Combination Skin

कॉम्बिनेशन त्वचा (Combination Skin) कशी ओळखावी, सोपी पद्धत

Dipali Naphade  |  Mar 2, 2021
कॉम्बिनेशन त्वचा (Combination Skin) कशी ओळखावी, सोपी पद्धत

आपल्याला त्वचेची काळजी घ्यावी लागते हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण त्यासाठी तुम्हाला त्वचेचा टाईप नक्की कोणता आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही त्वचेसाठी योग्य सौंदर्यप्रसाधने आणि मेकअप प्रॉडक्ट (beauty and makeup products) वापरू शकता. पण तुम्हाला जर तुमची त्वचा तेलकट, कोरडी अथवा दोन्ही पद्धतीची आहे हे कळत नसेल तर ते कसे जाणून घ्यायला हवे हेदेखील माहीत हवे. कधी कधी त्वचा कोरडी होते तर कधी चेहऱ्यावर तेलकट वाटते आणि त्वचा खेचल्यासारखी वाटते. त्यामुळे आपल्या त्वचेचा नेमका कोणता टाईप आहे हे बऱ्याचदा मुलींना कळत नाही. तेलकट आणि कोरडी याशिवाय अजून एक त्वचा टाईप असतो आणि तो म्हणजे कॉम्बिनेशन स्किन (Combination Skin). या तऱ्हेच्या त्वचेवर एक कोरडेपणा आणि अतिरिक्त तेल दोन्ही दिसून येते. त्यामुळे नक्की कोणते उत्पादन वापरायचे असा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे कॉम्बिनेशन त्वचा नक्की कशी ओळखावी याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.

चेहरा कुठून उजळतोय हे तपासा

Freepik.com

तुमचा चेहरा जर तुम्ही एखाद्या फेसवॉश (face wash) ने धुत असाल तर तुमची त्वचा दुपारच्या वेळी कोरडी होऊ लागते अथवा काही जणींना दुपारच्या वेळी तेलकट वाटू लगाते. पण तुमची स्किन जर कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुमच्या चेहऱ्याचा टी – झोन तुम्हाला चमकताना दिसेल आणि बाकीचा भाग मात्र तुम्हाला कोरडा जाणवेल. ही सर्वात महत्वाची खूण आहे.

सनस्क्रिन परीक्षण

Shutterstock

सनस्क्रिन परीक्षणाद्वारे (Sunscreen Test) तुम्ही कॉम्बिनेशन त्वचा ओळखू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचे सनस्क्रिन चेहरा आणि मानेवर लावावे लागेल. काही वेळ वाट पाहा आणि मग नीट निरखून पाहा की तुमच्या त्वचेवरील कोणता भाग जास्त चमकत आहे. तुम्ही लावलेले सनस्क्रिन जर सहजपणे गालावर मिक्स झाले असेल आणि नाक, कपाळावर जर तेलकट दिसत असेल तर तुमची त्वचा कॉम्बिनेशन त्वचा आहे.

वापर करा घरगुती नैसर्गिक क्लिंन्झरचा आणि मिळवा चमकदार त्वचा

नाकावरील पोअर्स मोठे होणे

टी – झोनची त्वचा तेलकट असते, त्यामुळे नाकाच्या पोअर्सची त्वचा आणि त्याबाजूचा भाग मोठा होणं हे साहजिक आहे. तुम्हाला यातील फरक पटकन कळून येऊ शकतो. जेव्हा छिद्र लहान करण्यासाठी कोणतीही पद्धत नसते तेव्हा टोनरचा उपयोग करून छिद्र तुम्ही टाईट करून घेऊ शकता. त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि तुमच्या टी – झोनला एक मॅट फिल देण्यासाठी याची मदत होईल.

5 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा तेलकट त्वचेपासून त्वरीत सुटका

अॅक्नेवर लक्ष द्या

Shutterstock

कॉम्बिनेशन त्वचा असणाऱ्या महिलांना त्यांच्या चेहऱ्याच्या अन्य भागाच्या तुलनेत टी – झोनवर अधिक लक्ष द्यावे लागते कारण त्यावर जास्त ब्रेकआऊट्स असतात. त्यामुळे तुम्हाला बरेचदा आपल्या कपाळ, नाक आणि हनुवटीवर पिंपल्स दिसतात. कॉम्बिनेशन त्वचा असल्याचे ते लक्षण आहे. साधारणतः तेलकट त्वचेवर अॅक्ने असतात. पण जर तुम्हाला अॅक्ने आणि ड्राय पॅच एकत्र दिसले तर तुमची स्किन कॉम्बिनेशन स्किन आहे असं समजा. उदाहरणार्थ तुमच्या गालावर कोरडे डाग आहे, पण त्या ठिकाणी ब्रेकआऊट्स आहेत तर तुमची त्वचा ही कॉम्बिनेशन आहे. अशी त्वचा असणाऱ्या महिलांना आपल्या त्वचेची योग्य काळजी करण्याचे तंत्र जमायला हवे. तुम्ही तुमच्या टी – झोन वर क्ले मास्क लावा अथवा आपल्या चेहऱ्याच्या बाकी भागाला स्किन हायड्रेटिंग मास्कसह कव्हर करा.

ब्लाईंड पिंपल्स म्हणजे काय, करा त्वरीत घरगुती उपाय

मासिक पाळीत होतो बदल

हा कॉम्बिनेशन त्वचा असण्याचा संकेत आहे. पण साधारणतः महिला याकडे लक्ष देत नाहीत. जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा तुम्हाला त्वचेवर ब्रेकआऊटचा अनुभव येतो, ज्यामुळे त्वचा तेलकट असल्यासारखी भासते. पण जेव्हा मासिक पाळी संपते तेव्हा ब्रेकआऊट निघून जातात आणि तुमची त्वचा फ्लेकी होते. असं होत असेल तर तुमची त्वचा कॉम्बिनेशन त्वचा आहे हे समजून घ्या.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Combination Skin