लग्नसराई

‘तुझ्यात जीव रंगला’मधला ‘सनी दा’ ची हटके लव्हस्टोरी

Aaditi Datar  |  Dec 19, 2019
‘तुझ्यात जीव रंगला’मधला ‘सनी दा’ ची हटके लव्हस्टोरी

2019 च्या सेलिब्रिटी वेडिंग स्टोरीजमध्ये डिसेंबर महिन्यात अजून एक जोडी सामील झाली. ती म्हणजे राज आणि मनीषा म्हणजेच मौलीची जोडी. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतला ‘राणा दा’ चा मोठा भाऊ सूरज अर्थात ‘सन्नी दा’ म्हणजेच अभिनेता राज हंचनाळे अनेक तरूणींच्या ‘दिल की धडकन’ आहे. पण या मोस्ट एलिजिबल बॅचलरचं नुकतेच लग्न झालं. राजने त्याच्या 6 वर्षांपासूनची गर्लफ्रेंड मौली देसवालसोबत लग्न केलं. त्याची लव्हस्टोरी ही रिअल लाईफ 2 स्टेट्स स्टोरी आहे.

राजची रिअल लाईफ 2 स्टेट्स स्टोरी

राजची बायको मौली ही मूळची हरियाणाची आहे तर राज हा रांगडा गडी कोल्हापुरचा आहे. राज आणि मौलीची भेट  फिल्म इंडस्ट्रीत काम करताना मुंबईत झाली. 2013 साली ‘दुष्यंत प्रिया’ नाटकादरम्यान राज आणि मौलीची भेट झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सध्या मौली एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते. तर राज हा मराठी मालिकाविश्वातला प्रसिध्द चेहरा आहे.

डेस्टिनेशन रत्नागिरी

नुकतंच 6 डिसेंबरला राज आणि मौली यांचं रत्नागिरीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग झालं. पण या दोघांचंही रत्नागिरीशी काय नातं आहे आणि याच डेस्टिनेशनवर त्यांनी वेडिंग का केलं याबद्दल राज याने सांगितलं की, “माझी आणि मौलीची इच्छा होती की, आमचं समुद्राकिनारी लग्न व्हावं. मौलीच्या घरच्यांनाही समुद्रकिनारा पाहायची इच्छा होती. रत्नागिरीचा समुद्रकिनारा खुप सुंदर आहे. म्हणून तिथे आम्ही लग्न केलं. लग्न कोणत्या ठिकाणी व्हावं हे ठरवण्यापासून ते लग्नासाठी फुलं आणि हार आणण्यापर्यंत सर्व गोष्टी आम्ही स्वत: केल्या आहेत. त्यामुळे लग्नाच्या तयारीसाठी आम्हाला तीन ते चार महिने लागले.” या दोघांनीही मराठी आणि हरियाणवी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं. 

लग्नानंतर हनिमूनसाठीही नाही वेळ

लग्न झाल्यावरही राज लगेच आपल्या मालिकेच्या चित्रीकरणात गुंतला. हनिमूनला जायलाही त्याला वेळ मिळाला नाही. या विषयी राज म्हणाला की, “अगदी दोन दिवसाच्या सुट्टीत मी पटकन लग्न उरकलं. माझ्या मालिकेतल्या कलाकारांनाही मला बोलवता आलं नाही. त्यातच चित्रीकरणासाठी अगोदरच डेट दिल्या असल्याने येत्या तीन महिने तरी मला सुट्टी घेऊन हनिमूनला जाता येणार नाही. मार्च महिन्यातच आम्हाला आता हनिमूनला जाता येईल.”

POPxoMarathi कडून स्वीट कपल राज आणि मौली यांना खूप खूप शुभेच्छा.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

Read More From लग्नसराई