बिग बॉस फेम उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. पण कॅश्मिरा शहासोबतचा वाद ओढवून घेत तिने अनेक गोष्टींना आमंत्रण दिले आहे. कॅश्मिरा ती फक्त एअरपोर्टवर जाते. विमानात बसते तरी का? असा टोला लगावला होता. पण आता कॅश्मिरा खरंच बोलली होती की काय? असे अनेकांना वाटू लागले आहे. नुकताच उर्फीचा एक एअरपोर्ट व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओमध्ये तिची बॅग पाहता ती हा फक्त देखावा करतेय असा विश्वास सगळ्यांना बसू लागला आहे. जाणून घेऊया उर्फी हे नक्की करतेय तरी काय?
करते का कांगावा
पापाराझींचे सेलिब्सवर बारीक लक्ष असते. विमानतळावर ते सगळ्यात जास्त सतर्क असतात. कारण अशा ठिकाणी सेलिब्सची एअरपोर्ट स्टाईल जी त्यांना क्लिक करता येते. अनेक सेलिब्रिटींचे आपण एअरपोर्ट लुक पाहिले असतीलच. पण आता त्यामध्ये भऱ पडणार आहे उर्फीची. कारण सुपरस्टारहून अधिक काळासाठी ती एअरपोर्टवर दिसते. ती कुठून कुठे प्रवास करते हे कधीही कोणाला कळलेले नाही. तिच्या पोस्ट पाहिल्यानंतर ती कुठे जात असेल असे देखील दिसत नाही. पण ती करत असलेली फॅशन तिला सगळ्यात जास्त इथे दाखवता येईल हे तिला माहीत असल्यामुळेच ती येथे जास्त काळ एअरपोर्टच्या बाहेरच दिसते. पण एअरपोर्टच्या आत जाते. याचा पुरावा तिने एका फोटोतून पोस्ट केला आहे. केसांना साडी पीनचा उपयोग करुन तिने जी हेअरस्टाईल केली होती. त्याचे फोटो तिने एअरपोर्टवर पोस्ट केलेले दिसत आहेत. त्यामुळे आता ती सगळ्या वेळी नाटकं करते असं म्हणता येणार नाही.
पण तरीही प्रेक्षकांना प्रश्न
एखादी व्यक्ती आठवड्यातून दोन ते तीन वेळा दिसली की, तिचे काम आहे असे समजू शकते. पण उर्फी काही वेगळी आणि विचित्र फॅशन करते त्यावेळी ती अगदी हमखास एअरपोर्टवर असते. तिचा लुक पाहून ती कुठेही गेली असावी असे देखील दिसत नाही. ती अगदी व्यवस्थित मेकअप करुन खास या फोटोसाठी आली हे देखील दिसून येते. त्यामुळे आता कोणती गोष्ट खरी हे कळणे थोडे कठीण आहे. त्यामुळेच तिला पाहणाऱ्या सगळ्यांना कॅश्मिराला पडलेला तोच प्रश्न पडणे साहजिक आहे.
फॅशनवरुन होते ट्रोल
उर्फी तिच्या कामासाठी कधी प्रशंसा मिळवते असे नाही. तर तिला कायमच ट्रोलला सामोरे जावे लागते. तिची फॅशन फारच विचित्र आणि चुकीचे अंग प्रदर्शन करणारी असते. कधी, कुठे काय घालावे याचे भान तिला नसल्यामुळे ती ट्रोल होते. ब्रा, पँटी किंवा अगदी नावाला अंग झाकणारे कपडे असल्यामुळे तिच्याबद्दल बरेच काही लिहिले जाते. जे तिला अजिबात आवडत नाही. मीडियाने लिहिलेल्या स्टोरीज तिला आवडत नाही. पण फोटोसाठी अशांची मदत घेते. अशा पद्धतीने वागल्यामुळे ती कायम चर्चेत असते.
आता तिचे एअरपोर्टवरील जाणे हे केवळ पॅपसाठी आहे की,ती फिरायला जाे. हे फक्त उर्फीच सांगू शकते.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade