आरोग्य

फळांचे रस पिताना या गोष्टी असू द्या लक्षात

Leenal Gawade  |  Oct 26, 2021
फळांचे रस पिताना

चांगल्या हेल्दी सवयी लावताना खूप जण आहारात अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश करतात. त्यापैकीच एक आहे ते म्हणजे फळांचा रस.खूप जणांना फळ खायला आवडत नाही. त्यामुळे असे लोक आहारात फळांच्या रसाचा समावेश करतात. कलिंगड, अननस, पपई, पेरु, केळी यांचा रस किंवा स्मुदी करुन पितात. फळांच्या रसाचा समावेश केल्यामुळे शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन C,A,B  असे काही घटक मिळतात. पोटाचे आरोग्य, त्वचेचे आरोग्य आणि वेगवेगळ्या  फायद्यांसाठी फळांच्या रसाचा समावेश केला जातो. पण फळांचे रस पिताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे असते. जाणून घेऊया फळांचा रस पिताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला हवी

जास्त वेळ ठेवू नका

फळांचा रस काढण्यासाठी आपण मशीन किंवा एखाद्या मिक्सीचा वापर करतो. त्यामुळे साहजिकच फळांना ब्लेड लागतात. त्यामुळे फळांच्या रसामध्ये असलेल्या घटकावर त्याचा परिणाम होऊ लागतो त्यामुळे अशा रसामध्ये हेल्दी घटक नाही तर त्यामध्ये विषारी घटक वाढू लागतात. त्यामुळे असे ज्यूस जास्त काळासाठी ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक असते.  ज्यावेळी तुम्हाला डाएटमध्ये ज्युस पिण्यास सांगितले असेल तर त्यावेळी तुम्ही त्यावेळी ज्युस तयार करा आणि लगेचच प्या.

वेगवेगळे मसाले घालू नका

Instagram

 फळांचा रस खूप जणांना आवडत नाही. केवळ डाएटचा किंवा हेल्दी डाएटचा भाग म्हणून खूप जण पितात. खूप जणांना रस हे चटपटीत प्यायला आवडतात. त्यामुळे अशा फळांच्या रसामध्ये खूप जण मीठ किंवा चाट मसाला घालतात. त्यामुळे फळांचा रस हा अधिक चविष्ट लागतो ही गोष्ट खरी असली तरी देखील या सगळ्याचा परिणाम हा रसावर होतो. त्यामुळे तुम्ही ही चूक अजिबात करु नका. उदा. उसाचा रस यामध्ये अनेक जण मीठ घालून तो रस प्यायला जातो. पण असे गेल्यामुळे त्यातील अनेक घटक विषारी घटकांमध्ये रुपांतरीत करतात. त्यामुळे वेगवेगळे मसाले घालू नका.

खराब फळांचा वापर टाळा

काही जणांना असे वाटते की फळ नरम पडली किंवा ती घरी खाण्याच्या अवस्थेत नसली की त्याचा उपयोग अनेक जण रस काढण्यासाठी केला जातो. काही फळ उदा. सफरचंद, संत्री, कलिंगड अशी फळ उमळली की, मग त्याचा रस काढला जातो. पण अशी खराब झालेली फळ आणि त्यांचे रस हे अजिबात आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे तुम्ही फळ ताजी आणि चांगली असतानाच वापरा म्हणजे तुम्हाला त्याच कोणताही त्रास होणार नाही. 

आता फळांचे ज्युस करुन पिताना या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.

अधिक वाचा

वजन कमी करण्यासाठी प्या कडीपत्त्याचा रस, जाणून घ्या फायदे

अॅलोवेरा ज्यूस प्या, हेल्दी केस आणि त्वचा मिळवा


संत्री खाण्याचे फायदे अवश्य जाणून घ्या (Benefits Of Orange In Marathi)

Read More From आरोग्य