उन्हाळा म्हणजे घामाच्या धारा आणि सहन न होणारा उकाडा. त्यामुळे अनेकांना हा सीझन मुळीच आवडत नाही. मात्र या काळातच अनेक महाराष्ट्रीय सण आणि लग्नसोहळे असतात. शाळांना सुट्टी लागलेली असते त्यामुळे घरात अनेक मंगल कार्य आयोजित केली जातात. अशा काळात पारंपरिक वेशभूषा केल्यावर साजेसा मेकअप गरजेचा असतो. मात्र घामामुळे तुमचा मेकअप कुठल्या कुठे निघून जातो. आयलायनर अथवा काजळ स्प्रेड झाल्यामुळे चेहरा काळवंडल्याप्रमाणे दिसतो. यासाठीच जाणून घ्या उन्हाळ्यात स्वेट प्रूफ मेकअप कसा करावा.
उन्हाळ्यात असा करा मेकअप
उन्हाळ्यात मेकअप करताना काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचा लुक नक्कीच परफेक्ट दिसेल.
चेहऱ्यावर चांगले मॉईच्सराईझर लावा
उन्हाळा सुरू झाला की तुम्ही लगेच मॉईस्चराईझर लावणं सोडून देता. मात्र असं करू नका कारण त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडते आणि मेकअपचे पॅच दिसू लागतात. जर तुम्हाला मॉईस्चराईझरमुळे चेहरा चिकट दिसेल असं वाटत असेल तर उन्हाळ्यासाठी खास मॉईस्चराईझरची निवड करा. अशा वेळी जेल बेस आणि लाईटवेट मॉईस्चराईझर तुम्ही त्वचेवर लावू शकता.
सनस्क्रिन लावणं टाळू नका
मॉईस्चराईझरमुळे तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट राहते. मात्र यासोबत तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षणाची गरज असते. यासाठी मेकअप करण्यापूर्वी त्वचेवर चांगल्या गुणवत्तेचं सनस्क्रिन लावायला विसरू नका. असं नाही केलं तर तुमची त्वचा टॅन होईल आणि तुमचा मेकअप लुक बिघडेल.
प्रायमर लावणं आहे गरजेचं
मेकअपचा बेस लावण्यापूर्वी तो सेट होण्यासाठी त्वचेवर प्रायमर लावणं गरजेचं असतं. कारण जर तुम्ही प्रायमर शिवाय फाऊंडेशन चेहऱ्यावर लावलं तर तुमचा मेकअप पॅची होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय प्रायमरमुळे तुमचा मेकअप चेहऱ्यावर जास्त काळ टिकून राहतो.
हलका आणि कमी मेकअप करा
सणसमारंभ अथवा लग्नकार्यात हेव्ही मेकअप करण्याची अनेकींना आवड असते. मात्र जर तुम्ही उन्हाळ्यात मेकअप करत आहात तर तुम्ही हलका मेकअप करायला हवा. हेव्ही मेकअप केल्यामुळे तुचा लुक बिघडण्याची शक्यता जास्त असते. यासाठी हलके टिंट वाले मॉईच्सराईझर निवडा. कन्सिलरने तुम्ही तुमची त्वचा एकसमान करू शकता.
वॉटरप्रूफ आय मेकअप वापरा
घामामुळे तुमचं तुमचा आय मेकअप सर्वात आधी पसरतो. शिवाय डोळ्यांचा मेकअप खराब झाला तर तुमच्या संपूर्ण लुकवर त्याचा परिणाम होतो. यासाठी उन्हाळ्यात नेहमी वॉटरप्रूफ आय मेकअपचा वापर करा. ज्यामुळे तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही.
सेटिंग पावडर अवश्य लावा
सेटिंग पावडर अथवा बनाना पावडरमुळे तुमचे कन्सिलर, फाऊंडेशन सेट होते. शिवाय यामुळे तुम्हाला सतत घाम येत नाही आणि तुमचा मेकअपही खराब होत नाही. म्हणूनच उन्हाळ्यात मेकअप करताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या मेकअप बॉक्समध्ये सेटिंग पावडर असायलाच हवी.
शिमर मेकअप टाळा
हेव्ही मेकअप केल्यावर चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी शिमरचा वापर केला जातो. मात्र उन्हाळ्यात असे क्रिम बेस प्रॉडक्ट अथवा शिमर इफेक्ट देणारे प्रॉडक्ट वापरणं त्रासदायक ठरू शकतं. कारण तुमचा चेहरा अशा उत्पादनांमुळे अधिक तेलकट आणि काळवंडलेला दिसू शकतो.