सौंदर्य

डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी फॉलो करा या ‘10 टीप्स’

Sneha Ranjankar  |  Dec 19, 2018
डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी फॉलो करा या ‘10 टीप्स’

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं असणं हा खूपच कॉमन स्कीन प्रॉब्लेम आहे. साधारणतः फार थकल्यानंतर डोळ्यांखाली डार्क सर्कल्स दिसू लागतात. आजकाल बाजारात डार्क सर्कल दूर करण्यासाठी अनेक प्रॉडक्टस् उपलब्ध आहेत. या उत्पादनांच्या वापरामुळे डोळ्यांखालील त्वचा उजळते, असा दावा त्यांच्याकडून केला जातो. मात्र कधीकधी या उत्पादनांमुळे त्वचेवर दुष्परिणामच झाल्याचं अधिक आढळून येतं. यासाठीच आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टीप्स फॉलो करण्याचा सल्ला देत आहोत. ज्यामुळे तुमचे डार्क सर्कल्स लवकर कमी होतील.

डार्कसर्कल दूर करण्यासाठी करा हे  साधे उपाय

पूर्ण झोप घ्या-डार्क सर्कल्स होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही घेतलेली अपूर्ण झोप.म्हणूनच दररोज कमीत कमी 7 तास निवांत झोपा.

डाएटमध्ये घ्या व्हिटॅमिन आणि कॅल्शियम-तुमच्या डाएटमध्ये व्हिटॅमिन बी-6, बी-12, कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिडचा अवश्य समावेश करा.

हायड्रेटेड रहा-तुम्ही कितीही बिझी असलात तरी सतत पाणी प्यायला विसरु नका. दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने पुरेसं पाणी पित रहा. हायड्रेटेड राहिल्यानं डार्क सर्कल आणि पफी आईजची समस्याच निर्माण होत नाही.

स्मोकिंग आणि ड्रिंकिंग टाळा-स्मोकिंग आणि ड्रिंकिंगपासून लांब रहा. सिगरेट ओढल्याने आणि दारु प्यायल्याने डार्क सर्कल्स वाढतात. त्यामुळेच या गोष्टी कटाक्षाने टाळा.

डोळे चोळू नका-डार्क सर्कल्स असतील तर कधीच डोळे चोळू नका. कारण त्यामुळे तुमच्या डोळ्याभोवतीची वर्तुळं अधिक मोठी होतील.

आयपॅकसाठी टी बॅग्ज्स वापरा –ब्लॅक किंवा ग्रीन टी बॅग्ज्स थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. या थंड केलेल्या टी बॅग्स डोळ्यांवर ठेऊन थोडयावर आराम करा. तुम्ही टी बॅग्ज्सऐवजी कोल्ड कम्प्रेसचाही वापर करु शकता.  

सनस्क्रीन लावायला विसरु नका-घरातून बाहेर पडण्याआधी सनस्क्रीन लावायला कधीच विसरु नका. जर तुम्ही जास्त वेळ बाहेर राहणार असणार असाल तर दर दोन तासांनी सनस्क्रीन लावा. उन्हात फिरताना हॅट आणि गॉगल्स कॅरी करा शिवाय स्कार्फने चेहरा पूर्ण कव्हरदेखील करा.  

अंडर आयक्रीम मस्ट-डोळ्यांभोवती नेहमी अंडर आयक्रीम लावून तिथला भाग मॉइश्चराइज करा. अंडर आयक्रीमऐवजी तुम्ही अंडर आयमास्कसुध्दा वापरु शकता. पण हे प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी स्कीन स्पेशलिस्टचा सल्ला घेणं जरूरी आहे.

मेडीकल ट्रीटमेंट-डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी मेडीकल ट्रीटमेंटसुध्दा उपलब्ध आहे. या समस्येवर हे उपचार फारच फायदेशीर ठरतात. या उपचारांमध्ये डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी ज्या नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहेत त्या सुरक्षित आणि स्वस्त देखील असतात.

मेडीकेटेड क्रीम आणि औषधं-डार्क सर्कल्ससाठी काही चांगल्या मेडीकेटेड क्रीम आणि औषधंही बाजारात उपलब्ध असतात. याबाबत तुम्ही तुमच्या डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला नक्कीच घेऊ शकता.

 

Read More From सौंदर्य