Care

प्रवासात केसांची काळजी घेण्यासाठी तयार करा तुमचे हेअर केअर पाऊच

Leenal Gawade  |  Dec 23, 2019
प्रवासात केसांची काळजी घेण्यासाठी तयार करा तुमचे हेअर केअर पाऊच

प्रवास करायला कितीही आवडत असले तरी घरी आल्यानंतर होणारी केसांची अवस्था आपल्या सगळ्यांनाच अगदी नको होते. प्रवासात असे पर्यंत छान केस मोकळे सोडून फोटो काढण्याचा तो आनंद घरी आल्यानंतर अगदी विरुनच जातो. तुमच्या केसांच्या बाबतीत ही प्रवासात असे काही होत असेल तर तुम्हाला आम्ही आज हेअर केअर पाऊचबद्दल सांगणार आहोत. तुम्ही अगदी घरच्या घरी तुमच्या सोयीनुसार हे हेअर केअर पाऊच बनवू शकता.या हेअर केअर पाऊचमुळे तुमच्या केसांची होणारी दुरवस्था टाळता येईल आणि तुमचे केस कितीही प्रवास केला तरी चांगले राहण्यास मदत मिळेल…करुया सुरुवात

हिवाळ्यात केसातील कोंडा घालवण्यासाठी करा सोपे उपाय

तुमच्या हेअर केअर पाऊचमध्ये हव्या या गोष्टी

shutterstock

आता हेअर केअर पाऊचमधील गोष्टी काही कठीण किंवा महागड्या नाहीत. तर त्या तुम्ही अगदी सहज विकत घेऊ शकता  आणि त्यांचे वजनही फार नाही. 

हेअर ब्रश: बाहेर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या हेअर केअर पाऊचमध्ये हेअर ब्रश ठेवणे फारच गरजेचे आहे. जर तुमच्या केसांचा सतत गुंता होत असेल तर तुम्ही तुमचे केस किमान तासाभराने तरी विंचरायला हवेत. त्यामुळे तुमचे केस विंचरताना तुम्हाला कंटाळा येणार नाही. शिवाय ते गळणारही नाहीत. त्यामुळे तुम्ही अगदी लहान आकाराचा तरी हेअर ब्रश तुमच्या पाऊचमध्ये ठेवावा. 

केसांचे सीरम: तुमच्या केसांचा गुंता सोडवताना तुम्ही तुमच्या पाऊचमध्ये एखादे सीरम ठेवा. कारण जर तुम्ही दिवसभरात केस विंचरले नसतील तर तुमच्यासाठी सीरम हे अगदी महत्वाचे आहे. सीरम लावल्यानंतर तुम्ही कोणतेही अधिकचे कष्ट न घेता केस विंचरु शकता. कारण त्यामुळे तुमचे केसही गळत नाही. त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या आवडीनुसार एखादे सीरम असायला काहीच हरकत नाही. 

टाल्कम पावडर: प्रवासात केस धुवू नका असा सल्ला दिला जातो. याचे कारण असे की, प्रत्येक ठिकाणचे पाणी वेगळे असते. काही जणांना या पाण्याचा त्रास होऊ शकतो. काही जणांचे केस त्यामुळे गळू लागतात. जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही ही रिस्क घेऊ नका. तुमच्यासोबत एखादी बेबी पावडर किंवा टाल्कम पावडर असू द्या. जर तुमचे केस फारच तेलकट होत असतील तर तुम्ही तुमच्या केसांमध्ये टाल्कम पावडर टाका. म्हणजे तुमच्या केसांचा तेलकटपणा इन्स्टंट निघून जाईल आणि तुमचे केस चांगले दिसतील.

पोनी रबर: प्रवासात तुम्ही तुमचे केस बांधणे  अधिक चांगले असते. जर तुम्ही केस बांधत नसाल तरी सुद्धा प्रवासात असताना केस बांधा. शक्य असेल तर तुम्ही तुमच्या केसांची वेणी बांधा याचे कारण असे की, तुमच्या केसांचा गुंता होणार नाही. शिवाय तुमचे केस प्रवासात चांगले राहतील. त्यामुळे तुमच्या पाऊचमध्ये केसांचा रबर असू द्या. 

कॉटन स्कार्फ: तुमच्या केसांना सतत उन लागणेसुद्धा चांगले नाही म्हणूनच जर तुम्ही तुमच्या पाऊचमध्ये कॅरी केले तर फारच चांगले. बाहेर पडताना तुम्ही चेहऱ्याची जितकी काळजी घेता अगदी तशीच काळजी तुम्हाला तुमच्या केसांची घ्यायाची आहे. कारण त्यामुळे तुमच्या केसांचे उन्हापासून संरक्ष होईल. कॉटनचा पातळ स्कार्फ तुमच्यासाठी चांगला आहे. 

आता जर तुम्ही प्रवास करणार असाल तर आताच तुमचे हेअर केअर पाऊच तयार करा आणि प्रवास करा.

केसांचे रोज स्ट्रेटनिंग करण्यापेक्षा करा smoothing, केस दिसतील नेहमीच सुंदर

 #POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 Link to bold part with: https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From Care