Love

‘या’ गोष्टींची काळजी घेतली तर पैशांमुळे बिघडणार नाहीत नातेसंबंध

Trupti Paradkar  |  Mar 10, 2020
‘या’ गोष्टींची काळजी घेतली तर पैशांमुळे बिघडणार नाहीत नातेसंबंध

सुखी होण्यासाठी धनसंपत्ती गरजेची आहे. दैनंदिन गरजा भागवणं असो वा एखादी सुखसुविधा खरेदी करणं असो कोणत्याही गोष्टीसाठी पैसे लागतातच. मात्र या पैशांमागे धावता धावता कधीकधी नातेसंबध खराब होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. पैसे आणि नातेसंबध या दोन्ही गोष्टी सुखी जीवनासाठी महत्त्वाच्या असतात. नात्यातील गोडवा राखण्यासाठी आर्थिक व्यवहार जपून आणि सावधपणे करणं गरजेचं आहे. लग्न झाल्यावर अथवा रिलेशनशिपमध्ये असताना आधीच जर याबाबत योग्य ती सावधगिरी बाळगली तर भविष्यात याबाबत मतभेद होत नाहीत. यासाठीच कोणत्याही नात्याची गुंतागुंत वाढण्याआधीच या सोप्या टिप्स जरूर फॉलो करा.

Shutterstock

लग्नापूर्वी जोडीदाराच्या आर्थिक स्थितीची माहीती घ्या –

बऱ्याचदा लग्नासाठी स्थळं पाहताना जास्तीत जास्त श्रीमंत स्थळांची निवड केली जाते. मात्र असंं मुळीच करू नये. दोन्ही कुटुंबाची आर्थिक स्थिती एकसमान असेल तर लग्नानंतर कोणतेही वाद पैशांवरून होत नाहीत. शिवाय यामुळे मुलामुलींच्या वैवाहिक जीवनावर एकमेकांच्या आर्थिक परिस्थितीचा कोणचा तणावदेखील जाणवत नाही. 

Shutterstock

आर्थिक व्यवहार निरनिराळे ठेवा –

जेव्हा तुम्ही लग्न करून एखाद्या नवीन घरात जाता. तेव्हा तुम्हाला त्यांच्या घरातील आर्थिक व्यवहार माहीत नसतात. आर्थिक स्वावलंबन हे प्रत्येकाला नक्कीच हवं असतं. कारण भविष्यात पुढे काय होणार हे तुम्ही आताच नाही सांगू शकत. त्यामुळे प्रेमात, रिलेशनशिपमध्ये असताना अथवा लग्न झाल्यावर एकमेंकांवर आर्थिक बाबतीत अवलंबून राहू नका. एकत्र कुटूंबात असला तरी स्वतःचे आर्थिक व्यवहार निराळे ठेवा. एकमेकांना आर्थिक मदत करणं, कुटुंबाला आर्थिक सहकार्य करणं हे नक्कीच गरजेचं आहे. मात्र कुटुंबातील लोकांसोबत अथवा जोडीदारासोबत तुमचे आर्थिक व्यवहार एकत्र करू नका. तुमचं बॅंकेतील खातं आणि त्यासाठी पाळावी लागणारी गुप्तता याबाबत सावध राहा. भविष्यात अडचणी येऊ नयेत यासाठी सुरूवातीलाच काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आर्थिक व्यवहारांविषयी जोडीदाराशी सल्ला मसलत करण्यास काहीच हरकत नाही. मात्र आर्थिकबाबींसाठी पूर्णपणे जोडीदारावर अवलंबून राहू नका.

Shutterstock

भेटवस्तू देताना आर्थिक बजेट आधीच ठरवा –

बऱ्याचदा प्रेमात अथवा रिलेशनशिपमध्ये असताना सेलिब्रेशन करण्यासाठी एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी मौल्यवान भेटवस्तू देणं यात काहीच चुक नाही. मात्र असं करताना तुमचं बजेट कोसळणार नाही याची काळजी घ्या. कारण समोरच्या व्यक्तीच्या आर्थिक स्थिती अथवा आवडीप्रमाणे भावनिक होऊन बजेटपेक्षा जास्त खर्च करण्यात काहीच अर्थ नाही. यासाठी एकमेकांना भेटवस्तू देण्यापूर्वी तुमचं बजेट आधीच ठरवा. शिवाय जोडीदाराला भावनिक करून उगाचच महागडी भेटवस्तू घेण्याचा हट्ट करू नका. कारण शेवटी जोडीदाराचं नुकसान हे तुमचंच नुकसान आहे हे लक्षात ठेवा. 

Shutterstock

जोडीदारासोबत खर्च वाटून घ्या –

आजकाल करिअर ही सर्वांसाठीच महत्त्वाची बाब झालेली आहे. त्यामुळे स्त्री आणि पुरूष दोघेही उत्तम कमावणारे असतात. सहाजिकच आर्थिक बाबतीत स्त्री आणि पुरूष हे दोघेही एकसमान आहेत.  मग जेव्हा लग्नानंतर एकत्र राहण्याची वेळ येते तेव्हा घरखर्चाचं ओझं फक्त एकानेच का घ्यायचं. म्हणूनच घरासाठी लागणारे खर्च एकमेकांनी वाटून घ्यायला हवे. ज्यामुळे भविष्यात पैंशांमुळे तुमच्यात कधीच वाद होणार नाहीत. घर विकत घेण्यापासून ते अगदी संसारासाठी लागणारा प्रत्येक खर्च हा दोघांनी मिळून करायला हवा. 

घेतलेले पैसे परत देण्याची आठवण ठेवा –

रिलेशनशिपमध्ये असताना बऱ्याचदा गरजेच्या वेळी एकमेकांचे पैसे वापरले जातात. तुझे ‘काय आणि माझे काय’ ‘सगळं काही आपल्या दोघांचंच आहे’ असं म्हणत असे पैसे वापरणं नक्कीच चुकीचं नाही. मात्र वेळ पडल्यावरआपल्या जोडीदारालाही अशीच मदत करण्याची आठवण ठेवा. नाहीतर कोणत्याही कारणासाठी सरळ उधार घेतलेले पैसे वेळच्या वेळी परत करण्याची स्वतःला सवय लावा. ज्यामुळे आर्थिक व्यवहारांमुळे तुमच्या नात्यात दुरावा येणार नाही. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

तुमच्या ‘या’ सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे

शॉपिंगवर खूप खर्च करत असाल तर या पद्धतीने वाचवा पैसे

सध्या गरज आहे ती म्युच्युअल फंडाची…महिलांनीही गुंतवा म्युच्युअल फंडात पैसे

 

Read More From Love