घर आनंदी राहणे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरात सकारात्मक उर्जा टिकवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. भांडण- तंटा कमी होऊन घरात सुख नांदावे यासाठी वास्तुशास्त्रकार ज्या गोष्टी सांगतात. त्या अगदी नित्यनेमाने फॉलो करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी करतात. प्रत्येक हिंदू घराची ओळख ही या दारात असलेल्या तुळशी वृंदावनाने होत असते. तुळशीची पाने छान हिरवीगार आणि भरलेली दिसली की घरात आनंद दिसतो. कधीकधी घरातील तुळशीमध्ये बदल होतो. म्हणजे तुळशीची पाने गळू लागतात. तुळस सुकू लागते. जर तुमच्या घरातील तुळशीमध्ये असा काही बदल होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण घरातील तुळस काही संकेत देत असते. तुळशीमध्ये होणारे बदल काय संकेत देतात ते जाणून घेऊया.
सुकलेली तुळस
सुकलेली तुळस ही घरासाठी अजिबात चांगली नाही. सुकलेली तुळस घरात ठेवणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. काही कारणास्तव तुमच्या घरातील तुळस सुकली असेल तर घरात काहीतरी भांडण-तंटे किंवा काहीतरी नकारात्मक उर्जा येण्याची शक्यता असते. तुळस सुकायला लागली असेल तर ती तातडीने काढून टाका. त्याजागी नवी तुळस घरात आणून लावा. असं म्हणतात घरची तुळस ही घरावर येणारे संकट आपल्यावर ओढून घेत असते. त्यामुळे तुळस सुकत असते. घऱातील तुळस काहीही न करता सुकत असतील तर लगेच काळजी घ्या.
घरातील तुळशीचं रोप नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
तुळस न टिकणे
काही जणांकडे काही केल्या तुळस टिकत नाहीत. कितीही नवी तुळस आणून लावली तरी देखील ती टिकत नाही. असे म्हणतात की अशा घरात आर्थिक स्थिरता नसते. ज्या ठिकाणी दारिद्र्य, अशांती आणि क्लेश असतो अशा ठिकाणी तुळस टिकत नाही. जर घरात खूप अस्वच्छता असेल तर आताच घराची स्वच्छता राखा. घरातील कलह मिटवून आनंदी आनंद आणण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातील तुळस टिकून राहील.
उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी आणि बघा चमत्कार
तुळशीची पाने गळणे
काही जणांच्या घरी तुळशीचा वाढ होत नाही आणि तुळशीची पाने गळत राहतात. पाने पिकणे म्हणजे घरात आजारपण येणे असे म्हणतात. घरातील एखादी व्यक्ती आजारी पडणार असेल तरी देखील तुळशीमध्ये बदल होऊ लागतो. तुळस ही हळुहळू पानगळती होऊन कोरडी होण्याकडे जाते. तुळशीची पाने अशी गळू लागली की आरोग्याकडे जातीने लक्ष द्यायला हवे. तुळशीला योग्य पाणी घालणे, उन देणे हे सगळे करावे.
तुळशीचे फायदे
तुळस ही एखाद्या वैद्यासारखी आहे. तुळशीमुळे अनेक वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. निरोगी जीवन आणि सुखी करण्यात तुळस फायदेशीर आहे.
- घरात जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तुळस ही फारच फायद्याची आहे.
- तुळशीची पाने चावून खाल्ल्यामुळे पोटाचे अनेक विकार बरे होण्यास मदत मिळते.
- तुळशीच्या पानांमुळे शरीराचा दाह कमी होतो. शिवाय त्यामुळे अनेक त्वचा विकारांपासूनही मुक्ती मिळते.
आता तुळस देत असेल असे संकेत तर अजिबात करु नका दुर्लक्ष
तुळशीच्या पानांनी खुलवा तुमचे सौदर्य, घरीच करा हा सोपा उपाय