मनोरंजन

टीव्हीवरील या जोड्यांनी केले लपूनछपून लग्न, चाहत्यांना दिला धक्का

Dipali Naphade  |  Apr 19, 2020
टीव्हीवरील या जोड्यांनी केले लपूनछपून लग्न, चाहत्यांना दिला धक्का

टीव्हीवरील कलाकारांचेही अनेक चाहते असतात. बॉलीवूड अथवा हॉलीवूडमधील कलाकारांच्या चाहत्यावर्गापेक्षाही टीव्ही कलाकारांचा चाहता वर्ग अधिक असल्याचे दिसून येते. आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात नक्की काय चालू आहे याबाबत नेहमी चाहत्यांना जाणून घ्यायचे असते.  पण कलाकारांसाठी आपलं खासगी आयुष्य हे बऱ्याचदा खासगी राहावं असंच वाटत असतं. त्यामुळे टीव्हीवरील असे काही प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांनी लपूनछपून लग्न केले आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला. कोणताही गाजावाजा न करता केवळ आपले कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत टीव्ही कलाकारांनी लग्न केले होते. अशाच काही जोड्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

1. शक्ती अरोरा आणि नेहा सक्सेना

शक्ती अरोरा आणि नेहा सक्सेना हे दोन्ही कलाकार बालाजी टेलिफिल्म्समधून प्रेक्षकांसमोर आले. शक्ती अरोराचा फिमेल फॅन फॉलोईंग तर खूपच जास्त आहे. एका मालिकेच्या  सेटवर या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र कोणताही गाजावाजा न करता या दोघांनी 2018 मध्ये लग्न केले. अचानक नेहाने शेअर केलेल्या फोटोमुळे यांनी लग्न केल्याचेही समोर आले. या दोघांनी लग्नामध्ये  आपल्या कुटुंबाशिवाय कोणालाच बोलावले नव्हते. इतकंच नाही तर यांनी रिसेप्शनही ठेवले नव्हते. इतक्या खासगी पद्धतीने या दोघांनी लग्न करून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. 

2. कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह

कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाहची लव्ह स्टोरी तर तशी सगळ्यांनाच माहीत आहे. लग्नाआधी साधारण 9 वर्ष ही जोडी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. कश्मिरा ही कृष्णापेक्षा वयाने खूपच मोठी आहे. तरीही या दोघांमध्ये खूप प्रेम आहे आणि कृष्णा नेहमीच कश्मिराची काळजी घेतानाही दिसून येतो. आता या दोघांना जुळी मुलंही आहे. पण 2013 मध्ये लास वेगास मध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या या जोडीने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चर्चमध्ये जाऊन लग्नही केले. त्यानंतर 2015 मध्ये साधारण दोन वर्षांनी यांनी लग्न केले असल्याचे त्यांच्या चाहत्यांना कळले. 

सहा वर्षांच्या नात्यानंतर ‘पवित्र रिश्ता’फेम या जोडीचे झाले ब्रेकअप, चाहत्यांना धक्का

3. जय भानुशाली आणि माही विज

जय भानुशाली हे नाव टीव्ही जगतात अजिबात नवे नाही. जय हा बऱ्याच जणांचा  आवडता निवेदक आहे. जय आणि माही विज यांनीही लपूनछपून लग्न केले होते. एका जवळच्या मित्राच्या लग्नात जेव्हा माही मंगळसूत्र घालून पोहचली तेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला होता.  या दोघांनी 2011 मध्येच लग्न केलं होतं. मात्र त्याबद्दल त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींंनाही माहिती नव्हती. त्यावेळी लग्न होणं ही करिअरसाठी अडथळा होणारी गोष्ट ठरेल अशी समजूत असल्या कारणाने त्यांनी लग्न लपवून ठेवलं होतं. 

90 चं दशक गाजवलेल्या टीव्हीवरील अभिनेत्री

4. वत्सल सेठ आणि इशिता दत्ता

वत्सल शेठ आणि इशिता दत्ता हे दोघेही टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात काम करतात. या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे याचीदेखील कोणाला कल्पना नव्हती. अचानक लग्न करून या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला. कोणताही गाजावाजा न करता 2017 मध्ये जुहूमधील इस्कॉन मंदिरामध्ये या दोघांनी लग्न केले. या लग्नाला त्यांचे केवळ कुटुंबीय उपस्थित होते.  त्याशिवाय वत्सल शेठचा सर्वात जवळचा मित्र आणि मार्गदर्शक अजय देवगण आणि काजोल यांनाच केवळ याबाबत माहिती होती. 

ब्लाऊज पीसपासून कसे शिवायचे मास्क.. सांगतेय विद्या बालन

 

5. सौम्या टंडन आणि सौरभ देवेंद्र सिंह

‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्या टंडननेदेखील अचानक लग्नाची घोषणा करून तिच्या चाहत्यांना धक्का दिला होता. तिचे लग्न झाले आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. सौरभ देवेंद्र सिंह याच्यासह तिचे 10 वर्ष प्रेमसंबंध होते त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न  केले. आता सौम्या एका गोंंडस मुलाची आईदेखील आहे. लग्न झाल्यानंतरही सौम्याने काम करणे बंद केले नाही. सौरभने तिला तिच्या कामात कायम साथ दिली आहे. 

 

Read More From मनोरंजन