आरोग्य

प्रेगनन्सीमध्ये प्रवास करताय, मग स्वतःची अशी घ्या काळजी

Trupti Paradkar  |  Oct 25, 2021
traveling during pregnancy safety tips in Marathi

गरोदरपणाचा हा काळ हा त्या स्त्रीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी खूप खास असतो. मात्र बऱ्याचदा गरोदरपणात अनेक महिलांना हे करू नको ते करू नको असे सल्ले दिले जातात. सावधगिरी म्हणून चक्क प्रवासच न करण्याचा सल्ला दिला जातो. प्रेगनन्सीमध्ये जरी पोटातील बाळाची योग्य काळजी घेण्यासाठी काही गोष्टी टाळाव्या लागत असल्या तरी हा काही कोणता आजार  नाही. या काळात गरोदर स्त्री जितकी आनंदी आणि उत्साही असेल तितका तिच्या बाळावर त्याचा चांगला परिणाम होतो. मात्र गरोदरपणातील नऊ महिन्यात स्त्रीच्या शरीरात आणि मानसिक अवस्थेत अनेक बदल होत असतात. यासाठीच या काळात प्रवास करताना काही बाबतीत महिलांनी योग्य ती काळजी घ्यावी. 

गरोदर राहण्यासाठी उपाय, महत्त्वाची माहिती (Pregnant Rahanyasathi Upay In Marathi)

गरोदरपणात सुरक्षित प्रवास करण्यासाठी टिप्स

गरोदरपणातही तुम्ही सुरक्षित प्रवास करू शकता. फक्त त्यासाठी स्वतःची आणि बाळाची योग्य ती काळजी घ्यायचा कंटाळा करू नका.

हायड्रेट राहा 

प्रवास करताना बऱ्याचदा शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असते. कारण घर अथवा ऑफिसपेक्षा बाहेरील वातावरण अधिक उष्ण असू शकते. यासाठीच या काळात सतत हायड्रेट राहणं गरजेचं आहे. कारण गरोदरपणात डिहायड्रेट होणं बाळासाठी योग्य नाही. यासाठीच प्रवास करताना जवळ स्वच्छ पाण्याची बॉटल ठेवा आणि दर पंधरा मिनीटांनी थोडं थोडं पाणी पित राहा.

उपाशी मुळीच राहू नका

प्रवास करताना आपल्याला हवं तसे पदार्थ सगळीकडे मिळतातच असं नाही. त्यामुळे प्रवासादरम्यान बऱ्याचदा खाण्यापिण्याचे हाल होण्याची शक्यता असते. इतर लोकांसाठी हे नॉर्मल असू शकते पण तुम्ही जर गरोदर असाल तर तुम्हाला वेळेत आहार घेणं गरजेचं आहे. यासाठीच प्रवासाला जाण्यापूर्वी स्वतःसोबत फळं, सुकामेवा, ज्यूस असे पदार्थ असायला हवेत. ज्यामुळे तुम्ही खूप वेळ उपाशी नक्कीच राहणार नाही.

प्रेगनन्सीत विमान प्रवास करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

आरामात बसा 

गर्भावस्थेत स्त्रीच्या शरीरात रक्ताची निर्मिती वाढलेली असते. ज्यामुळे जस जसा बाळाचा विकास पोटात होऊ लागतो तस तसे तिच्या हातपायांना सूज दिसू लागते. प्रवासात जर तुम्ही एकाच ठिकाणी बराच काळ बसून राहिलात तर तुमच्या पायांची सूज वाढण्याची शक्यता असते. यासाठी जर तुम्ही स्वतःच्या गाडीतून प्रवास करत असाल तर थोड्या थोड्या वेळाने गाडीतून उतरून पाय मोकळे करा. त्याचप्रमाणे पाय एकाच दिशेने ठेवण्यापेक्षा शक्य असल्यास थोडं उंचावर ठेवा. ज्यामुळे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होईल.

गरोदरपणात छातीत दुखणे कारणे आणि घरगुती उपाय (Chest Pain During Pregnancy In Marathi)

डॉक्टरांचा सल्ला

जर तुम्ही प्रेगनन्सीमध्ये ऑफिससाठी नियमित प्रवास करत असाल तर तुम्हाला फार त्रास होणार नाही. पण जर अचानक तुम्हाला एखाद्या लॉंग ट्रिपवर जावं लागलं तर त्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण तुमची शारीरिक अवस्था कशी आहे, कोणती औषधे तुम्ही या काळात सोबत घ्यायला हवी. कसा प्रवास करायला हवा याबाबत ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात. 

प्रवासाचा काळ

गरोदरपणाच्या कोणत्या काळात तुम्ही किती वेळाचा प्रवास करत आहात ही गोष्टदेखील खूप महत्त्वाची आहे. कारण पहिली तिमाही, दुसरी तिमाही आणि तिसरी तिमाही असे गरोदरपणाचे तीन टप्पे असतात. यातील पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत प्रवास करणे शक्य टाळावे. मात्र दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच तीसऱ्या ते सहाव्या महिन्यापर्यंत तुम्ही एखादी लॉंग टूर नक्कीच करू शकता.

वैयक्तिक स्वच्छतेची योग्य काळजी

गरोदरपणात हायड्रेट राहण्यासाठी जर तुम्ही सतत पाणी पित असाल तर तुम्हाला वारंवार टॉयलेट जाण्याची गरज लागणार. अशा वेळी तुम्ही सार्वजनिक सौचालयात जाणार असाल तर सोबत पी सेफ, टीश्यू पेपर, सॅनिटायझर अशा गोष्टी जवळ ठेवा. कारण या काळात युरिन इनफेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगल्या ठिकाणी टॉयलेटसाठी जा आणि स्वतःची योग्य स्वच्छता राखा. 

Read More From आरोग्य