DIY लाईफ हॅक्स

खराब झालेली कॉफी फेकू नका तर असा करा उपयोग

Leenal Gawade  |  Jul 19, 2020
खराब झालेली कॉफी फेकू नका तर असा करा उपयोग

कॉफी ही अशी गोष्ट आहे जिची योग्य निगा राखली गेली नाही की, ती लगेच खराब होते. अनेकदा अनावधानाने कॉफीमध्ये ओला चमचा किंवा पाण्याचा अंश जाऊन पडतो किंवा कॉफी दमट जागी ठेवल्यामुळे ती घट्ट होते, त्याला बुरशी येते. अशावेळी कॉफी फेकून देण्यापेक्षा त्याचा उपयोग तुम्ही त्याचा उपयोग थोडा वेगळ्या पद्धतीने करु शकता. कारण कॉफी मुळीच स्वस्त नाही त्यामुळे ती तशीच टाकून देणे आपल्याला आवडत नाही. चला पाहुया या खराब झालेल्या कॉफीचा नेमका कसा उपयोग आपल्याला करता येईल ते.

ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय

कॉफी लिक्वीड

कॉफीमध्ये ओला चमचा चुकून गेला तर कॉफी चांगलीच टणक होते. ही कॉफी खराबही झालेली नसते. पण ती अगदी सहज काढता येत नाही. त्यामुळे ती प्यायची कशी हे कधीच कळत नाही. अशी कॉफी तुम्हाला सहज वापरायची असेल तर त्यासाठी एक सोपी आयडिया म्हणजे तुम्ही त्या कॉफीचे छान कॉफी लिक्वीड करुन ठेवा. हे लिक्वीड करुन ठेवणेही फार सोपे असते. एका भांड्यात पाणी गरम करुन तुम्ही ते गरम पाणी कॉफीच्या भांड्यात ओता. आता जे पाणी म्हणजे कॉफी लिक्वीड तयार होईल ते तुम्ही एका बॉटलमध्ये भरुन स्टोअर करुन ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला कॉफी करायची असेल तेव्हा तुम्ही त्यामध्येच दूध साखर घालू शकता. कोल्ड किंवा कॅपिचिनो बनवू शकता. यामुळे तुमचे कामही सोपे होते.

उरलेल्या चहाच्या चोथ्याचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकीत

कॉफी स्क्रब

Instagram

आता तुम्ही स्टोअर केलेल्या कॉफीला अगदीच बुरशी आली असेल आणि प्यावी अशी तुमची इच्छा नसेल तरी देखील तुम्ही ती कॉफी फेकू नका. त्याचा उपयोग एक उत्तम स्किन केअर म्हणून तुम्हाला करता येऊ शकतो. आता तुम्हाला स्क्रब तयार करायचे असेल तर तुम्ही कॉफी घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस, थोडी साखर घाला. हा स्क्रब एका प्लास्टिक कंटेनरममध्ये भरुन ठेवा. कॉफी स्क्रबचे अनेक फायदे आहेत.तुम्ही आठवड्यातून एकदा या स्क्रबचा उपयोग करु शकता. विकतचे कॉफी स्क्रब फारच महाग असते. तुम्हाला घरच्या घरी आणि उत्तम कॉफी स्क्रब घरीच करता येऊ शकते. 

झाडांसाठी उत्तम माती

Instagram

कॉफी स्क्रब, कॉफी लिक्वीड यसोबतच याचे अजूनही काही फायदे आहेत. कॉफी फेकण्याची अगदीच वेळ आली असेल तर तुम्ही त्याचा उपयोग झाडांसाठी करु शकता. झाडांसाठी ऑरगॅनिक माती किंवा हलकी फुल्की माती म्हणून तुम्ही याचा उपयोग करु शकता. कॉफी आणि माती मिक्स करुनही तुम्ही त्याचा वापर करु शकता. नारळाची किस ज्याप्रमाणे झाडांच्या वाढीसाठी चांगली असते. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला कॉफीचा वापर करता येऊ शकतो. तुमच्याकडे ग्राऊंडेट कॉफी असेल तर फारच उत्तम कारण ती थोडी जाड असते. त्यामुळे ती वापरणेही फार सोपे असते. 

आता कॉफी खराब झाली असेल तर ती मुळीच टाकून देऊ नका तर तुम्ही त्याचा अशापद्धतीने उपयोग करा. तुम्हला नक्कीच फायदा होईल.

लग्नासाठी वेस्टर्नचा पर्याय निवडला असेल तर या गोष्टी असू द्या लक्षात

Read More From DIY लाईफ हॅक्स