त्वचेची काळजी

कपिंग थेरपी करण्यापूर्वी या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या

Trupti Paradkar  |  Apr 22, 2021
कपिंग थेरपी करण्यापूर्वी या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या

 

 

कपिंग थेरपी ही एक प्राचिन  हेल्थ थेरपी असून जवळ जवळ पाच हजार वर्षांपासून या थेरपीचा वापर आरोग्यासाठी करण्यात आलेला आहे. कपिंग थेरपीमध्ये कपमधून व्हॅक्युम तयार करून ते शरीरातील खास केंद्रबिंदूंवर ते लावते जातात.  गरम केलेले हे कप तोंडाकडील बाजूने त्वचेवर ठेवले जातात. ज्यामुळे कपमधील हवा बंद होते आणि ते त्वचेवर चिकटून राहतात. कपिंग थेरपी ही एक पारंपरिक आणि प्राचिन उपचार पद्धती असून पूर्वी हे कप आयुर्वेदिक औषध अथवा कागदाने गरम केले जात असत. आजकाल या कपला सक्शन कप असं म्हटलं जातं. या कपमुळे स्नायू कमी प्रेशरवर खेचले जातात. ज्यामुळे त्वचेवर लालसर रंगाचे डाग पडतात. काही दिवसांमध्ये हे डाग निघून जातात. मात्र तुमच्या स्नायूंना चांगला आराम मिळतो. यासाठीच जाणून घ्या या कपिंग थेरपीविषयी महत्त्वाची माहिती

कपिंग थेरपीचे प्रकार

 

कपिंग थेरपी करण्यासाठी मुख्य तीन प्रकार वापरण्यात येतात.

ड्राय कपिंग –

ड्राय कपिंगसाठी कप सुंगधित तेलात बुडवून शरीराच्या अॅक्युप्रेशर बिंदूंवर ठेवले जातात. कपमुळे व्हॅक्युम तयार होतो आणि तुमची त्वचा खेचली जाते. 

फायर कपिंग –

काही प्रकारांमध्ये कपमध्ये अल्कोहोल आणि कापूस जाळला जातो आणि कप त्वचेवर ठेवला जातो. ज्याला फायर कपिंग असं म्हणतात. कपिंगसाठी हा कप दहा ते पंधरा मिनीटे त्वचेवर ठेवला जातो. 

वेट कपिंग –

वेट कपिंगसाठी लावण्यात आलेले कप त्वरित काढले जातात आणि त्वचेवर लहान कट दिले जातात. मात्र ही पद्धत फक्त तज्ञ्जांकडून करवून घेणं गरजेचं आहे. 

कपिंग थेरपीचे फायदे

 

कपिंग थेरपीचे अनेक फायदे होतात.  आरोग्यासाठी कपिंग थेरपी लाभदायक आहेच मात्र आजकाल त्वचेवर ग्लो येण्यासाठीही कपिंग थेरपी केली जाते.

कपिंग थेरपी करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या

 

कपिंग थेरपी शरीरासाठी कितीही चांगली असली तरी ती करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असायलाच हव्या. जसं  की, तुम्ही कोणाकडे कपिंग थेरपी घेत आहात. कारण आजकाल कपिंग थेरपी अनेक ठिकाणी दिली जाते. मात्र कपिंग थेरपी देणारी व्यक्ती प्रशिक्षित असणं फार गरजेचं आहे. त्याच प्रमाणे तुम्हाला  कपिंगचा कोणता प्रकार दिला जात आहे, कपिंग सेशन किती वेळ असणार आहे, त्याचा तुमच्या शरीरावर नेमका फायदा काय होणार, शिवाय या थेरपीसाठी कोणते कप वापरले जात आहे हे तुम्हाला थेरपी घेण्यापूर्वी माहीत असणं गरजेचं आहे. 

फोटोसौजन्य –

अधिक वाचा –

स्ट्रेच मार्क्स आणि एंटी एजिंग ट्रिटमेंटसाठी घ्या ‘हॉट कॅंडल वॅक्स मसाज थेरपी’

पीसीओएस या आजारावर स्टेम सेल थेरपी ठरतेय वरदान

या ज्यूस थेरपीने तुम्हाला मिळेल Long Lasting सौंदर्य

 

Read More From त्वचेची काळजी