तुम्हीही चर्चा ऐकली असेलच की, बॉलीवूड अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन मिळते किंवा अगदी हॉलीवूड अभिनेत्रींनाही. पण ही बाब जगातील सर्व महिला वर्गाला लागू होते. मग इंडस्ट्री कोणतीही असो. तुम्हाला माहीत आहे का की, जगभरातील महिलांना पुरूषांपेक्षा 33% कमी मानधन मिळते. ही बाब फक्त दुःखदच नाहीतर चुकीची आहे. कारण कोणत्याही पुरूषांपेक्षा कामाच्या बाबतीत स्त्री कमी नाही. तीही तेवढ्याच डेडीकेशनने काम करते. याउलट महिला तर मल्टीटास्कींग असतात ज्या घरातल्याही गोष्टी सांभाळतात आणि ऑफिसच्याही. तुमच्यापैकी अनेकींना हा अनुभव नक्कीच आला असेल. मग तरीही का महिलांना कमी पगार दिला जातो.
तुम्हाला पुढच्या जॉबवेळी असा अनुभव टाळायचा असल्यास जाणून घ्या की, तुम्ही तुमच्या पगाराबाबत किंवा अप्रेजलबाबत कसं निगोशिएट करू शकता. याबद्दलचे काही मुख्य मुद्दे सांगत आहेत Salt Attire.Com च्या पल्लवी देशमुख.
1. रिसर्च Research – कधीही नोकरी शोधताना किंवा बदलताना ग्लासडोअर किंवा इतर अशी माहिती देणाऱ्या वेबसाईट्सवर त्या इंडस्ट्रीचे आणि इतर कंपन्यांचे वेतनाबाबतचे काय नियम आहेत ते जाणून घ्या.
2. कधीही नोकरीच्या मुलाखतीत आधी नोकरी देणाऱ्या कंपनीची व्यक्ती किती पगार ऑफर करते ते पाहा आणि मग तुमचा अपेक्षित पगार त्यांना सांगा.
3. तुम्हाला अपेक्षित असलेली सॅलरी रेंज त्यांना सांगा. जर तुम्हाला ऑफर करण्यात आलेला पगार अगदीच अपेक्षापेक्षा कमी असेल तर नम्रपणे सांगा की, हे तुम्हाला अपेक्षित नव्हतं आणि त्यांना पुढील उमेदवार शोधण्यासाठी शुभेच्छा द्या.
4. पैसे आणि बरंच काही – जर तुम्हाला ऑफर करण्यात आलेला पगार कमी असेल तर बाकीच्या मिळणाऱ्या फायद्यांचा विचार करून पाहा. उदाहरणार्थ, इसेंटीव्हज्, रिटायरमेंट प्लॅन्स, इन्शुअरन्स कव्हर आणि इतर अलाऊन्सेस. तुम्हाला माहीत आहे का, आजकाल काही कंपन्यांकडून वॉर्डरोब अलाऊन्ससुद्धा देण्यात येतो.
5. विचारा – तुम्ही दिलेल्या ऑफरबाबत आनंदी किंवा खूश नसलात तर नम्रपणे विचारा की, ऑफर केलेल्या पॅकेज किंवा सॅलरीमध्ये काही वाढ होऊ शकते का. जास्तीतजास्त ते नाही म्हणतील. पण काहीवेळा थोड्या प्रमाणात वाढीव सॅलरीसुद्धा ऑफर केली जाते किंवा काही कंपन्या त्याऐवजी इतर बेनीफिट्स ऑफर करतात. जसं महिन्यातील तीन दिवस तुम्ही वर्क फ्रॉम करू शकता किंवा सोयी देणं.
6. मैत्री करा – जरी यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली नाही तरी एचआर डिपार्टमेंट किंवा मॅनेजरशी चांगला रॅपो ठेवा. ज्यामुळे तुम्हाला ते भविष्यातील संधीसाठी नक्की संपर्क करतील.
7. योग्य ड्रेसिंग – हे काहीसं ऐकायला विचित्र वाटेल पण हा मानवी स्वभाव आहे जो बघितल्यावरच काही गोष्टी ठरवतो. त्यामुळे जर इंटरव्ह्यूला गेल्यावर तुमचे कपडे आणि तुमचा ओव्हर ऑल लुक छान असेल तर समोरच्यावर आपोआपच चांगलं इंप्रेशन पडतं.
कोणीतरी असं सांगूनही गेलंय की, तुम्हाला जो जॉब हवा आहे त्यासाठी ड्रेसअप व्हा… जो तुमच्याकडे आहे , त्यासाठी नाही.
जर तुमच्याकडेही सॅलरी निगोशिएन्सबाबत किंवा करिअरबाबत काही टिप्स असतील तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही आमच्या पुढच्या लेखात त्या नक्कीच सांगू. तोपर्यंत वाचत राहा #POPxoMarathi.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade