आरोग्य

एका महिन्यात दोन वेळा पाळी असेल येत, तर काय आहे कारण

Dipali Naphade  |  Mar 2, 2022
two-periods-in-one-month-reasons

मासिक पाळी येणं हे प्रत्येक महिलेसाठी डोकेदुखीचं आणि पोटदुखीचं कारण असतं. कितीही मासिक पाळी नको असली तरीही महिन्यात विशिष्ट तारखेरोजी जर पाळी आली नाही तर नक्कीच प्रत्येक महिलेला तणाव येतो. पण काही महिलांना जर महिन्यातून दोन वेळा पाळी येत असेल तर मात्र नक्कीच हे काळजीचं कारण आहे. 20 दिवसांनी मासिक पाळी येणे आजकाल अनेक महिलांमध्ये कॉमन झाले आहे. मासिक पाळीचा संबंध हा हार्मोन्सशी असतो आणि बऱ्याचदा यामुळे मासिक पाळीमध्ये त्रास होतो. कोणत्याही वेळी मासिक पाळी येणे अथवा महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येण्याची काही कारणे आहेत. याबाबत महत्त्वाची माहिती खास तुमच्यासाठी 

गर्भावस्था 

हे नक्कीच विरोधाभासी आहे. मात्र गर्भावस्थेदरम्यान असे घडू शकते. गर्भावस्थेदरम्यान आंतरिक रक्तस्राव होणे अत्यंत कॉमन आहे. अनेक महिलांना या समस्येला सामोरे जावे लागते. तुम्ही जर प्रजनन प्रक्रियेच्या वयात असाल आणि गर्भधारणेसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही अशावेळी डॉक्टरांकडून तपासून घ्यायला हवे. अशावेळी दोन वेळा मासिक पाळी येऊ शकते. 

पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम अथवा पीसीओएस 

तुम्हाला जर महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येत असेल तर तुम्हाला पीसीओएस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शरीरातील हार्मोनल असंतुलन होणे हे तुमच्या अनियमित पाळीचे कारण होते. त्यामुळे जर लागोपाठ दोन ते महिन्यात तुम्हाला अशी समस्या येत असेल तर पीसीओएसबाबत तुम्ही तपासून घ्या. 

थायरॉईड ग्रंथीने नीट काम न करणे 

थायरॉईड हार्मोन हे शरीरातील महत्त्वपूर्ण हार्मोन्सपैकी एक आहे. याचे असंतुलन एक महिन्यात दोन वेळा मासिक पाळी येण्यासाठी प्रवृत्त करते. त्यामुळे तुम्ही दरवर्षी थायरॉईड (Thyroid) तपासून घ्यायला हवे. थायरॉईडच्या ग्रंथीमुळे मासिक पाळी एका महिन्यातून दोन वेळा येण्याचा त्रास अनेक महिलांना सहन करावा लागतो. 

प्रीमेनोपॉज स्टेज 

एका ठराविक वयानंतर प्रत्येक महिलेला मेनोपॉज येतो. जसजसे मेनोपॉजचे वय जवळ येते तसे मासिक पाळीमध्ये अधिक समस्या उद्भवतात. कधी कधी 3-4 महिन्यात मासिक पाळी येत नाही आणि कधी कधी महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येते. तुम्ही जर रजोनिवृत्तीच्या जवळपास पोहचला असाल तर तुम्ही तपासणी करून घ्यायला हवी.  

ताण 

तुमच्यावर अधिक प्रमाणात तणाव असेल तर मासिक पाळीवर याचा अधिक प्रभाव पडतो. तणावाचा मुद्दा हा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण तणावामुळे मासिक पाळीवर अधिक जास्त परिणाम होतो. आयुष्यात सतत व्यस्त राहिल्याने आणि सतत चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे, तसंच दिवसभर सतत काम आणि अन्य गोष्टीमध्ये व्यस्त राहिल्याने तणाव वाढतो आणि याचा परिणाम महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येण्यावर होताना दिसतो. 

अधिक व्यायाम केल्यामुळे 

अधिक व्यायाम केल्यामुळे शरीराची हानीदेखील होऊ शकते हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम केल्यास, त्याचा परिणाम शरीरावर होतो. क्रॅश डाएटिंग आणि अधिक व्यायाम हे तुमच्या प्रजनन आरोग्याकरिताही हानिकारक ठरते. शरीराला व्यायाम केल्यानंतर योग्य आराम देणे गरजेचे आहे. पण याचा थेट परिणाम महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येण्यावरही होतो हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. तर यामुळे कधी कधी रक्तस्राव होतही नाही. पण याबाबती महिलांनी योग्यवेळी आपल्या स्त्री रोगतज्ज्ञांकडून सल्ला घ्यायला हवा.  

सततचा प्रवास 

तुम्ही सतत प्रवास करत असाल तर तुमची ट्रॅव्हल हिस्ट्री तुम्हाला माहीत असते. सतत प्रवासातील वेगवेगळे ऋतू, पर्यावरण, पाणी, खाण्यापिण्यातील बदल यामुळेही हार्मोन्समध्ये बदल होत असतात आणि याचा थेट परिणाम महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येण्यावर होत असतो. त्यामुळे तुम्ही याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य