नथ हा असा दागिना आहे जो कोणत्याही कपड्यांची शोभा वाढवतो. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात नथ हा दागिना महिलेकडे असतो. सोन्यात घडवलेला हा दागिना सौंदर्यात भर घालणारा असा आहे. पूर्वी नथीचा एकच प्रकार दिसायचा. एक मोठी मोत्यामध्ये घडवलेली नथ असायची पण आता वेगवेगळ्या आकाराच्या नथी मिळतात. ज्या तुम्ही नक्की ट्राय करायला हव्यात. सोन्यातच नाही तर चांदी आणि खोट्या प्रकारतही अशा नथी मिळतात. ज्या तुम्हाला कोणत्याही अटायरवर वापरता येतात. जाणून घेऊया नथीचे असेच काही प्रकार आणि त्यांचे वैशिष्ट्ये
सोन्याच्या दागिन्यांना द्या गेरु फिनिंशिंग
मासोळी नथ
माशाच्या आकारासारखी असणाऱ्या या नथीला मासोळी नथ असे म्हणतात. या नथीचा आकार गोलाकार झालेल्या माशाच्या असतो. यामध्ये धातू जास्त दिसतो. तर मोती किंवा खडे फारच कमी असतात. बाजारात बेटेंक्स किंवा ऑक्सिडाईज अशा प्रकारामध्ये या नथी मिळतात. ज्यामध्ये तुम्हाला खडे दिसतील. गुलाबी, हिरव्या रंगाच्या खड्यांची यामध्ये गुंफण केलेली असते. या नथ नाकाला गोल बसतात. त्यामुळे त्या फारच सुंदर दिसतात.
कोल्हापुरी नथ
कोल्हापुरी नथ ही महाराष्ट्रातील प्रचलित अशा नथीच्या प्रकारापैकी एक आहे.अर्धगोल मोत्यांची गुंफण करुन या दागिना घडवला जातो. यामध्ये मोतीच्या दोन सरी किंवा एक सर असते नथीच्या वरच्या भागावर मोर किंवा एखादा खडा असतो. कोल्हापुरी अशी ही नथ नथडा म्हणून ओळखली जाते.
मोरणी नथ
मोरणी नथ ही देखील हल्लीच्या काळात खूपच प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये छान बाकदार मोर असतो. या मोराचा आकार लहान मोठा असतो. त्यानुसार या नथीचा आकार ठरत असतो. जर तुम्ही मोर नथ कधी पाहिली असेल तर तुम्हाला यावर केलेला बारीक काम नक्की आवडेल. जास्तीत जास्त या नथीमध्ये धातू असतो. त्यामध्ये गुलाबी रंगाचे किंवा अमेरिकन डायमंड बसवलेले असतात. त्यामुळे ही नथ खूप भरगच्चच आणि सुंदर दिसते.
मराठा नथ
नथीचा हा प्रकारही खूप जणांना माहीत असेल. मराठा नथ ही फारच प्रसिद्ध अशी नथ आहे. पूर्वी मराठा नथ ही खूप जड असायची पण आता अशी नथ दिसत नाही. आता या नथी फारच हलक्या झालेल्या आहेत. मराठा नथीचे वैशिष्ट्य असे की,या नथीमध्ये एक गोलाकार बाक असतो. त्यावर मोती असतात. नथीच्या वरच्या आणि ओठांकडील बाजूला मोती पासून बनवलेली फुलं असतात किंवा काही वेगळ्या डिझाईन्स बनवलेल्या असतात.
लहरिया साडीचा ट्रेंड, कशी कराल कॅरी
काशीबाई नथ
राणी काशीबाई यांच्या नावाने प्रसिद्ध असलेली ही नथ आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत असेल. काशीबाई नथ ही दिसायला भरगच्च दिसते. या नथीला मोत्याचे आणि खड्यांचे कोंदण केलेले असते. बाजीराव मस्तानी चित्रपटानंतर ही नथ मोठ्या प्रमाणात सगळीकडे मिळू लागली आहे.
आता नथींचे हे काही प्रकार आणि या शिवाय मिळणारे ब्राम्हणी नथ, वऱ्हाडी नथ,सरजाची नथ, येसूबाई नथ अशा काही नथी नक्की ट्राय करा.
Read More From Jewellery
पायांत चांदीचे पैंजण घालणे ही केवळ जुनी परंपरा नव्हे, त्यामागे आहे वैज्ञानिक कारण
Vaidehi Raje