Hair Cuts

केसांचा हेअरकट करण्याआधी या गोष्टी आहेत महत्वाच्या

Leenal Gawade  |  Jul 21, 2020
केसांचा हेअरकट करण्याआधी या गोष्टी आहेत महत्वाच्या

हेअरकट हा अनेकांसाठी कठीण असा विषय आहे. छान लांब वाढवलेले केस कापायचे म्हणजे अनेकांना टेन्शन असते. तर काहींना मात्र केस वाढवण्याचा कंटाळा असतो. पार्लर किंवा सलोनमध्ये गेल्यानंतर अशा दोन प्रकारच्या व्यक्ती आपल्याला अगदी हमखास दिसतात. केसांचा हेअरकट करताना तुम्हालाही फार प्रश्न पडत असतील आणि तुम्हालाही नेमका कोणता हेअरकट करावा हे कळत नसेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात त्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया. 

केसांवर हेअर ट्रिटमेंट केल्यानंतर करु नका तेल मालिश

हेअरकटची निवड

Instagram

हेअरकट करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या हेअरकटची निवड. अनेकदा एखाद्या सेलिब्रिटीचा एखादा हेअरकट आवडला की, आपण तो करण्यासाठी स्टायलिस्टला सांगतो. आपले फोटो दाखवतो. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, तुम्ही दाखवलेली हेअरस्टाईल तुम्हाला शोभून दिसेलच असे नाही. तुमच्या केसांचा पोत, रंग, केसांची लांबी यावर सगळे काही अवलंबून असते.तुम्हाला एखादा हेअरकट चांगला वाटत असेल तर तो आधी तुमच्या एक्सपर्टला दाखवा. कारण काही हेअरकट असे असतात ज्यासाठी तुमचे केस त्यासाठी योग्य असावे लागतात. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आणि एक्सपर्टचा सल्ला घेऊनच केस कापा.

उदा. एखादा कट सरळ केसांवर उठून दिसतो. अशावेळी तुमचे केस कुरळे असतील तर तो तुम्हाला कसा उठून दिसेल. किंवा जर तुम्हाला केसांचे बँग कापायचे असतील तर तुमच्या क्राऊन भागाकडील म्हणेच तुमच्या डोक्याच्या समोरच्या भागात केस जास्त हवेत.

हेअरस्टाईल करताना हेअर स्टायलिंग स्प्रे वापरताय, मग वाचाच

हेअरस्टायलिस्टची निवड

तुमच्या हेअरकटनंतर जर  काही महत्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे हेअरस्टायलिस्टची निवड. तुम्ही कुठेही जाऊन जरी केस कापत असलात तरी तुम्ही एखाद्या व्यक्तिचे स्किल पाहूनच त्याची निवड करता, हे अगदी योग्य आहे. केस कोणी कापावे यासाठी तुम्ही नक्कीच एखादा हेअरस्टायलिस्ट त्याच्या क्वालिटीनुसार निवडणे आवश्यक असते. जर तुमचा हेअरस्टायलिस्ट नेहमीचा ठरलेला असेल तर उत्तम. कारण त्याला तुमच्या केसांचा पोत, केसांच्या तक्रारी अधिक चांगल्या माहीत असतात. शिवाय तुम्ही केसांची काळजी कशी घेता हे देखील त्यांना माहीत असते. त्यामुळे तुम्ही हेअरस्टायलिस्टची निवड ही कधीही केस कापताना फार महत्वाची असते. 

केसांची निगा

Instagram

हेअरकट करणे सोपे आहे. पण एखादा हेअरकट केल्यानंतर तो सेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे हेअरकट केल्यानंतर केसांची निगा राखणे फारच गरजेचे असते. जर तुम्ही लेयर कट केला असेल तर त्यामध्ये तुमचे केस बरेचदा पातळ होतात. केस कितीही सरळ असले तरी ते वाकडे तिकडे होतात. ते कापल्यानंतर आणि सेट केल्यानंतर जसे दिसत होते. तसे ते कदाचित दिसत नाहीत. पण अशावेळी आपण हेअरकट का केला असे वाटायला लागते. म्हणूनच हेअरकट केल्यानंतर केसांची निगा राखा. 

उदा. केसांना शॅम्पू केल्यानंतर केस ब्रशने सेट करायला विसरु नका. त्यामुळे तुमच्या केसांना बाऊन्स चांगला मिळतो. केस चांगले दिसतात. 

आता जर तुम्हाला हेअरकट करायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

तुमच्या केसांसाठी हा हेअर स्पा ठरु शकतो वरदान

केसतोड म्हणजे काय

Read More From Hair Cuts