घर आणि बगीचा

Vaastu Tips : घरात कोणती झाडे लावावी आणि त्यांची लागवड

Aaditi Datar  |  May 30, 2019
Vaastu Tips : घरात कोणती झाडे लावावी आणि त्यांची लागवड

प्रत्येकाला आपल्या घरी छान दिसणारी आणि थंडावा देणाऱ्या रोपट्यांची (Plants) आणि झाडांची लागवड करावीशी वाटते. ज्यामुळे आपल्या घरातील (Home) वातावरणही ताजंतवान आणि स्वच्छ हवायुक्त राहतं. पण तुम्हाला माहीत आहे का, रोपं आणि झाडं ही फक्त आपल्याला शुद्ध हवा आणि ऑक्सीजनचं देत नाहीत तर घरातील वास्तूदोषही दूर करतात. काही रोपं-झाडं लावल्यास तुमच्या घरात सुख-समृद्धीही येईल. जर तुमचा वास्तूशास्त्रावर विश्वास असेल आणि तुम्हाला बागकामाची आवड असेल तर तुम्ही वास्तूशास्त्रानुसारही (Vaastu Tips) घरांमध्ये रोपांची आणि झाडांची लागवड करू शकता.  

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या रोपांची आणि झाडांची लागवड कोणत्या दिशेने करावी. 

उत्तर-पूर्व बाल्कनी

जास्तकरून लोकांच्या घरी टॅरेस किंवा बाल्कनीतच रोपट्यांची लागवड करून छोटंस गार्डन बनवतात. ज्यामुळे तिकडे बसल्यावर त्यांना थंड आणि हिरवगार वाटेल. पण लक्षात ठेवा की, बाल्कनी किंवा गार्डन उत्तर-पूर्व आणि पूर्व दिशेला असल्यास नेहमी छोटी रोपं जसं तुळस, झेंडू, लिली, आवळा, पुदीना, आणि हळद यांची लागवड करावी. या दिशेला उगवणाऱ्या रोपांसोबत सूर्याची आरोग्यदायक किरण घरात प्रवेश करतात. यामुळे कुटुंबातील सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहत आणि नातीही सुधारतात. 

तुळशीचं रोप

वास्तूशास्त्रात तुळशीच्या रोपट्याला फारच महत्त्व आहे. अद्भूत औषधीय गुण असलेलं तुळशीचं रोप लावल्याने घरातील नकारात्मक उर्जेचा नाश होतो आणि सकारात्मक उर्जा प्रवेश करते. ज्यामुळे घर आणि घरातील सदस्यांमधील नाती दृढ होतात आणि आसपासच्या वातावरणाचीही शुद्धी होते.  

उत्तर दिशेला निळ्या फुलाची रोपं

वास्तूशास्त्रानुसार, उत्तर दिशेला नेहमी निळ्या रंगाच्या फुलांची रोपं लावावी. कारण यामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी कायम राहील. तसंच पैशांची कमतरताही दूर होईल. दुसरी गोष्ट म्हणजे निळ्या रंगाच्या फुलांच्या रोपांमुळे व्यक्तीच्या आयुष्यात स्थिरता आणि पवित्रता येते.

वाचा – घरात लावण्यासाठी उपयुक्त झाडे आणि सोप्या टिप्स

पश्चिम दिशेसाठी  

तुमचा छान टुमदार बंगला असल्यास किंवा फार्म हाऊस असल्यास उंच झाड किंवा लांब वाढणारी झाड नेहमी घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावी. वास्तूसिद्धांतानुसार, सकारात्मक ऊर्जेच्या लहरी पूर्वकडून पश्चिमेला, उत्तरेकडून दक्षिणेला आणि पूर्वोत्तरकडून दक्षिण-पश्चिम दिशेकडे जातात. लक्षात ठेवा की, उत्तर आणि पूर्वेला कमी दाटीची आणि छोटी रोपं लावावी. म्हणजे घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह येत राहील.

पश्चिम दिशेला लावा पिंपळ

जर तुम्हाला पिंपळाचं झाड लावायचं असल्यास घरापासून थोड्या लांब ठिकाणी लावा आणि तेही पश्चिम दिशेकडे. तर पांढऱ्या रंगाची रोपं जशी मोगरा, चमेली इत्यादी रोपं या दिशेने लावल्यास तुम्हाला नक्कीच लाभ होईल आणि यश मिळण्याच्या संधीही वाढतात. एवढंच नाहीतर मुलांच्या विकासातही गती येते.

सुख-सौभाग्यासाठी दक्षिण-पूर्व

लोकांचा असा विश्वास आहे की, डाळिंब झाड लावू नये. पण जर तुम्हाला डाळिंबाच झाडं लावायचं असल्यास तुम्ही दक्षिण-पूर्व दिशेला लावू शकता. यामुळे घरात सुख-सौभाग्याची वृद्धी होईल आणि अडकलेली कामही पूर्ण होतील.

                                                                              वाचा –  जाणून घ्या कसं असावं देवघर

ऐश्वर्यासाठी लाल रंगाचं फूल

जर तुम्हाला सुख-समृद्धी हवी असल्यास तुम्ही घरात लाल रंगाच्या फुलांच्या रोपट्यांची लागवड नक्की करा. पण लक्षात ठेवा की, ही रोपं नेहमी दक्षिण दिशेला लावावी. तुमच्या जीवनात उर्जा आणि उमेद भरण्याचं काम ही रोपं आणि फूल नक्कीच करतील.

धनलाभासाठी   

जर तुमच्या घरात पैशांची चणचण असेल तर तुम्ही घरात बांबू आणि ब्रम्हकमळाची लागवड करू शकता. कारणही झाड लावल्यावर तुमच्या घरावर नक्कीच लक्ष्मीची कृपा होईल. फेंगशुईमध्ये बांबूच्या झाडाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. तर अनेकांकडे ब्रम्हकमळाची फुलं उगवल्यावर भरभराट झाल्याचं दिसून येतं. तसंही ब्रम्हकमळांच्या फुलांचा वास खूपच अप्रतिम असतो.

सकारात्मक उर्जेसाठी

घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहावा असं तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही अशोकाचं झाड किंवा बांबूचा झाड लावू शकता. या झाडांची लागवड केल्यास उर्जेचा संचार, यश आणि सुख-समृद्धीसारखा लाभ होईल.

आरोग्य आणि समृद्धी दोन्हींचा लाभ

अँटी-बॅक्टेरियल गुणयुक्त कडुनिंब हे आरोग्यदायी आणि सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे. तसंच हे झाड वास्तूसाठीही शुभ मानलं जातं. कडुनिंबाचं झाड उत्तर-पश्चिम दिशेला लावावं. कारण हे तुमच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी फायदेशीर आहे.

मग तुम्हीही करून पाहा या झाडांची लागवड आणि वास्तूसाठी फायदेशीर बदलही अनुभवा.

हेही वाचा –

बेडरूमसाठी फॉलो करा या वास्तू टीप्स 

वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका

घरावर लक्ष्मीकृपा व्हावी म्हणून फॉलो करा या वास्तू टीप्स

Read More From घर आणि बगीचा