झालेला आश्चर्यकारकफरक दिसायला लागेल.
कोरड्या केसांसाठी उत्तम
सूर्यफुलाचे तेल यामध्ये असे घटक असतात ज्यामुळे केसांचे योग्य पद्धतीने पोषण होते. केसांच्या मुळांना योग्य प्रमाणात पोषण मिळाल्यामुळे केस चमकदार होतात. केसांचा कोरडेपणा यामुळे हळूहळू कमी होण्यास मदत होते. अधिक चांगल्या परिणामासाठी तुम्ही सूर्यफुलाच्या तेलासोबत अॅव्होकॅडोची पेस्ट मिसळून लावू शकता. असा हेअर मास्क केसांना लावल्यामुळे केस जास्त मऊ आणि दाट होतात.
केसांची वाढ चांगली होते
केसांची मुळे आणि क्युटिकल्स सूर्यफुलाचे तेल लावण्यामुळे मऊ आणि मुलायम होतात. ज्याचा परिणाम केसांच्या वाढीवर होतो. जर तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळत असतील या तेलापासून तयार केलेला हेअर मास्क तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल. यासाठी मेथीच्या बिया, नारळाचे तेल आणि सूर्यफुलाचे तेल एकत्र गरम करून केसांना लावा. ज्यामुळे केसांच्या समस्या कमी होतील आणि केस मजबूत आणि लांब होतील.
स्काल्पवर येणारे पिंपल्स कमी होतात
अनेकांना केसांच्या मुळांमध्ये ताण अथवा त्वचेच्या समस्यांमुळे पिंपल्स येण्याचा त्रास जाणवतो. ज्यांचे केस अती प्रमाणात तेलकट असतात त्यांना ही समस्या नेहमी सतावते. या स्काप्लवर येणाऱ्या पिंपल्सपासून बचाव करायचा असेल तर केसांना सूर्यफुलाचे तेल लावा. या तेलात नियासिन, सेलेनिअम, कॅल्शिअम आणि लोह असते ज्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचेवरील पिंपल्स कमी होतात.
कोंडा कमी होतो
सूर्यफुलाच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंड्याद्वारे होणारे इनफेक्शन कमी होते. इनफेक्शमनमुळे येणारी खाज, सूज, जळजळ, लालसरपणा, कोंडा कमी होतो. शिवाय या तेलाच्या मालिशमुळे केसांच्या मुळांखालील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे कमळाचे तेल, जाणून घ्या फायदे