बाहेर गेल्यानंतर आपल्यासोबत कायम असलेली गोष्ट म्हणजे पाकिट किंवा वॉलेट. पैशांनी भरलेले पाकिट कोणाला नको असते. पण पैशाव्यतिरिक्त पाकिटात अनाहूतपणे इतक्या वस्तू ठेवल्या जातात की, आपल्यालाच ते लक्षात येत नाही. अनेकांचे पाकिट हे पैशांपेक्षा इतर गोष्टींनी जास्त भरलेली असते. त्यामुळे त्यांचे पाकिट नेहमीच अनऑरगनाईज नसते. पाकिटात अशा काही वस्तू ठेवणे हे अजिबात चांगले नाही. त्यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते. जाणून घेऊया पाकिटात नेमक्या कोणत्या गोष्टी ठेवू नये याविषयची अत्यंत महत्वाची माहिती. करुया सुरुवात
वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका
लोखंडी वस्तू
काही जणांना पाकिटात पिना,सुई किंवा अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नका. अशा गोष्टी तुमच्या तुमच्या पाकिटातील पैसा टिकू देत नाही. त्यामुळे पाकिटात अशा कोणत्याही वस्तू ठेवू नका. कारण त्या नकारात्मक उर्जो आणतात त्यामुळे अगदी पहिली गोष्ट तुम्हाला कटाक्षाने टाळायची आहे ते म्हणजे या वस्तू ठेवू नका. अणुकुचीदार वस्तू या तुमच्यामध्ये नकारात्मक उर्जा वाढवतात. त्यामुळे या गोष्टी तुम्ही अजिबात पाकिटात ठेवू नका.
जुनी बिलं
खूप जणांना पाकिटात भरलेली बिलं ठेवायची सवय असते. भरलेली जुनं बिलं आपण योग्यवेळी सापडावी म्हणून पाकिटात ठेवतो. पण अशी बिलं तुमच्या पाकिटात ठेवल्यामुळे पैसे कमी होण्याची शक्यता असते. भरलेली बिलं हा तुमच्या अकाऊंटमधून किंवा पाकिटातून गेलेला पैसा दाखवतो अशी बिलं तुम्ही पाकिटात ठेवल्यामुळे तुमचे पैसे टिकत नाही. त्यामुळे जर तुम्ही जुनी बिलं पाकिटात खूप काळासाठी ठेवत असाल तर असे करु नका. शक्य असेल तर बिलं वेळच्यावेळी काढून टाका.
उदा. काही जणांचे पाकिटात फार जुनी म्हणजे वर्षांपासून साचवलेली बिलं असतात. या बिलांवरील आकडे ही निघून गेलेले असतात. पण तरीही बिलं ही पाकिटातच असतात. त्यामुळे जुनी बिलं काढून टाकतात.
घरावर लक्ष्मीकृपा व्हावी म्हणून फॉलो करा या वास्तू टिप्स – Vastu Tips for Wealth in Marathi
खाण्याची वस्तू
खूप जाणांना वॉलेटमध्ये खाण्याची काहीतरी वस्तू ठेवायची सवय असते. एखादे चॉकलेट, पाचक गोळी, टॉफी असे काहीतरी खूप जण पाकिटात ठेवतात. अशा वस्तू पाकिटात ठेवू नका. कारण त्यामुळे पैसे निघून जाण्याची शक्यता असते. तुमचे पैसे जिथे आहेत. त्या ठिकाणी तुम्ही मुळीच खाण्याची वस्तू ठेवू नका. शक्य असेल तर तुम्ही तुमच्या मोठ्या हँडबॅगमध्ये ठेवा पण तुमच्या पाकिटात ही वस्तू अजिबात ठेवू नका.
औषधांच्या गोळ्या
औषधांच्या गोळ्या या अनेकांसाठी फार गरजेच्या असतात. काहींना आरोग्याचा विचार करत औषधांच्या गोळ्या या पाकिटात ठेवू नका. औषधांच्या गोळ्या आजारपण दर्शवते. आजारपण कोणालाच आवडत नाही. औषधांच्या गोळ्या नकारात्मकता दाखवते त्यामुळे तुम्ही औषधांच्या गोळ्या अजिबात पाकिटात ठेवू नका. शक्य असेल तर तुम्ही एका वेगळ्या बॅगमध्ये औषधांच्या गोळ्या ठेवा. औषधांच्या गोळ्यांमध्ये असलेली नकारात्मकता तुमच्यामध्ये येऊ देऊ नका.
आता तुमच्या पाकिटात तुम्ही अजिबात या वस्तू ठेवू नका. कारण त्यामुळे तुमच्याकडील पैसे कमी होण्याची शक्यता असते.