जे श्रद्धेने केले जाते अशा विधीला श्राद्ध असे म्हणतात. आपल्यापासून दुरावलेल्या व्यक्ती, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पितरांविषयी आदर बाळगण्याची आणि आठवण काढण्याची कृती म्हणजे वर्षश्राद्ध होय. वर्षश्राद्ध हे बरोबर एखादी व्यक्ती गेल्यानंतर वर्षानंतर केले जाते. हे आपण वंशज म्हणून आपले कर्तव्य आहे. धर्मशास्त्रात निरनिराळ्या ग्रंथात वर्षश्राद्धाच्या वेगवेगळ्या व्याख्या नमूद करण्यात आल्या आहेत. ब्रम्हपुराणात याचा उल्लेख करताना पितरांना उद्देशून योग्य काळी, योग्य स्थळी विधींना अनुसरुन श्रद्धापूर्वक जी श्रद्धांजली दिली जाते त्याला वर्ष श्राद्ध असे म्हणतात. वर्षभरात श्राद्ध करण्यासाठी एक योग्य काळ सांगितला जातो. श्राद्ध कर्म करण्याचे विधि आणि वेगवेगळे प्रकार आहेत. ते विधी कोणते आणि ते कसे करायला हवेत हे आपण जाणून घ्यायला हवे. आज आपण वर्ष श्राद्ध कसे करावे (Varsha Shraddha In Marathi),भरणी श्राद्ध म्हणजे काय,प्रथम वर्ष श्राद्ध विधि मराठी,श्राद्ध कर्म विधि या विषयी अधिक माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण वर्षश्राद्ध कसे करावे, भरणी श्राद्ध म्हणजे काय (Bharani Shraddha Vidhi Marathi) याची माहिती घेऊया.
Table of Contents
वर्ष श्राद्ध कसे करावे | Varsha Shraddha Vidhi In Marathi
भारतीय हिंदू धर्मात आणि अन्य काही धर्मांमध्ये वर्षश्राद्ध केले जाते. प्रत्येकाची पद्धत असते. आपल्या पितरांप्रती श्रद्धा दाखवण्यासाठी हा विधि केला जातो. श्राद्धाची वेळ ही दुपारची असते. याला कुपत काळ असे देखील म्हटले जाते. श्राद्ध हे खास ब्राम्हणाकडून केले जाते. यासाठी ब्राम्हणाची संख्या ही विषम असावी लागते. varsha shraddha vidhi in marathi याचे देखील वेगळवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या तिथीनुसार ही श्राद्ध केले जातो. श्राद्ध कर्म विधि प्रकार कोणते याची माहिती आज आपण घेऊया.
Condolence Message In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश, स्टेटस आणि कोट्स
श्राद्ध कर्म विधि प्रकार | Different Types Of Shraddha Vidhi In Marathi
श्राद्ध कर्म विधिचे वेगवेगळे प्रकार आहेत. या प्रकारचे त्यांचे असे विशेषत्व आहे. वेगवेगळे श्राद्ध का केले जाते ते आपण जाणून घेऊया.
अविधवा नवमी
अविधवा नवमी या बद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल. खूप जणांकडे पितृतपंधरवड्याच्या नवव्या दिवशी सवाष्णी स्त्रीची ओटी भरतात. यामागे अशी धारणा आहे की, आपल्य घरातील एखादी महिला जर तिचा पती जिंवत असताना गेली असेल तर तिच्या आठवणीत हा दिवस लक्षात ठेवण्यासाठी म्हणून केला जातो. आपल्या नात्यात असणारी किंवा आपल्या आजुबाजूच्या एका सवाष्णीला घरी बोलावून तिचा मान-सन्मान केला जातो. त्यासाठी तिची नारळ, ब्लाऊज पीस, तांदूळ, वेणी किंवा गजरा देऊन साग्रसंगीत ओटी भरली जाते. इतकेच नाही. तर काही तरी गोड पदार्थ बनवून देखील दिला जातो. आपल्या पितरांची आठवण म्हणून हा दिवसही असा केला जातो. अविधवा नवमीचे हे वैशिष्ट्य आहे
पुराणश्राद्ध
एखाद्या पितराच्या गेल्यानंतर वर्षाने जो विधी केला जातो त्याला पुराणश्राद्ध असे म्हणतात. आपण याला वर्षश्राद्ध असे देखील म्हणतो. या दिवशी अनेक जण नातेवाईकांना बोलावून खास पुराण वाचून श्राद्ध करुन घेतात. या दिवशी गरुड पुराणाचे देखील वाचन केले जाते. अनेक जण ब्राम्हणांना बोलावून याची खास पूजा करतात. पितंराच्या आत्माशांतीसाठी हा प्रकार देखील फायद्याचा मानला जातो.
भरणी श्राद्ध
भरणी श्राद्ध म्हणजे काय असा तुम्हाला विचार पडला असेल तर एखादी व्यक्ती जे वर्ष सुरु आहे त्या वर्षात गेली असेल तर त्या दिवशी भरणी घातली जाते. यालाच भरणी श्राद्ध असे देखील म्हणतात. पितृपंधरवड्याच्या या काळातील चतुर्थीला किंवा पंचमीला हे श्राद्ध केले जाते. यामागे एक कथा देखील सांगितली जाते ती अशी की, यमराज हा भरणी नक्षत्राचा देवता आहे. त्याला खूश ठेवण्यासाठी आत्माशांतीसाठी या दिवशी भरणी घालतात. नुकतेच मृत्यू झालेल्या पितरांना शांती मिळावी यासाठी ते केले नाही. शिवाय या दिवशी श्राद्ध घातल्यामुळे कालसर्पदोष, पितृदोष यापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते. या दिवशी श्राद्ध घातले की, सर्व तिथक्षेत्राला गेल्याचा आशीर्वाद मृत व्यक्तींना मिळतो.
महालयश्राद्ध
महालय श्राद्ध याचा अपभ्रंश करुन बरेच जण याला महाळ असे देखील म्हणतात. या शब्दाची फोड करताना महाल म्हणजे मोठे आणि लय म्हणजे घर असा केला जातो. घरात कोणी गेले असेल म्हणजेच आपले पूर्वज यापैकी आजी, आजोबा, पणजोबा, सावत्र असे नातेवाईक यांच्या नावाने या दिवशी पिंडदान केले जाते. या निमित्ताने त्यांची आठवण काढली जाते. पितृपंधरवड्यातील एका विशिष्ट तिथीला महालय श्राद्ध केले जाते. यासाठी ब्राम्हणाला बोलावले जाते. तुम्ही कोणाचे महालयश्राद्ध ( Mahalaya Shraddha Vidhi In Marathi) करत आहात त्यावर त्याची पूजा वेळ अवलंबून असते. या दिवशी आजुबाजूच्या लोकांना जेवणासाठी बोलावले जाते. पानात शाकाहारी पदार्थ वाढले जातात. या दिवशी अन्नदानाला चांगलेच महत्व आहे.
आत्मश्राद्ध
आत्मश्राद्ध याविषयी फारच कमी लोकांना माहिती असेल. आता या शब्दाचा अर्थ फारच उघड असा आहे. जे श्राद्ध तुमच्या स्वत:च्या नावाने केले जाते. त्याला आत्मश्राद्ध असे म्हणतात. आपल्याकडे गया या जागेला फारच जास्त महत्व आहे . गया या ठिकाणी जाऊन आपल्या नावाने श्राद्ध घातले जाते. हे श्राद्ध सर्वसामान्य लोक करत नाहीत. तर जे लोक संन्यास घेतात. अशा लोकांना याची माहिती आधीच दिलेली असते आणि ते आपल्या नावे या ठिकाणी जाऊन श्राद्ध कर्म करुन घेतात. पितृपक्षात हे श्राद्ध केले जाते याबद्दल अधिक माहिती देता येणार नाही.
सर्वपित्री अमावस्या माहिती | Sarv Pitri Amavasya Mahiti
भाद्रपद अमावस्या यालाच सार्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. हिंदू पंचागांनुसार कृष्ण पक्षातील ही पंधारावी तिथी आहे. इंग्रजी महिन्यानुसार ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येते. याला सार्वपित्रीच नाही तर ‘पितृमोक्ष’ अमावस्या असे देखील म्हटले जाते. हा दिवस मृत पितरांसाठी अत्यंत चांगला दिवस म्हटला जातो . या काळात पितर खाली आलेली असतात म्हणून या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. या दिवशी पितरांच्या नावाने ताट दाखवले जाते. या ताटातील पदार्थ कावळ्याने खाणे अपेक्षित असते. कधी कधी हिंदू पंचांगानुसार वर्षातून दोन वेळा भाद्रपद महिना येतो. अशावेळी पहिला भाद्रपद हा खरा भाद्रपद मानला जातो आणि दुसरा भाद्रपद हा निज भाद्रपद म्हणून ओळखळा जातो. म्हणजेच त्याला सार्वपित्री असे देखील म्हटले जाते. 2022 मध्ये सार्वपित्री अमावस्या ही रविवार, 25 सप्टेंबर रोजी आली आहे.
सार्वपित्री अमावस्या नैवेद्य
सार्वपित्री अमावस्येच्या दिवशी नैवेद्य देखील हा थोडा वेगळा असतो. पितरांसाठी वाढल्या जाणाऱ्या पानात शाकाहारी पदार्थ असतात. केळीच्या किंवा पत्रावळीच्या पानामध्ये हा नैवेद्य वाढला जातो. सर्वसाधारणपणे पानात डाळ, भात, चपाती, आमसुलाची चटणी, खीर किंवा कोणताही गोड पदार्थ
सर्वपित्री अमावस्या पूजा विधी
सार्वपित्री अमावस्येची पूजा करणे हे महत्वाचे असते. त्याचा पूजाविधी हा देखील वेगळा आहे. असे म्हणतात ज्यांना अपमृत्यू आला असेल किंवा इच्छा पूर्ण झाल्या नसतील तर या दिवशी त्यांचा आत्माशांत करणे देखील गरजेचे असते. असे केले नाही तर पितृदोषाची शक्यता अधिक असते. त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. आनंद, पैसा अडका याच्या वृद्धीसाठी या दिवशी पूजा केली जाते. घरातील मोठ्या व्यक्तिच्या हस्ते ही पूजा केली जाते.
- घऱी ब्राम्हणाला बोलावून त्याच्या हस्ते ही पूजा केली जाते. त्यांच्याकडून पूजा करुन घेतल्यानंतर जो नैवेद्य केला जातो तो पहिला अग्नीला अर्पण केला जातो. त्यानंतर तो बाहेर ठेवण्यात येतो.
- सार्वपित्री अमावस्येचे काही नियम देखील आहेत. ब्राम्हणाकडून ते कार्य करुन घेतल्यावर त्यांचा उचित असा सन्मान करावा. असे न केल्यास ती पूजा सफल होत नाही असे म्हणतात.
- रात्रीच्या वेळी हे कार्य करु नये. उचित वेळ जाणून घेत हे कार्य करावे. तुमच्या राहत्या घरात हे कार्य करणे फार गरजेचे असते ते दुसऱ्यांच्या घरात करुन चालत नाही.
श्राद्धाची अत्यंत महत्वाची अशी माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. शिवाय पितृपक्षात आमसुलाची चटणी देखील तुम्ही करु शकता.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade