मनोरंजन

पुन्हा सुरू होणार ‘दी कपिल शर्मा शो’ या कलाकाराची होणार नव्याने एन्ट्री

Trupti Paradkar  |  Jul 18, 2021
पुन्हा सुरू होणार ‘दी कपिल शर्मा शो’ या कलाकाराची होणार नव्याने एन्ट्री

दी कपिल शर्मा शोबाबत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान आहे. जगभरातील प्रेक्षक या शोवर अक्षरशः वेड्यासारखं प्रेम करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा शो बंद असल्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरात लवकर हा शो सुरू व्हावा असं वाटत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे कपिल शर्मा आणि त्याची नवी टीम पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच हा शो टेलीव्हिजनवर प्रदर्शित होणार आहे. दी कपिल शर्माने याबाबत स्वतः एक पोस्ट शेअर केली आहे. 

नवी सुरूवात आणि जुने कलाकार

कपिल शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने कपिल शर्माच्या जुन्या कलाकारांसोबत एक फोटो शेअर करत त्याला एक कॅप्शन दिली आहे. कपिलने शेअर केलं आहे की, नवी सुरूवात, जुने चेहऱ्यांसोबत. या पोस्टमध्ये  कपिलने काही इमोजी आणि हॅशटॅगही वापरले आहे. ज्यात त्याने #comingsoon असं टॅग केलं आहे. ज्यामुळे लवकरच हा शो पुन्हा सुरू होणार याचे संकेत प्रेक्षकांना मिळाले आहेत. कपिलने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा शोमधील जुने कॉमेडिअन आहेत. कीकू शारदा, भारती सिंह, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर यांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे आता या शोमध्ये सुदेश लहरीदेखील असण्याची शक्यता आहे. कारण या फोटोमध्ये कपिलसोबत हा कलाकारही आहे. कपिलने यापूर्वीही सुदेशसोबत काम केलेलं आहे. त्यामुळे आता नव्याने त्या दोघांचे बॉंडिंग शोमध्ये पाहता येईल. मात्र सुमोना चक्रवर्ती त्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे आता कपिलच्या शोमधील भुरी कदाचित या शोमध्ये नसेल असं वाटत आहे. त्याचप्रमाणे या शोची जज अर्चना पूरनसिंह पुन्हा या शोमध्ये असेल की कोणी या शोचा जज असेल याबाबत  काहीच शेअर करण्यात आलेलं नाही. शिवाय या फोटोमध्येही अर्चना दिसत नाही आहे. 

कधी सुरु होणार ‘दी कपिल शर्मा शो’

कपिल शर्मा शो पुन्हा सुरू होणार त्यामुळे प्रेक्षक नक्कीच खूश झाले आहे. या नव्या सीझनबाबत काही दिवसांपूर्वीत कपिलने घोषणा केली होती. ज्यामध्ये  त्याने तो नव्या सीझनसाठी लेखक आणि नव्या कलाकारांचा शोध घेते आहे असं शेअर केलं होतं. कपिल शर्मा फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा बाबा झाला. बाबा झाल्यावर पत्नी आणि मुलांना वेळ देण्यासाठी कपिल शर्माने एक लॉंग ब्रेक घेतला होता. ज्यामुळे दी कपिल शर्मा शो काही काळासाठी बंद करण्यात आला होता. मात्र आता कपिलने कमिंग सून म्हणत तो  पुन्हा नव्या उमेदीने हा शो सुरू करत आहे हे पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. असं असलं  तरी हा शो नेमका कधी आणि कोणत्या वाहिनीवर सुरू होत आहे हे अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही. लवकरात लवकर या शोचं शूटिंग सुरू होईल आणि हा शो नेमका कधी सुरू होणार यावर शिक्कामोर्तब केलं जाईल. मात्र तोपर्यंत हा शो पुन्हा सुरू होणार यातच प्रेक्षकांना समाधान वाटत आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

नव्वदच्या काळातील ‘राम तेरी गंगा मैली’ फेम अभिनेत्री मंदाकिनीचा कमबॅक

शाहिदमुळे बदललं करिअर आणि सैफमुळे बदललं आयुष्य, करिना कपूरचा खुलासा

‘पवित्र रिश्ता 2’ बंद करण्याची मागणी, चाहते म्हणाले…

Read More From मनोरंजन