महिलांसाठी सर्वात जवळचा मित्र म्हणजे दागिना. गरजेचे नाही की, सर्व दागिने हे सोने, चांदी आणि हिऱ्याचे असावेत. आजकाल इतक्या प्रकारच्या दागिन्यांची रेलचेल दिसते की, त्यामध्ये इमिटेशन ज्वेलरी, ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी आणि इतर दागिन्यांचाही समावेश होतो. तुम्ही साडी, पारंपरिक कपडे अथवा वेस्टर्न कपड्यांवर वेगवेगळे दागिने घालून नवनवीन लुक आणि फॅशन करू शकता. पण काही ठराविक कालावधीनंतर हे दागिने काळपट होतात आणि मग खराब दिसू लागतात. मग अशावेळी हे दागिने तसेच चमकदार दिसायला हवे असतील तर नक्की करायला हवे याची माहिती या लेखातून आम्ही तुम्हाला देणार आहोत. सोने, चांदी, हिरे कोणतेही दागिने असो एका ठराविक काळानंतर त्यावरील चमक कमी होते. पुन्हा चमक आणण्यासाठी बऱ्याच क्लिनिंग हॅक्स आहेत. पण काही वेळा अशा चुका होतात ज्यामुळे हे दागिने काळे पडतात. त्यासाठी तुम्ही नक्की कोणत्या चुका टाळायला हव्यात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
क्लोरिनच्या पाण्यापासून ठेवा दूर
दागिने हे नेहमी क्लोरिनच्या पाण्यापासून दूर ठेवा. तुम्ही फिल्टर पाण्याने आंघोळ करत असाल अथवा स्विमिंग पूलमध्ये जात असाल आणि तुम्ही केवळ सोन्याची अंगठी जरी घातली असेल तरीही ती तुम्ही लॉकरमध्ये ठेवा. कारण स्विमिंग पूलमध्ये क्लोरिन घातलेले असते आणि त्याने दागिने पटकन खराब होतात. तसंच तुम्ही रोज कपडे धुत असाल आणि भांडी घासत असाल तेव्हाही दागिने काढून ठेवा. सोने अथवा चांदीचे दागिने असतील अथवा ऑक्सिडाईज्ड दागिने असतील तर ते क्लोरिनने पटकन खराब होतात. त्यामुळे जितक्या दूर ठेवता येतील तितके अधिक चांगले. त्यामुळे या चुका सहसा करणे टाळा. तुम्ही रोज वापरत असलेले दागिने असतील तरीही क्लोरिनच्या पाण्यापासून दूरच ठेवा.
वाचा – पारंपारिक गळ्यातील दागिने प्रकार
स्वच्छतेची घ्या काळजी
कितीही साधे आणि स्वस्त दागिने असले तरीही ते व्यवस्थित ठेवणं अत्यंत गरजेचे आहे आणि हे दागिने व्यवस्थित ठेवले तरच ते वर्षानुवर्षे टिकू शकतील. पण प्रत्येक दागिना स्वच्छ ठेवण्याची पद्धत ही वेगळी असते आणि त्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. रोज धूळ – प्रदुषणासह बॅक्टेरिया, घाम यामुळे दागिन्यांना हानी पोहचते. त्यामुळे दागिने सतत स्वच्छ करत राहणे अत्यंत गरजेचे आहे. किमान आठवड्यातून एकदा तरी दागिने स्वच्छ करायला हवेत आणि केवळ कोमट पाणी आणि साबणाने तुम्ही हे दागिने स्वच्छ करायला हवेत. तुम्हाला हवं तर या दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी मीठ नसलेल्या टूथपेस्टचा तुम्ही वापर करू शकता. पण लक्षात ठेवा हे दागिने तुम्ही हलक्या हाताने स्वच्छ करायला हवेत. तुम्ही खसाखसा घासून हे दागिने स्वच्छ करू नका. अन्यथा त्याचा वाईट परिणाम दिसून येईल.
मेकअप लावताना ठेवा लक्ष
नेहमी मेकअप आधी करा आणि मगच दागिने घाला. काही जणींना आधी दागिने घालून मेकअप करण्याची सवय असते. पण ही चूक करू नका. कारण दागिन्यांमध्ये मेकअपचे कण जातता आणि मग दागिने अधिक खराब दिसतात. तसंच हे कण इतके बारीक असतात की दागिने स्वच्छ करताना पटकन निघत नाहीत. त्यामुळे मेकअप करताना दागिन्यांची काळजी घेणेही गरजेचे आहे. मेकअप करून झाल्यानंतरच तुम्ही दागिने घाला. दागिने स्वच्छ करताना तुम्ही MyGlamm च्या वाईपआऊटचा उपयोग करून घेऊ शकता.
दागिने नीट न ठेवणे ही मोठी चूक
बरेचदा दागिने व्यवस्थित नीट न ठेवल्याने काळे पडतात. त्यामुळे प्रत्येक दागिना हा नीट स्टोअर करून ठेवा. तुम्ही जर वेगवेगळे दागिने एकत्र ठेवलेत तर त्यांचा रंग लवकर खराब होतो आणि चमकही निघून जाते. सोने, मोती, चांदी, ऑक्सिडाईज्ड हे सर्व दागिने वेगवेगळे स्टोअर करून ठेवायला हवेत. दागिने कापसामध्ये घालून वेगवेगळ्या डब्यात ठेवणे गरजेचे आहे. तसंच कानातले, गळ्यातले, नाकातले असे वेगवेगळे दागिने ठेवले तर जास्त चांगले. एकत्र दागिने ठेवण्याची चूक करू नका.
Read More From Jewellery
पायांत चांदीचे पैंजण घालणे ही केवळ जुनी परंपरा नव्हे, त्यामागे आहे वैज्ञानिक कारण
Vaidehi Raje