मेकअप

या पद्धतीने लावा लिपस्टिक ग्लासवर नाही लागणार डाग

Trupti Paradkar  |  Dec 29, 2020
या पद्धतीने लावा लिपस्टिक ग्लासवर नाही लागणार डाग

एखाद्या खास पार्टीला जाताना तुम्ही सर्वात जास्त भर देता ते तुमच्या लुकवर.कारण पार्टीमध्ये तुम्हाला स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसायचं असतं. पार्टीसाठी मेकअप करताना गडद रंगाच्या बोल्ड लिपस्टिक लावल्यामुळे तुमचा स्टेटमेंट लुक पूर्ण होतो. शिवाय बोल्ड लिपस्टिक तुमचा आत्मविश्वास वाढवते. मात्र या बोल्ड लिपस्टिकचा एक तोटाही असतो. तो असा की काहिही खाताना अथवा पिताना अशा लिपस्टिकचे डाग कप, ग्लासवर लागतात. ज्यामुळे पार्टीमध्ये तुम्हाला थोडासा संकोच नक्कीच वाटू शकतो. शिवाय अशा प्रकारे सर्व गोष्टींना लिपस्टिक लागत राहिल्यास तुमच्या ओठांवरील लिपस्टिक खराब होते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार लिपस्टिक टचअप करावी लागते. यासाठीच लिपस्टिक अशा पद्धतीने लावावी ज्यामुळे तिचे डागही लागणार नाहीत आणि तुम्हाला सारखं टचअपदेखील करावं लागणार नाही. अशा प्रकारे लिपस्टिक लावण्यासाठी या काही सोप्या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात. जाणून घ्या कोणत्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायला हव्या. 

लिपस्टिक लावण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी –

जसं मेकअप करण्यापूर्वी त्वचेची काळजी  घ्यायला हवी अगदी तशीच लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांची काळजी  घ्यायला हवी.लिपस्टिक लावण्यापूर्वी नेहमी तुमचे ओठ एक्सफोलिएट आणि मॉईस्चराईझ करा. त्याचप्रमाणे लिपस्टिक लावण्याआधी नेहमी ओठांवर लिप प्रायमर लावा. जर तुमच्याकडे लिप प्रायमर नसेल तर तुम्ही तुमच्या ओठांना तुमचं कन्सिलर अथवा फाऊंडेशनही लावू शकता. 

Shutterstock

लिपलायनरचा वापर करा असा –

बऱ्याचदा घाईघाईत तयार होताना तुम्ही ओठांना फक्त लिपस्टिक लावता. मात्र ओठांवर अशी थेट लिपस्टिक कधीच लावू नये. जास्त काळ टिकण्यासाठी लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत फॉलो करणं आवश्यक आहे. यासाठी आधी ओठांना लिप लायनर लावा आणि मग लिपस्टिकने ओठ फिल करा. ज्यामुळे तुमची लिपस्टिक जास्त काळ टिकण्यास मदत होईल. शिवाय यामुळे ओठांना छान बेस मिळेल आणि लिपस्टिक पसरणार नाही. अशा प्रकारे लिपस्टिक लावल्यास ती कप, ग्लासवर लागणार नाही. 

लिपस्टिक ब्लॉट करा

ही टेकनिक फॉलो केल्यास तुमच्या लिपस्टिकचे डाग कोणत्याच गोष्टीवर लागणार नाहीत. यासाठी लिपस्टिक लावल्यावर ती सुकण्यासाठी काही सेंकद वाट पाहा. त्यानंतर एक स्वच्छ टिश्यू घ्या आणि ओठांवर दाबून ठेवा ज्यामुळे तुमच्या ओठांवरील अतिरिक्त लिपस्टिक निघून जाईल. त्यानंतर लिपस्टिक पुन्हा ओठांवर लावा. ज्यामुळे तुमचे ओठ तर आकर्षक दिसतील पण तुमची लिपस्टिक लवकर खराब होणार नाही. 

Shutterstock

पावडरने ओठ डस्ट करा –

लिपस्टिक टिकवण्याचा आणि लिपस्टिकचे डाग लागू न देण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. यासाठी लिपस्टिक लावल्यावर ओठांवर टिश्यू पेपर ठेवा आणि त्यावर तुमची टाल्कम पावडर डस्ट करा. ज्यामुळे तुमच्या ओठांवरील अतिरिक्त तेल, क्रिम टीश्यू आणि पावडर शोषून घेईल. त्याचप्रमाणे ओठांवरील लिपस्टिक योग्य पद्धतीने लॉक केली जाईल. ज्यामुळे तुमची लिपस्टिक काहिही खाताना अथवा पिताना कप, ग्लासवर लागणार नाही. शिवाय तुम्हाला सतत टचअपदेखील करावं लागणार नाही. 

Shutterstock

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

थंडीतही वापरायची असेल मॅट लिपस्टिक तर वापरा या सोप्या टिप्स, होणार नाहीत ओठ कोरडे

हिवाळ्यात चेहऱ्यावर फाऊंडेशन लावण्यापूर्वी अशा घ्या काळजी

घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक (How To Do Makeup At Home In Marathi)

Read More From मेकअप