आपल्या शरीराला हात लावल्यानंतर ते आपल्याला कोमट लागते. शरीरात वाहणाऱ्या रक्तामुळे आपले शरीर कोमट असते. शरीरातील उष्णता जास्त वाढली किंवा अंग जास्त तापले की आपण ताप आला असे म्हणतो. थंडीमध्ये शरीर हे थंड लागते. पण बाहेरील वातावरणाचा थंड गरम असा परिणाम होत असला तरी देखील शरीरातील उष्णता वाढणे हे त्यामागे एक कारण असते. तुमच्या शरीराचे कार्य नियमित नसेल शरीरावर पुरळ येत असेल, नाकाचा घोणा फुटत असेल तर तुम्हाला शरीरातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय (Ushnata Kami Karnyache Upay) जाणून घ्यायला हवेत. शरीराच्या आतल्या भागात उष्णता वाढली असेल तर त्याचा परिणाम शरीरावर होऊ लागतो. तो त्रास टाळण्यासाठी हे उपाय करायला हवेत.
Table of Contents
शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे (Symptoms Of Heat In The Body)
शरीरात उष्णता वाढली असेल तर तुम्हाला तुमच्या शरीरात नक्कीच काही फरक जाणवू लागतो. शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे पुढीलप्रमाणे
पुरळ
शरीरात उष्णता वाढली असेल तर तुम्हाला पुरळ येण्याचा त्रास अगदी हमखास होऊ शकतो. पोट साफ असूनसुद्धा जर तुमच्या त्वचेवर मोठे मोठे फोड येत असतील आणि ते दुखत असतील तर ते उष्णतेचे फोड आहेत ते समजावे. कधी कध चेहऱ्यावर बारीक बारीक पुरळ देखील येतात. त्यामुळेही तुमच्या शरीरात उष्णता वाढली हे समजून जावे.
खाज
शरीरात उष्णता वाढलेली असेल तर त्वचेवरील मॉईश्चर कमी होते. त्यामुळे त्वचेला प्रचंड खाज येऊ लागते. शरीरात वाढलेली उष्णता खाज आल्यामुळे हे संकेत देते. काहीही कारण नसताना तुम्हाला शरीराला सतत खाज येत असेल तर तुम्ही योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे असते.
डोक्यात कोंडा होणे
ज्याप्रमाणे शरीराला खाज येते. त्याचप्रमाणे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे डोक्यात कोंडा होण्याची शक्यता असते. कोणतेही कारण नसताना तुम्हाला अचानक कोंड्याचा त्रास होऊ लागला असेल तर हे देखील एक कारण असू शकते. डोक्यात कोंडा सतत होत असेल तर तुम्ही तुमच्या शरीरात उष्णता वाढू लागली आहे असे समजावे.
नाकाचा घोणा फुटणे
उष्णता वाढल्यामुळे तुमच्या नाकाचा घोणा देखील फुटू शकतो.नाकाचा घोणा अचानक फुटत असेल तर तुमच्या शरीरातील उष्णता वाढली आहे असे समजावे. काही जणांच्या नाकाचा घोणा वरचेवर फुटत असतो. असा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे असते.
ॲसिडिटी वाढणे
पचनाची क्रिया मंदावली की, आपल्याला ॲसिडीटीचा त्रास होऊ लागतो. तुम्हाला सतत वरचेवर ॲसिडिटी होत असेल आणि त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडत असेल तर तुमच्या आहारासोबतच तुमच्या शरीरात वाढलेली उष्णता कमी करणे गरजेचे असते.
शरीरातील उष्णता कमी करण्याचे उपाय (Ushnata Kami Karnyache Upay)
शरीरात उष्णता वाढली असेल तर त्यासाठी तुम्ही सोपे असे उपाय करु शकता. त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळेल. जाणून घेऊया Ushnata Kami Karnyache Upay
सब्जा
सब्जा हा थंड असतो. त्यामुळे त्याचा आहारात समावेश केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला लघवीच्या जागी जळजळ किंवा लाल झाल्यासारखे वाटत असेल किंवा शरीरात वाढलेल्या उष्म्यामुळे पुरळ, सूज आलेली वाटत असेल अशावेळी तुम्ही एका ग्लासात सब्जा भिजत घाला. सब्जा चांगला भिजला की, ते पाणी पिऊन टाका. सब्जा पोटात गेल्यामुळे पोटात थंडावा निर्माण होतो. सब्जा खाण्याचे फायदे अनेक आहेत. त्यामुळे तुम्ही इतरवेळीही सब्जाचे सेवन करायला हवे
नारळपाणी
शरीरातील उष्णता कमी करुन शरीराला थंडावा देणारे आणखी एक पेय म्हणजे नारळाचे पाणी. नारळाचे पाणी हे चवीला गोड असते आणि थंड असते. ते पाहिल्यानंतर शरीराला एक वेगळाच थंडावा मिळतो. तुम्हाला लघवीला अडचण होत असेल, शरीरावर पुरळ आले असतील तर ते कमी करण्यास आणि शरीर थंड करण्यास नारळपाणी मदत करते. नारळ पाणी पिण्याचे फायदे इतके आहेत की तुम्ही नक्कीच नारळपाणी प्यायला हवे.
प्राणायाम
सुदृढ शरीरासाठी प्राणायाम हा खूपच फायद्याचा आहे. जर तुम्ही प्राणायाम केला तर तुमच्या शरीराला एक शांती मिळते. प्राणायामचे काही प्रकार पोटाचे आरोग्य, मेंदूचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे प्राणायामाचे फायदे लक्षात घेत तुम्ही नक्कीच त्याचा फायदा करुन घ्यायला हवा.
आहारात बदल
खूप जणांच्या आहारात सतत उष्णता वाढवणारे पदार्थ असतात. यामध्ये चिकन, मटण, मासे,अंडी याचा समावेश असतो. जर तुमचे असे खाणे सतत होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात बदल करायला हवा. त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होईल. आहारात पालेभाज्या, दही असे पदार्थ आणा तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
लिंबूपाणी
लिंबाचे पाणी हे देखील शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कमीत कमी साखर घालून लिंबू पाणी प्या. लिंबाचे पाणी प्यायल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन C मिळते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. तुम्हाला आराम मिळतो.
पाण्याचे सेवन
पाण्याचे सेवन हे शरीरासाठी आवश्यक असते. शरीराची उष्णता कमी करायची असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवेत. पाण्याचे सेवन तुम्ही केले तर तुम्हाला शरीरातील उष्णता शरीराबाहेर टाकण्यास मदत मिळेल. पाणी प्यायल्यामुळे त्वचा आणि पोटाचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत मिळेल.
कोरफड
जर तुम्हाला शरीराची जळजळ होत असेल तर तुम्ही नक्कीच कोरफडीचे सेवन देखील करु शकते. कोरफडीचा गपर हल्ली बाजारात मिळतो. हा गर तुम्ही पाण्यात घेऊन पिवू शकता. कोरफडीचा गर प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.
कपड्यांची निवड
कपड्यांची निवड ही देखील उष्णता कमी करण्यासाठी गरजेची असते. वातावरणात उष्णता वाढलेली असेल तर तुम्हाला सुती कपेड घालायला हवे. सुती कपडे घातल्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळतो. तुमचे प्रायव्हेट पार्ट हेे मोकळे राहिले तर नक्कीच तुम्हाला तुमच्यामध्ये बदल झालेला दिसेल.
ताक
दही मोडून बनवले जाणारे ताक हे देखील शरीराला थंडावा देण्याचे काम करते. त्यामुळे तुम्ही दररोज ताकाचे सेवन करायला हवे. ताकात थोडे मीठ घालून तुम्ही ते प्या. उष्णतेमुळे होणाऱ्या समस्या तुम्हाला अजिबात होणार नाही. तुम्ही जेवणानंतर ताक प्यायलात तर अन्न पचायलाही मदत होते आणि शरीराचा दाह ही कमी होण्यास मदत मिळते.
कलिंगड
कलिंगड हे पाण्याने भरलेले असे फळ आहे. या फळाच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक असलेले पाणी मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही सीझनमध्ये कलिंगड हे फळ खायला हवे. कलिंगड खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यापासून ते शरीरातील उष्णता कमी करण्यासही मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला जर उष्णतेचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच फळ खायला हवे.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
1. शरीरातील उष्णता हवामानानुसार वाढते का?
हो, हवामानानुसार शरीरातील उष्णता ही कमी जास्त होत असते. पावसाळा आणि हिवाळ्यात वातावरणातील थंडावा आलेला असतो. त्यामुळे अशावेळी शरीरात उष्णता वाढली तरी देखील चालू शकते. पण उन्हाळा किंवा वातावरणात हिट वाढली की, मात्र तुम्ही काय खाता? किती खासा? यावरुन तुमच्या शरीरात उष्णता वाढू लागते. त्यामुळे शरीरातील उष्णता हवामानानुसार कमी-जास्त होऊ शकते.
2. शरीरावर पुरळ येणे हे उष्णता वाढण्याचे लक्षण आहे का?
हो, अनेकांच्या शरीरात उष्णता वाढली की, ती शरीराबाहेर येताना अनेक लक्षणे जाणवू लागतात. पुरळ येणे हे उष्णता वाढण्याचे अगदी सर्वसामान्य असे लक्षण आहे. तुमच्या त्वचेवर पुरळ येऊ लागले असतील तर त्यामागे तुमचे उष्णता असलेले पदार्थ खाणे तर नाही ना हे देखील तपासून पाहणे गरजेचे असते.
3. शरीरातील उष्णता किती दिवसांनी कमी होते?
शरीरात वाढलेली उष्णता किती दिवसांनी कमी होईल याचा निश्चित कालावधी सांगता येत नाही. पण काही पदार्थ आहारात आले की, तुम्हाला लगेचच त्याचा फायदा होतो.
Read More From xSEO
Sankashti Chaturthi Wishes, Quotes, Status In Marathi | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Dipali Naphade
अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती | Ashtavinayak Darshan Information In Marathi
Vaidehi Raje