Combination Skin

फेसवॉशमधील कोणता घटक तुमच्या त्वचेसाठी आहे फायदेशीर

Leenal Gawade  |  Mar 22, 2021
फेसवॉशमधील कोणता घटक तुमच्या त्वचेसाठी आहे फायदेशीर


 बाजारात इतके फेसवॉशचे प्रकार मिळतात की, कधी कधी नेमका कोणता फेसवॉश घ्यावा हे कळत नाही. फेसवॉशच्या इतक्या प्रकारांमध्ये गोंधळायला होतं याचं कारण असे की, फेसवॉशमध्ये साबणाव्यतिरिक्त असलेले इतर घटकही पाहणे फारच महत्वाचे असते. तुमच्या त्वचेसाठी काय योग्य आहे याचा विचार करुन काही घटक त्यामध्ये घातले जातात. अॅपल, मध, स्ट्रॉबेरी, बनाना, अॅलोवेरा असे काही घटक असलेले फेसवॉश हल्ली बाजारात मिळतात. आता या पैकी काय निवडावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि एखादा घटक निवडल्यामुळे तुम्हाला त्याचा काय फायदा होतो हे जाणून घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती

रोसासिया – त्वचेची समस्या, या त्वचेसंबंधी विकाराबद्दल जाणून घेऊया

Instagram

मध
त्वचेमधील तेलकटपणा कमी करुन त्वचा हायड्रेट आणि मॉश्चराईज करण्याचे काम मध करते. मध हे जेंटल क्लिनिंग एजंट असून त्यामुळे त्वचा छान उजळतेही आणि अधिक हायड्रेटिंग दिसू लागते. 


अॅलोवेरा
ज्यंची त्वचा कोरडी आहे आणि नाजूक आहे अशांसाठी अॅलोवेरा एकदम बेस्ट घटक आहे. तुमच्या त्वचेतील कोरडेपणा दूर करुन त्वचेच्या इतर समस्या दूर करण्याचे काम करतो.


काकडी
काकडी ही थंड असते. त्यामुळे चेहऱ्याला कुल ठेवून थकलेल्या त्वचेला रिफ्रेश करण्याचे काम काकडी करते. काकडीचे घटक असलेला फेसवॉश तेलकट त्वचेसाठी चालू शकतो. त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा नियंत्रणात येतो. 


बनाना 

हल्ली केळ्याचा वापरही स्किनकेअरमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. केळ्यामुळे त्वचा स्मुथ होते.स्किन नरीश होते. तुमच्या चेहऱ्याची त्वचा रुक्ष असेल तर ती अधिक चांगली दिसते. बनाना फेसवॉशचा उपयोग अतिशय कोरड्या असणाऱ्यांनी केला तर त्याचा अधिक फायदा मिळतो. 

सतत फेसवॉस बदलणे फायद्याचे की तोट्याचे

स्ट्रॉबेरी 

लाईटनिंग एजंट म्हणून वापरली जाणारी स्ट्रॉबेरी ही चेहऱ्यासाठी आणि त्वचेसाठी फारच चांगली आहे. जर तुम्ही टॅन झाले असाल किंवा तुमची त्वचा अन इव्हन असेल तरी देखील ती स्ट्रॉबेरीजच्या अर्कामुळे चांगली होईल. याशिवाय असलेल्या अन्य बेरीजमुळेही त्वचा चांगली होते. 


संत्री 

अगदी कोणत्याही त्वचेला साजेसे असे फळ म्हणजे संत्र. संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन C हे त्वचेसाठी फारच फायदेशीर असते. तुमची त्वचा अगदी कोणत्याहरी प्रकारातली असली तरी देखील तुमच्या त्वचेसाठी हा घटक फायदेशीर ठरतो. त्वचा हायड्रेट, ईव्हन करुन त्वचेवरील थकवा काढून टाकतो. 


आता फेसवॉश निवडताना त्यामधील घटकही नक्की तपासा. त्यांचे फायदे वाचून तुम्ही त्याची निवड करा.

#WFH मधील आळशीपणा त्वचेसाठी त्रासदायक, जाणून घ्या कसा

 

Read More From Combination Skin