2019 च्या शेवटच्या टप्प्यावर आपण सगळेच पोचलो आहोत. या वर्षी अनेक जणांनी काही चांगले काही वाईट क्षण अनुभवले असतील. काही जणांना हे वर्ष खूप चांगलं गेलं असेल तर काहीजणांसाठी ओकेओके. त्यामुळे येणारं नवीन वर्ष तरी चांगलं जावं, अशी तुमची नक्कीच इच्छा असेल. 2020 या वर्षांकडून तुमच्याही खूप अपेक्षा असतील. या अपेक्षा पूर्ण करण्यात तुमच्या मदतीला येतील त्या वास्तू टिप्स. आम्ही तुम्हाला अशाच काही वास्तू टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला सकारात्मकरित्या मदत करतील.
घरातल्या कानाकोपऱ्यांची साफसफाई
न्यू ईयरच्या तयारीसाठी सर्वात आधी आपल्या घराची संपूर्णपणे सफाई करून घ्या. घरातल्या भिंतीना पडलेल्या भेगा, कोपऱ्यातील जळमटं, खिडक्यांच्या तुटलेल्या काचा नीट करून घ्या. कारण असं मानलं जातं की, यामुळे घरात नकारात्मकता येते. या गोष्टींमुळे तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. खासकरून जळमटांकडे जास्त लक्ष द्या. जळमटं तुमच्या घरातील सुंदरता तर खराब करतातच आणि अशुभ संकेत देतात. कोळ्याने केलेल्या जळमटांमुळे घरात तणाव कायम राहतो. कुटुंबात भांडणं होतात आणि पैशांशी निगडीत समस्याही निर्माण होतात.
भिंतीला रंगरंगोटी
जर तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने घराला रंग दिला असेल तर हेच तुम्ही नव्या वर्षाच्या निमित्तानेही करू शकता. घराला रंग देताना कधीही हलक्या आणि ब्राईट रंगांनी घर पेंट करून घ्या. येणारा काळ नक्कीच तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल.
घरांचं मुख्य द्वार
झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं यांचं तोरण बनवा. हे तोरण मुख्य दरवाज्याला लावा. असं म्हटलं जातं की, यामुळे घरात नकारात्मकता येत नाही आणि घरात सकारात्मक वातावरण कायम राहतं.
या गोष्टींना दाखवा बाहेरचा रस्ता
नवीन वर्ष येण्याआधी घरातील तुटलेल्या वस्तू बाहेर फेकून द्या. जसं तुटलेला आरसा, भांडी, तुटलेल्या फ्रेम्स, बंद पडलेली घड्याळं, खराब आणि तुटलेला झाडू या गोष्टी घराबाहेर काढा. कारण यामुळे घरात समृद्धी येत नाही. तसंच घरात कधीही खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूही ठेवू नयेत. महिलांना जास्तकरून वस्तू खराब किंवा बंद पडल्यावरही त्या घरात तश्याच ठेवण्याची सवय असते. पण त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते. त्यामुळे नववर्षाच्या आगमानाआधी घरातील तुटलेली भांडी आणि क्रॉकरीही घराबाहेर टाका.
हेही वाचा – घरावर लक्ष्मीकृपा व्हावी म्हणून फॉलो करा या वास्तू टीप्स
गार्डन ठेवा हिरवंगार
घरामध्ये जर छोटसं गार्डन बनवलं असेल तर त्याची योग्य देखभाल करा. कुंड्यांना वेळेवर पाणी घाला आणि सुकी पानं काढून टाका.
ही झाडं लावा
आपल्या घरात तुळस, गुलाब, लिली, ऑर्किड, मनी प्लाँट, कॅक्टस, जास्मीन, रोजमेरीसारखी लकी झाडं लावा. वास्तूनुसार ही झाडं शुभ मानली जातात. या झाडांमुळे घरात खुशाली येते आणि घरातील पैश्यांची तंगी दूर होते.
मग या वास्तू टिप्स तुम्हीही फॉलो करा आणि नवीन वर्षात मालामाल व्हा.
यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स
सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
वास्तू टीप्स: चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान
वास्तुशास्त्रानुसार सुख-समृद्धीसाठी घरात असावेत हे पाळीव प्राणी