Recipes

चपाती कशी बनवतात सोप्या टिप्स | Chapati Recipe In Marathi

Dipali Naphade  |  Jan 18, 2022
Chapati Recipe In Marathi

पोळ्या (चपात्या) तर रोज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण प्रत्येक जण वेगळ्या पोळ्या बनवत असतं. काही जण पोळ्या करायला जातात तेव्हा गोलाकार आणि मऊ पोळ्या त्यांना बनवता येत नाहीत. कितीही प्रयत्न केले तरी चपात्या गोलाकार होतात पण मऊ होत नाहीत असंही काही जणांच्या बाबतीत घडतं. खरं तर गोल आणि मऊ पोळ्या (Chapati In Marathi) बनवण्याची खास टेक्निक आहे. सगळ्यांनाच ती जमते असं नाही. पण तुम्हाला कायम अशा पोळ्या बनवायच्या (Chapati Recipe In Marathi) असतील तर आमच्याकडे नक्कीच त्याच्या काही खास टिप्स आहेत ज्या आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पोळीचे पीठ आणि पाण्याचे प्रमाण. हे अतिशय योग्य असायला हवे. जेव्हा ही कणीक जास्त वेळ तुम्ही तिंबून ठेवाल तितकी अधिक चांगली. पिठात पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पोळी लाटताना ती चिकटेल आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं तर पोळी भाजताना ती कडक होईल आणि नंतर चिवट होईल. त्यामुळे नक्की काय टिप्स आपण मऊ आणि गोलाकार पोळीसाठी (Chapati Mau Honyasathi Upay) वापरायच्या हे या लेखातून पाहूया. अर्थात गोलाकार चपाती कशी बनवतात याच्या काही खास टिप्स. 

मऊ चपातीची खास रेसिपी | Chapati Recipe In Marathi

Chapati Recipe In Marathi

मऊ चपाती कशी करावी अथवा चपाती कशी बनवावी यासाठी काही खास गोष्टी करणे आवश्यक आहे. काही जणांना चपाती बनवता येत नाही. मग अशा व्यक्तींसाठी खास टिप्स. सर्वात पहिल्यांदा आवश्यक आहे ते म्हणजे चपातीसाठी कणीक भिजवणे. ही कणीक जर नीट भिजली नाही तर पोळ्या अर्थात चपाती नीट बनवता येणार नाहीत. त्यामुळे आधी घडीच्या पोळ्या किंवा मऊ चपातीसाठी कणीक कशी हवी ते पाहूया. 

घडीच्या पोळ्या किंवा मऊ चपातीसाठी कणीक

Chapati Recipe In Marathi

सर्वात आधी लक्ष द्यायला हवं ते आपल्या पिठाकडे. इथे आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देत आहोत ज्या युक्ती वापरून तुम्ही पोळ्या केल्यात तर त्या नक्कीच मऊ होतील आणि चिवट होणार नाहीत. 

गोल आणि मऊ चपाती कशी लाटावी

गोल आणि मऊ चपाती बनविण्याची एक ट्रिक असते. त्याप्रमाणे तुम्ही वापर केल्यास, तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. जाणून घ्या सोपी पद्धत

मऊ चपातीसाठी ती कशी भाजावी

चपाती कशी भाजायची याचेही टेक्निक आहे. अन्यथा चपाती काही वेळात चिवट होते अथवा भाजताना करपते. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेऊन त्याप्रमाणे चपाती भाजा 

मऊ चपाती कशी बनवायची टिप्स | Tips For Soft Chapati

चपाती कशी बनवतात

मऊ चपाती कशी बनवायची याच्या काही सोप्या टिप्स आहेत. तुम्ही या वापरून पोळी केली तर हमखास ती मऊच होणार. 

मऊ पोळ्या खाण्याचे फायदे | Benefits Of Soft Chapati In Marathi

पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. नक्की काय आहेत हे फायदे जाणून घ्या. गव्हाच्या चपातीमध्ये 57 कॅलरी असतात. पोळीला तूप लावल्याने कॅलरी वाढतात. मात्र तूप न लावता पोळी खाल्ल्यास त्याचाही फायदा होतो. यामध्ये लोह, कॅल्शियम, सेलिनियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी याची मदत मिळते. पोळीवर तूप लावून खाण्याचे अप्रतिम फायदे होतात.

प्रश्नोत्तरे | FAQ’s

1. दिवसातून किती पोळी खावी?
दिवसातून तुम्ही तुमच्या शरीराच्या उंची आणि जाडीनुसार पोळी खाण्याचे प्रमाण ठरवावे. मात्र योग्य आहार आहे की नाही हे पाहून मगच पोळीचेही सेवन करावे. 

2. शिळी पोळी खाण्याचे फायदे आहेत का?
हो ज्याप्रमाणे ताजी पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे शिळी पोळी खाण्याचेही फायदे आहेत. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नये. 

3. पोळीमुळे शरीरात एनर्जी मिळते का?
हो. आपल्यापैकी काही व्यक्तींना थोडंसं काम केलं तरी थकायला होतं. अशा व्यक्तींसाठी पोळी म्हणजे एनर्जी बूस्टरचं काम करते. वास्तविक या पोळीमध्ये कार्बोहायड्रेड्स असतात जे तुमच्या शरीरातील कमतरता पूर्ण करतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेज एनर्जी मिळते आणि तुम्हाला उत्साही वाटतं.

Read More From Recipes