Bridal Skincare

लग्नासाठी काहीच दिवस शिल्लक असतील तर कशी घ्यावी त्वचेची काळजी (Tips For Skin Care In Marathi)

Dipali Naphade  |  Apr 30, 2019
लग्नासाठी काहीच दिवस शिल्लक असतील तर कशी घ्यावी त्वचेची काळजी (Tips For Skin Care In Marathi)

मे महिना सुरु झाला की, इतर हंगामाबरोबर सुरू होतो तो लग्नाचा हंगाम. प्रत्येक मुलगी आपल्या लग्नाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात असते. या दिवशी सर्वात सुंदर आणि अगदी सर्वांपेक्षा वेगळी आपण दिसावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. कारण सगळ्या लग्नामध्ये लक्ष असतं ते नवरीकडे. हा एकच दिवस असा असतो ज्या दिवशी नवरी म्हणजे एक सेलिब्रिटी असते. सगळे कॅमेरा आणि सर्व लक्ष हे फक्त तिच्याकडे असतं. त्यामुळे या दिवशी नवरीने सुंदर दिसणं खूपच आवश्यक असतं. पण त्यासाठी आधीपासूनच आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यायला हवी हे तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या लग्नाला जर आता काही दिवसच उरले असतील तर तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घ्यायला आता सुरुवात करायलाच हवी. आम्ही तुम्हाला रोजच्या रोज नक्की काय करायला हवं याच्या काही टीप्स आणि ट्रीक्स इथे सांगणार आहोत. या तुम्ही अंमलात आणल्यात तर तुम्ही तुमच्या लग्नामध्ये खूपच सुंदर दिसाल यामध्ये कोणतीच शंका नाही.

बेसन-हळदीचं उटणं (Besan Haldi Uptan)

बेसनात त्वचा उजवळण्याचे सर्व गुण असतात आणि हळद लग्नासाठी सर्वात शुभ समजली जाते. विशेषतः लग्नाच्या वेळी हळदीचे विधीदेखील प्रत्येकाकडे केले जातात. हळद तुमच्या चेहऱ्यावरील असणारे डाग काढून टाकून तुमचा चेहरा उजळवण्याचं काम करते.  उटणं तयार करण्यासाठी तुम्ही 1 चमचा बेसन, 1 चमचा कणीक, थोडीशी हळद, मिल्क पावडर, वाटलेली मसूर डाळ आणि दही अथवा दूध एकत्र करा आणि चेहऱ्यावर आणि तुमच्या मानेवर लावा. हे सुकल्यानंतर पाणी न लावता रगडून हे काढा. असं आठवड्यातून चार वेळा तरी किमान तुम्ही करा. असं केल्यामुळे तुम्हाला एका आठवड्यातच तुमच्या चेहऱ्यावरील फरक दिसून येईल.

झोपेची कोणतीही तडजोड नको (Don’t Compromise Sleep)

लग्नाच्या आधी बऱ्याचशी गोष्टींमुळे आणि धावपळीमुळे तुमची झोप अक्षरशः उडून जाते. आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी रात्रभर बोलत बसण्याचं कारण असो अथवा अन्य कोणतं कारण तुम्ही तुमची झोप उडवून घेऊ नका. कारण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त झोप घ्यायला हवी. तसंच सर्व चिंंतांपासून मुक्त राहायला हवं. कोणतीही चिंता मनामध्ये न ठेवता तुम्ही चिंतामुक्त राहायला हवं. तुमची झोप पूर्ण झाल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येत नाहीत तसंच तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा तसाच राहील. त्यामुळे तुम्ही झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका.

लग्नाच्या आधी फेशियलची योग्य वेळ (Facials Before Marriage)

तसं तर लग्नाच्या आधी 6 महिन्यांपासूनच तुम्ही तुमच्या फेशियलचं रूटीन बनवून घ्यायला हवं. पण तुमच्या लग्नासाठी जर काही दिवसच राहिले असतील तर लग्नाच्या आधी 15 दिवस फेशियल नक्की करा. या फेशियलला प्री-ब्रायडल फेशियलदेखील म्हटलं जातं. शिवाय तुम्हाला जमलं तर ब्लीच करू नका. कारण ब्लीच केल्यामुळे तुमच्या त्वचेचे केस गोल्डन अर्थात सोनेरी होतात आणि त्यामुळे लग्नाच्या दिवशी कॅमेऱ्यामध्ये हे खूपच विचित्र दिसतं.

सनस्क्रिन लावा आणि चेहरा झाकूनच घराबाहेर पडा (Sunscreen For Your Face)

तुम्ही जेव्हा त्वचेची इतकी काळजी घेत आहात तर तुम्ही उन्हामध्ये जाण्याआधीदेखील काळजी घ्या. विशेषतः सध्या जो उन्हाळा चालू आहे या गरमीमध्ये बाहेर पडायचं झाल्यास, आपल्या उघड्या त्वचेवर सनस्क्रिनचा वापर करा आणि चेहरा कॉटनच्या कपड्याने झाकून घ्या.


असेच काही सोपे उपाय तुम्ही वापरून तुमच्या लग्नात खूप सुंदर दिसू शकता. तुम्ही हे उपाय केलेत तर विश्वास ठेवा तुम्ही नक्कीच एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी दिसणार नाही. तुमच्या सौंदर्याला अधिक शोभा येईल हे नक्की.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा 

त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान

सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी

मैत्रिणीचं लग्न ठरलंय ? मग तुमच्या मनात हे विचार हमखास येणार

Read More From Bridal Skincare